1. मी मनुश्यांच्या व देवदूतांच्या जिव्हांनीं बोलला आणि माझ्या ठायीं प्रीति नसली, तर मी वाजणारी थाळी किंवा झणझणणारी झांज असा आह.
2. मला संदेश देण्याची शक्ति असली, मला सर्व गुज व सर्व विद्या अवगत असल्या, आणि डागर ढळवितां येतील असा दृढ विश्वास मला असला, पण माझ्या ठायीं प्रीति नसली, तर मी कांहीच नाहीं.
3. मीं आपलें सर्व धन अन्नपदार्थ दिल, आपल शरीर जाळण्यासाठीं दिल, आणि माझ्या ठायीं प्रीति नसली तर मला कांही लाभ नाहीं.
4. प्रीति सहनशील आहे, उपकारशील आहे; प्रीति हेवा करीत नाहीं, प्रीति बढाई नाही, फुगत नाहीं;
5. गैरशिस्त वागत नाहीं, स्वार्थ पाहत नाहीं, चिडत नाहीं, अपकार स्मरत नाहीं;
6. अनीतींत आनंद मानीत नाहीं, तर सत्य समागमांत आनंद मानिते;
7. सर्व कांही सहन करित, सर्व कांही खर मानण्यास सिद्ध असते, सर्वांची आशा धरिते, सर्वांसंबंधान धीर धरिते.
8. प्राति कधी खचत नाही; संदेश असले तरी ते रद्द होतील. भाशा असल्या तरी त्या समाप्त होतील; आणि विद्या असली तरी ती रद्द होईल.
9. आपल्याला केवळ अंशतः कळत, आणि अंशतः संदेश देतां येतो;
10. पण पूर्णत्वाच आगमन झाल्यावर अपूर्णता नश्ट होईल.
11. मी मूल होता तेव्हां मुलासारखा बोलत अस, मुलासारखी माझी बुद्धि असे, मुलासारखे माझे विचार असत; आतां प्रौढ झाल्यावर मीं मुलाच्या गोश्टी सोडून दिल्या आहेत.
12. हल्लीं आपल्याला आरशांत अस्पश्ट अस दिसत; परंतु नंतर साक्षात् पाहूं. आतां मला कळत त अपूर्ण आहे; पण नंतर, मला पूर्णपण ओळखण्यांत आल आहे तस, मी पूर्णपण ओळखीन.
13. सारांश, विश्वास, आशा, प्रीति हीं तिन्हीं टिकणारी आहेत; त्यांत प्रीति श्रेश्ठ आहे.