Home / Marathi / Marathi New Testament / Web / 1 Corinthians

 

1 Corinthians, Chapter 3

  
1. बंधुजनहो, जस­ आत्मिकांबरोबर बोलाव­ तस­ तुम्हांबरोबर माझ्यान­ बोलवल­ नाही, तर जस­ दैहिकाबरोबर, जस­ खिस्तांतील बालकांबरोबर, तस­ बोलाव­ लागल­.
  
2. मीं तुम्हांस दूध पाजिल­, अन्न दिल­ नाहीं; कारण त्या वेळेस तुम्हांस शक्ति नव्हती, आणि अजूनहि नाही;
  
3. तुम्ही अजूनहि दैहिक आहां; तुमच्यांत हेवा व कहल हीं आहेत; ह्यावरुन तुम्ही दैहिक आहां कीं नाहीं? तुम्ही मानवी रीतीन­ चालतां कीं नाहीं?
  
4. कारण कोणी म्हणतो, मी पौलाचा आह­; आणि दुसरा एक म्हणतो, मी अपुल्लोसाचा आह­; तेव्हां तुम्ही मानवच आहां कीं नाहीं?
  
5. अपुल्लोस कोण आहे? आणि पौल कोण आहे? ज्यांच्या द्वार­ तुम्हीं विश्वास ठेविला, असे ते सेवक आहेत; ज्याला त्याला प्रभून­ दिल्यप्रमाण­ केवळ ते आहेत.
  
6. मीं लाविल­, अपुल्लोसान­ पाणी घातल­, पण देवान­ वाढविल­.
  
7. यास्तव लावणारा कांही नाही, आणि पाणी घालणाराहि कांही नाहीं; तर वाढविणारा देव हाच कायतो आहे.
  
8. लावणारा व पाणी घालणारा हे एकच आहेत, तरी प्रत्येकाला आपापल्या श्रमाप्रमाण­ आपापली मजुरी मिळेल.
  
9. कारण आम्ही देवाचे सहकारी आहा­. तुम्ही देवाच­ शेत, देवाची इमारत असे आहां.
  
10. मजवर झालेल्या देवाच्या अनुग्रहाच्या मानान­ मीं चतुर कारागिरासाखिा पाया घातला, आणि दुसरा त्यावर बांधितो; तर प्रत्येकान­ आपण त्यावर कस­ बांधिता­ याविशयींं जपाव­.
  
11. घातलेला पाया असा जो येशू खिस्त त्यांवाचून दुसरा पाया कोणाला घालतां येत नाहीं.
  
12. या पायावर कोणी सोन­, रुप­, मोलवान् पाशाण, लाकूड, गवत, प­ढा यांनी बांधितो;
  
13. तर बांधणा-या प्रत्येकाच­ काम उघड होईल; तो दिवस त­ उघडकीस आणील; कारण तो अग्नीसह असा प्रकट होईल आणि प्रत्येकांच­ काम कस­ आहे याची परीक्षा अग्नि करील.
  
14. ज्या कोणाच­ त्यावर बांधलेल­ काम टिकेल त्याला मजूरी मिळेल.
  
15. ज्या कोणाच­ काम जळून जाईल, त्याचा तोटा होईल, तथापि तो स्वतः तरेल; परंतु जणू काय अग्नींंतून बाहेर पडल्यासारखा तरेल.
  
16. तुम्ही देवाच­ मंदिर आहां, आणि तुम्हांमध्य­ देवाचा आत्मा वसतो ह­ तुम्हांस ठाऊक नाहीं काय?
  
17. जर कोणी देवाच्या मंदिराचा नाश करितो तर देव त्याचा नाश करील; कारण देवाच­ मंदिर पवित्र असत­, तसेच तुम्ही आहां.
  
18. कोणीं स्वतःला फसवून घेऊं नये; तुम्हांपैकीं जो कोणी सांप्रतच्या युगदृश्ट्या आपण ज्ञानी आहा­ अस­ समजतो त्यान­ ज्ञानी होण्याकरितां मूर्ख व्हाव­.
  
19. कारण या जगाच­ ज्ञान देवासमोर मूर्खपण आहे; ‘तो ज्ञान्यांस त्यांच्याच धूर्तपणांत धरितो’ असा शास्त्रलेख आहे;
  
20. आणि ‘प्रभु ज्ञान्यांचे विचार असे ओळखतो कीं ते व्यर्थ आहेत,’ असा दुसरा शास्त्रलेख आहे.
  
21. यास्तव मनुश्यांविशयीं कोणी प्रतिश्ठा, मिरवूं नये. सर्व कांही तुमच­ आहे;
  
22. पौल, अपुल्लोस, केफा, जग, जीवन, मरण, वर्तमान, भविश्य, ही सर्व तुमचीं आहेत;
  
23. तुम्ही खिस्ताचे; आणि खिस्त देवाचा.