Home / Marathi / Marathi New Testament / Web / 1 Corinthians

 

1 Corinthians, Chapter 6

  
1. तुम्हांतील कोणा एकाचा दुस-याबरोबर वाद असला, तर तो आपला खटला पवित्र जनांपुढ­ न आणितां अधार्मिकांपुढ­ नेण्याच­ कस­ धाडस करितो?
  
2. पवित्र जन हे जगाचा न्यायनिवाडा करितील ह­ तुम्हांस ठाऊक नाहीं काय? तुम्हांपुढ­ जगाचा न्यायनिवाडा व्हावयाचा आहे, तर तुम्ही अगदीं हलक्या खटल्यांच्या न्यायसभा होण्यास अयोग्य आहां काय?
  
3. आपण देवदूतांचा न्यायनिवाडा करुं ह­ तुम्हांस ठाऊक नाहीं काय? तर मग व्यावहारिक गोश्टींविशयीं सांगण­ नकोच.
  
4. तुम्हांस व्यावहारिक खटल्यांचा न्यायनिवाडा करावयाचा आहे, तर जे मंडळीत गणतीचे नाहींत त्यांस कस­ नेमतां?
  
5. तुम्हांस लाज वाटावी म्हणून मी ह­ सांगता­. ज्याच्यान­ भावाभावांची पंचाईत करवेल असा एकहि शहाणा मनुश्य तुम्हांमध्य­ नाहीं, असे आहे काय?
  
6. भाऊ भावावर फिर्याद करितो, आणि तीहि विश्वास न ठेवणा-यांपुढ­ करितो.
  
7. तुम्ही एकमेकांवर खटले करितां ह्यांत सर्व प्रकार­ तुमची हानिच आहे; त्यापेक्षां तुम्ही अन्याय कां सोसून घेत नाही? त्यापेक्षां नाडणूक कां सोसून घेत नाही?
  
8. उलट तुम्ही स्वतः अन्याय व नाडणूक करितां, आणि ती आपल्या बंधुजनांची करितां.
  
9. अनीतिमान् मनुश्याला देवाच्या राज्याच­ वतन मिळणार नाहीं ह­ तुम्हांस ठाऊक नाही काय? फसूं नका; जारकर्मी, मूर्तिपूजक, व्यभिचारी, चैनबाज, पुंमैथुनकारी,
  
10. चोर, लोभी, मद्यपी, चहाड, व वित्त हरण करणारे यांस देवाच्या राज्याचें वतन मिळणार नाहीं;
  
11. आणि तुम्हांपेकीं कित्येक तसे होते; तरी तुम्ही प्रभु येशू खिस्ताच्या नामांत व आपल्या देवाच्या आत्म्यांत धुतलेले, पवित्र केलेले, व नीतिमान् ठरविलेलेे, असे झालां आहां.
  
12. सर्व गोश्टींची मला मोकळीक आहे, तरी सर्व गोश्टी हितकारक असतात अस­ नाहीं; सर्व गोश्टींची मला मोकळीक आहे, तरी मी कोणत्याहि गोश्टीच्या स्वाधीन हेाणार नाहीं.
  
13. अन्न पोटासाठी व पोट अन्नासाठी आहे; त्या दोहा­चा देव अंत करील. शरीर जारकर्मासाठीं नाहीं, तर प्रभूसाठी आहे; आणि शरीरासाठी प्रभु आहे.
  
14. देवान­ प्रभूला उठविल­, आणि तो आपल्या सामर्थ्यान­ आपल्याला उठवील.
  
15. तुमचीं शरीर­ खिस्ताच­ अवयव आहेत, ह­ तुम्हांस ठाऊक नाहीं काय? मीं खिस्ताच­ अवयव नेऊन ते कसबिणींचे अवयव करावे काय? अस­ न होवो.
  
16. जो कसबिणीला जडला तो व ती हीं एकशरीर आहेत, ह­ तुम्हांस ठाऊक नाहीं काय? कारण ‘ती दोघे एकदेह होतील’ अस­ तो म्हणतो.
  
17. जो प्रभूला जडला तो व प्रभु एक आत्मा आहे.
  
18. जारकर्मापासून दूर राहा. ज­ कांहीं दुसर­ पापकर्म मनुश्य करितो त­ शरीराबाहेरुन होत­; परंतु जो जोरकर्म करितो तो आपल्या शरीरासंबंधान­ पाप करितो.
  
19. तुमच­ शरीर, तुम्हांमध्य­ वसणारा जो पवित्र आत्मा देवापासून तुम्हांस मिळाला आहे त्याच­ मंदिर आहे ह­ तुमहांस ठाऊक नाहीं काय? आणि तुम्ही आपले नव्हां;
  
20. कारण तुम्ही मोलान­ विकत घेतलेले आहां; यास्तव तुम्ही आपल्या शरीरान­ देवाचे गौरव करा.