Home / Marathi / Marathi New Testament / Web / 1 Corinthians

 

1 Corinthians, Chapter 8

  
1. आतां मूर्तीच्या नैवेद्याविशयीं: आपल्या सर्वांस ज्ञान आह­ ह­ आपल्याला ठाऊक आहे. ज्ञान फुगविते­, प्रीति वृद्धि करिते.
  
2. जर कोणाला वाटत­ कीं आपल्याला एखादी गोश्ट कळते तर ज्याप्रमाण­ कळल­ पाहिजे त्याप्रमाण­ त्याला अद्याप कळत नाहीं.
  
3. जर कोणी देवावर प्रेम करितो तर देवाला त्याची ओळख झालेली असते.
  
4. आतां मूर्तीचे नैवेद्य खाण्यासंबंधान­ आपल्याला ठाऊक आहे कीं जगांत देवाची म्हणून मूर्तिच नाहीं; आणि एकाखेरीज दुसरा देव नाहीं.
  
5. कारण ज्याला देव म्हणतात असे स्वर्गांत किंवा पृथ्वीवर असले, आणि असे बहुत देव व बहुत प्रभु आहेत,
  
6. तरी आपणांला एकच देव म्हणजे पिता आहे, त्याजपासून अवघीं आहेत, व आपण त्याच्यासाठीं आहा­; आणि आपल्याला एकच प्रभु येशू खिस्त आहे, त्याच्या द्वार­ अवघीं आहेत व आपण त्याच्या द्वार­ आहा­.
  
7. तथापि ह­ ज्ञान सर्वांच्या ठायीं असत­ अस­ नाहीं; तर कित्येकांवर मूर्तीच्या सवयीचा संस्कार अजून राहिल्यामुळ­ ते लोक मूर्तीचा तो नैवेद्य म्हणून खातात; तेव्हां त्यांच­ मन दुर्बल असल्यामुळ­ त­ विटाळत­.
  
8. आपली योग्यायोग्यतां भक्ष्यान­ देवापुढ­ ठरत नाहीं; न खाण्याान­ आपण कमी होत नाही आणि पिण्यान­ आपण अधिक होत नाहीं.
  
9. तरी ही तुमची मोकळीक दुर्बळांस अडखळण्याच­ कारण होऊं नये म्हणून जपा.
  
10. कारण ज्ञानवान् असा जो तूं त्या तुला मूर्तीच्या देवळांत जेवावयास बसलेल­ कोणी पाहिल­ तर, तो दुर्बळ असल्यास, त्याच्या मनांत मूर्तीचा नैवेद्य खाण्याच­ धाडस करण्याच­ येईल ना?
  
11. याप्रमाण­ जो दुर्बळ, ज्याच्यासाठी खिस्त मरण पावला असा बंधु, त्याचा तुझ्या ह्या ज्ञानाच्या योग­ नाश होतो.
  
12. बंधुविरुद्ध अस­ पाप करुन व त्यांच्या दुर्बळ मनाला धक्का देऊन तुम्ही खिस्ताविरुद्ध पाप करितां.
  
13. यास्तव भक्ष्यामुळ­ आपल्या बंधूला अडखळण होत­ तर मीं त्याला अडखळवूं नये म्हणून मी मांस कधींच खाणार नाहीं.