1. आपल्याला देवाचीं मुल हे नांव मिळाले यांत पित्यान आपल्याला केवढ प्रीतिदान दिल आहे त पाहा; आणि आपण तस आहाच. यामुळ जग आपल्याला ओळखीत नाहीं कारण त्यान त्याला ओळखल नाहीं.
2. प्रियजनहो, आपण आतां देवाचीं मुल आहा; आणि पुढ आपण काय होऊं ह अजून प्रकट झाल नाहीं; तरी आपल्याला ह माहित आहे कीं तो प्रकट झाल्यास आपण त्यासारखे होऊं, कारण जसा तो आहे तसाच तो आपल्याला दिसेल.
3. ज्या कोणाला त्यासंबंधान ही आशा आहे तो, जसा तो शुद्ध आहे तसा, आपणाला शुद्ध करितो.
4. जो कोणी पाप करितो तो स्वैरवर्तन करितो; पाप ह स्वैरवर्तन आहे.
5. तुम्हांला ह माहित आहे कीं पाप हरण करावीं म्हणून तो प्रकट झाला; त्याच्या ठायीं पाप नाहीं;
6. जो काणी त्याच्या ठायीं राहतो तो पाप करीत नाहीं; जो कोणी पाप करितो त्यान त्याला पाहिल नाहीं व त्याला ओळखलहि नाहीं.
7. मुलांनो, कोणी तुम्हांस बहकवूं नये; जसा तो नीतिमान् आहे तसा नीतीन वागणारा इसमहि नीतिमान् आहे.
8. जो पाप करितो तो सैतानापासून आहे; कारण सैेतान प्रारंभापासून पाप करीत आहे. सैतानाची कृत्य नश्ट करावीं यासाठींच देवाचा पुत्र प्रकट झाला;
9. जो कोणी देवापसून जन्मला आहे तो पाप करीत नाहीं; कारण तो देवापासून जन्मला आहे.
10. यावरुन देवाचीं मुलें व सैतानाचीं मुल उघड होतात. जो काणी नीतिन वागत नाहीं तो देवापासून नाहीं, व जो आपल्या बंधूवर प्रीति करीत नाहीं तोहि नाहीं.
11. जो संदेश तुम्ही प्रारंभापासून ऐकला तो हाच आहे कीं आपण एकमेकांवर प्रीति करावी;
12. जसा काईन त्या दुश्टाचा होता व त्यान आपल्या बंधूचा वध केला तस आपण नसाव. त्यान त्याचा वध कशासाठीं केला? त्याचीं कृत्य दुश्ट होतीं आणि त्याच्या बंधूचीं नीतींची होतीं यामुळ केला.
13. बंधूंनो, जग तुमचा द्वेश करित याच आश्चर्य मानूं नका.
14. आपण बंधुवर्गावर प्रीति करिता यावरुन आपण समजता कीं आपण मरणांतून निघून जीवनांत आला आहा.
15. जो कोणी आपल्या बंधूचा द्वेश करितो तो नरहिंसक आहे; आणि कोणाहि नरहिंसकाच्या ठायीं सार्वकालिक जीवन राहत नाहीं, ह तुम्हांस माहीत आहे.
16. त्यान आपल्याकरितां स्वप्राण अर्पिला यावरुन आपल्याला प्रीतींच ज्ञान झाल आहे; म्हणून आपणहि आपल्या बंधंूकरितां स्वप्राण अर्पिला पाहिजे.
17. तर मग आपल्याजवळ संसाराचीं साधन असून व आपला बंधु गरजवंत आहे ह पाहून जो स्वतःला त्याबद्दल कळवळा येऊं देत नाहीं त्याच्या ठायीं देवाची प्रीति कशी राहते?
18. मुलांनो, आपल्या शब्दांनी किंवा जिव्हेन नव्ह, तर कृतीन व सत्यान आपण प्रीति करावी.
19. आपण सत्याचे आहा ह यावरुन आपल्याला समजेल; आणि ज्या कशाविशयीं आपल मन आपल्या स्वतःला दोशी ठरवित त्याविशयी आपण स्वतःच्या मनाला त्याजसमोर उमेद देऊं; कारण देव आपल्या मनांपेक्षा थोर आहे; त्याला सर्व कांहि कळत.
21. प्रियजनहो, आपल मन आपल्याला दोशी ठरवीत नसेल तर आपल्याला देवासमोर धैर्य आहे.
22. आणि आपण ज कांहीं मागतांे त त्याजपासून आपल्याला मिळत; कारण आपण त्याच्या आज्ञा पाळिता, व त्याच्या दृश्टीन ज आवडत त करिता.
23. ही त्याची आज्ञा आहे कीं त्याचा पुत्र येशू खिस्त याच्या नामावर आपण विश्वास ठेवावा; आणि त्यान आपल्याला आज्ञा दिल्याप्रमाण आपण एकमेकांवर प्रीति करावी.
24. त्याच्या आज्ञा पाळणारा इसम त्याच्या ठायीं राहतो व तो त्या इसमाच्या ठायीं राहतो. त्यान जो आत्मा आपल्याला दिला, त्यावरुन आपल्याला कळते कीं तो आपल्या ठायीं राहतो.