Home / Marathi / Marathi New Testament / Web / 1 John

 

1 John, Chapter 4

  
1. प्रियकरांनो, प्रत्येक आत्म्याचा विश्वास धरुं नका, तर ते आत्मे देवापासून आहेत किंवा नाहीत याविशयीं त्यांची परीक्षा करा; कारण पुश्कळ खोटे संदेश्टे जगांत उठले आहेत.
  
2. जो जो आत्मा, देह धरुन आलेल्या येशू खिस्ताला कबूल करितो तो तो देवापासून आहे; ह्यावरुन देवाचा आत्मा ओळखावा.
  
3. जो जो आत्मा येशूला कबूल करीत नाहीं तो तो देवापासून नाहीं. खिस्तविरोध्याचा विरोध हाच आहे; तो येणार आहे ह­ तुम्हीं ऐकल­ आणि तो जगांत आतां आहेच.
  
4. मुलांनो, तुम्ही देवापासून आहां आणि त्याजंवर तुम्हीं जय मिळविला आहे; कारण जगांत जो आहे त्यापेक्षां तुम्हांत जो आहे तो मोठा आहे.
  
5. ते जगाचे आहेत म्हणून त्यांचे भाशण ऐहिक आहे, आणि जग त्यांचे ऐकून घेत­.
  
6. आपण देवापासून आहा­; जो देवाला ओळखतो तो आपल­ ऐकता­; जो देवापासून नाही तो आपले ऐकत नाहीं. यावरुन सत्याचा आत्मा कोणता व भ्रांतीचा आत्मा कोणता ह­ आपण ओळखिता­.
  
7. प्रियजनहो, आपण एकमेकांवर प्रीति करुं; कारण प्रीति देवापासून आहे; जो कोणी प्रीति करितो तो देवापासून जन्मला आहे, व देवाला ओळखतो.
  
8. जो प्रीति करित नाहीं तो देवाला ओळखीत नाही; कारण देव प्रेमस्वरुप आहे.
  
9. देवान­ आपल्या एकुलत्या एक पुत्राला जगांत पाठविल­ आहे, यासाठीं कीं आपण त्याच्या द्वार­ जीवंत राहाव­; यामध्य­ देवाची प्रीति आपल्या ठायीं प्रकट झाली.
  
10. प्रीति म्हणावी तर हीच; आपण देवावर प्रीति केली अस­ नाहीं, तर त्यान­ तुम्हांआम्हांवर प्रीति केली आणि स्वपुत्राला आपल्या पातकांचे प्रायश्चित्त व्हाव­ म्हणून पाठविल­.
  
11. प्रियजनहो, जर देवान­ आपल्यावर अशा प्रकार­ प्रीति केली तर आपणहि एकमेकांवर प्रीति केली पाहिजे.
  
12. देवोला कोणीं कधीहि पाहिल­ नाहीं; आपण एकमेकांवर प्रीति करिता­ तर देव आपल्या ठायीं राहतो, आणि त्याची प्रीति आपल्या ठायींं पूर्ण होते;
  
13. आपण त्यामध्य­ व तो आपल्यामध्य­ राहतो, ह­ आपण यावरुन ओळखता­ कीं त्यान­ स्वतःच्या आत्म्यांतून आपल्यास दिल­ आहे;
  
14. आम्ही पाहिल­ आहे व साक्ष देता­ कीं पित्यान­ पुत्राला जगाचा तारणारा अस­ पाठविल­ आहे.
  
15. येशू देवाचा पुत्र आहे, अस­ जो कोणी कबूल करितो त्याच्या ठायीं देव राहतो व तो देवाच्या ठायीं राहतो.
  
16. देवाला आपल्याविशयीं जी प्रीति आहे ती आपल्याला कळते व आपण तिच्यावर विश्वास ठेविला आहे. देव प्रेमस्वरुप आहे; जो प्रीतिमध्य­ राहतो तो देवामध्य­ राहतो, व देव त्यामध्य­ राहतो.
  
17. न्यायाच्या दिवसासंबंधान­ आपल्या ठायीं धैर्य उत्पन्न व्हाव­ म्हणून त्याची प्रीति आपल्यामध्य­ अशी पूर्ण झाली आहे; कारण जसा तो आहे तसे या जगांत आपणहि आहा­;
  
18. प्रेमाच्या ठायीं भीति नसते; इतक­च नव्हे तर पूर्ण प्रीति भीतीला घालवून देते; भीतीमध्य­ शासन असत­, आणि भीति बाळगणारा प्रीतिमध्ये पूर्ण झालेला नसतो.
  
19. त्यान­ पहिल्यान­ आपणांवर प्रीति केली, म्हणून आपण प्रीति करिता­.
  
20. मी देवावर प्रीति करिता­ अस­ म्हणून जो कोणी आपल्या बंधूचा द्वेश करितो तो लबाड आहे; कारण आपल्या बंधूंला पाहिल­ असून त्याजवर जो प्रीति करीत नाहीं त्याच्यानें, न पाहिलेल्या देवावर प्रीति करवत नाहीं.
  
21. जो देवावर प्रीति करितो त्यान­ आपल्या बंधूवरहि प्रीति करावी, ही आज्ञा त्याजपासून आपल्याला आहे.