Home / Marathi / Marathi New Testament / Web / 1 John

 

1 John, Chapter 5

  
1. येशू हा खिस्त आहे, असा विश्वास जा­ कोणी धरितो तो देवापासून जन्मला आहे; आणि जो कोणी जन्मदात्यावर प्रीति करितो, तो त्याजपासून जन्मलेल्या इसमावरहि प्रीति करितो.
  
2. आपण देवावर प्रीति करिता­ व त्याच्या आज्ञा पाळिता­ तर त्यवारुन आपल्याला कळतें कीं आपण देवाच्या लेकरांवर प्रीति करिता­.
  
3. देवावर प्रीति करणंे म्हणजे आपण त्याच्या आज्ञा पाळण­ ह­ आहे; आणि त्याच्या आज्ञा भारी नाहींत.
  
4. कारण ज­ कांहीं देवापासून जन्मलेल­ आहे त­ जगावर जय मिळवित­; आणि ज्यान­ जगावर जय मिळविला तो हाच आपला विश्वास आहे.
  
5. येशू देवाचा पुत्र आहे असा विश्वास जो धरितो त्याजवांचून जगावर जय मिळविणारा कोण आहे?
  
6. जो पाण्याच्या द्वार­ व रक्ताच्या द्वार­ आला तो हाच, म्हणजे येशू खिस्त; पाण्यान­ केवळ नव्हे, तर पाण्यान­ व रक्तान­हि आला.
  
7. साक्ष देणारा हा आत्मा आहे, कारण आत्मा सत्य आहे.
  
8. साक्ष देणारे तिघे आहेतः आत्मा, पाणी व रक्त; ह्या तिघांची साक्ष एकच आहे.
  
9. आपण मनुश्यांची साक्ष स्वीकारिता­, पण तिजपेक्षां देवाची साक्ष मोठी आहे. जी साक्ष देवान­ आपल्या पुत्राविशयीं दिली ती हीच त्याची साक्ष आहे.
  
10. जो देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवितो त्याच्या ठायींच साक्ष आहे; ज्यान­ देवाचा विश्वास धरिला नाहीं त्यान­ त्याला लबाड केले आहे; कारण जी साक्ष देवान­ आपल्या पुत्राविशयीं दिली आहे तिच्यावर त्यान­ विश्वास ठेविला नाहीं.
  
11. ती साक्ष हीच आहे कीं देवान­ आपल्याला सार्वकालिक जीवन दिलें आणि हे जीवन त्याच्या पुत्रामध्य­ आहे.
  
12. ज्याला तोे पुत्र आहे त्याला जीवन आहे; ज्याला देवाचा पुत्र नाहीं त्याला जीवन नाहीं.
  
13. सार्वकालिक जीवन तुम्हांस आहे ह­ तुम्हांस कळाव­ म्हणून देवाच्या पुत्राच्या नामावर विश्वास ठेवणा-या तुम्हांस ह­ मीं लिहिलेे आहे.
  
14. त्याविशयीं आपल्याला जो भरवसा आहे तो हा आहे कीं आपण त्याच्या इच्छेप्रमाणे कांहीं मागितल­ तर तो आपल­ ऐकेल;
  
15. आपण मागता­ त्याविशयीं तो आपल­ ऐकतो, ह­ आपल्याला ठाऊक आहे; म्हणून जीं मागणीं आपण त्याच्याजवळ मागितलीं आहेत तीं आपल्याला मिळालीं आहेत ह­हि आपल्याला ठाऊक आहे.
  
16. ज्याचा परिणाम मरण नाहीं असे पाप करितांना आपल्या बंधूला कोणी पाहील तर त्यान­ त्याच्याकरितां मागितल­ असतां तो त्याला जीवन मिळवून देईल; म्हणजे ज्याचा परिणाम मरण नाहीं असे पाप करणा-यांस त­ मिळवून देईल. ज्याचा परिणाम मरण आहे अस­ पाप आहे; याविशयीं मागाव­ अस­ मी म्हणत नाहीं.
  
17. कोणतीहि अनीति पाप आहे; आणि त्यांत ज्याचा परिणाम मरण नाहीं असेहि पाप आहे.
  
18. जो काणी देवापासून जन्मला आहे तोे पाप करीत नाहीं ह­ आपल्याला माहीत आहे; जो देवापासून जन्मला तो त्याला राखितो आणि तो दुश्ट त्याला शिवत नाहीं.
  
19. आपण देवापासून आहा­ ह­ आपल्याला माहीत आहे; सगळ­ जग त्या दुश्टाच्या अधीन आहे.
  
20. आपल्याला माहीत आहे कींं देवाचा पुत्र आला आहे, आणि जो सत्य आहे त्याच­ ज्ञान करुन घेण्याची बुद्धि आपल्याला दिली आहे; जो सत्य त्यांमध्ये, म्हणजे त्याचा पुत्र येशू खिस्त यामध्य­, आपण आहा­. हाच खरा देव; ह­ सार्वकालिक जीवन आहे.
  
21. मुलांनो, तुम्ही स्वतःस मूर्तीपासून दूर राखा.