Home / Marathi / Marathi New Testament / Web / 1 Peter

 

1 Peter, Chapter 5

  
1. तुम्हांतील वडील मंडळीला, जो मी सोबतीचा वडील, खिस्ताच्या दुःखाचा साक्षी व प्रकट होणा-या गौरवाचा विभागी तो मी बोध करिता­;
  
2. तुम्हांमधील देवाच्या कळपांचे पालन करा; भाग पडते म्हणून नव्हे, तर देवाच्या इच्छेप्रमाण­ संतोशान­ त्याची देखरेख करा; द्रव्यलोभानंेहि नव्हे तर उत्सुकतेन­ करा;
  
3. तुमच्या दिम्मतीच्या लोकांवर धनीपण करणारे अस­ नव्हे, तर कळपाला कित्ते व्हाल अस­ करा;
  
4. मग मुख्य म­ढपाळ प्रकट होईल तेव्हां गौरवाचा न कोमेजणारा हार प्राप्त होईल.
  
5. तस­च तरुणांनो, वडिलांच्या अधीन राहा, आणि एकमेकांची सेवा करण्यासाठीं सर्व जण नम्रतारुपी कमरबंद बांधा; कारण ‘देव गर्विश्ठांचा विरोध करितो, आणि लीनांवर कृपा करितो.’
  
6. यास्तव देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा, यासाठीं कीं त्यान­ योग्य वेळीं तुम्हांस उंच कराव­.
  
7. त्याजवर तुम्ही ‘आपली’ सर्व चिंता टाका’ कारण तो तुमची काळजी घेतो.
  
8. सावध असा, जागे राहा; तुमचा शत्रु सैतान हा गर्जणा-या सिंहासारखा कोणाला गिळाव­ ह­ शोधीत फिरतो;
  
9. त्याच्याविरुद्ध विश्वासांत दृढ अस­ उभे राहा; जगांतील तुमच्या बंधुवर्गाला हींच दुःख­ नेमल्याप्रमाण­ होत आहेत ह­ लक्षांत असू द्याा.
  
10. तुम्ही थोडा वेळ दुःख सोसल्यावर, आपल्या सार्वकालिक गौरवांत याव­ म्हणून ज्यान­ खिस्तामध्य­ तुम्हांस पाचारण केल­ तो सर्व कृपेचा देव स्वतः तुम्हांस पूर्ण, दृढ व सबळ करील;
  
11. त्याला युगानुयुग पराक्रम असो. आमेन.
  
12. माझ्या मत­ विश्वासू असा आपला बंधु सिल्वान याच्या हातीं मीं थोडक्यांत ह­ लिहून पाठवून ह्यांत बोध केला आहे व साक्ष दिली आहे कींं ही देवाची खरी कृपा आहे, हिच्यांत तुम्ही दृढ राहा.
  
13. बाबेलांतील तुम्हांसारखी निवडलेली (मंडळी) तुम्हांस सलाम सांगते; आणि माझा पुत्र मार्क हाहि सांगतो.
  
14. प्रीतिच्या चुंबनान­ एकमेकांस सलाम करा. खिस्तामधील तुम्हां सर्वांस शांति असो.