Home / Marathi / Marathi New Testament / Web / 1 Timothy

 

1 Timothy, Chapter 2

  
1. तर सर्वात प्रथम हा बोध मी करितो की सर्व मनुश्यांसाठीं विनंत्या, प्रार्थना, रदबदल्या व ईशोपकारस्मरण कराव­;
  
2. राजाकरितां व सर्व वरिश्ठ अधिका-यांकरितां कराव­ यासाठीं कीं आपण सर्व सुभक्तींन­ व गंभीरपणान­ शांतींच­ व स्वस्थपणाच­ अस­ आयुश्यक्रमण कराव­.
  
3. हे आपला तारणारा देव याच्या दृश्टीन­ चांगल­ व स्वीकारावयास योग्य आहे.
  
4. त्याची इच्छा आहे कीं सर्व मनुश्यांचे तारण व्हाव­ व त्यांनी सत्याच्या पूर्ण ज्ञानास पोहंचाव­.
  
5. कारण एकच देव आहे, आणि देव व मनुश्य­ यांमधील खिस्त येशू हा मनुश्य एकच मध्यस्थ आह­.
  
6. त्यान­ सर्वांसाठी मुक्तीच­ मोल म्हणून स्वतःला दिल­ ह्याची साक्ष यथाकाळी देण­ आह­;
  
7. या साक्षीसाठीं मला घोशणा करणारा व प्रेशित, (मी सत्य बोलता­, लबाडी करीत नाहीं,) विश्वास व सत्य ह्यासंबंधीं विदेशी लोकांचा शिक्षक अस­ नेमिल­.
  
8. माझी इच्छा अशी आहे कीं प्रत्येक ठिकाणीं पुरुशांनी राग व विवाद ह्यांचा स्पर्श होऊं न देतां पवित्र हस्त उच्च करुन प्रार्थना करावी.
  
9. तशीच माझी इच्छा आहे कीं स्त्रियांनी स्वतःस साजेल अशा वेशान­ आपणांस भिडस्तपणान­ व मर्यादेन­ शोभवाव­; केस गुंफण­ आणि सोन­, मोत्य­ व मोलवान् वस्त्र­ यांनी नव्हे,
  
10. तर सत्कर्मांनीं शोभवाव­; (देवभक्ति स्वीकारलेल्या स्त्रियांस ह­ शोभत­)
  
11. स्त्रीन­ पूर्ण अधीनतेन­ स्वस्थत­त शिकाव­.
  
12. स्त्रीला शिकविण्याची आणि पुरुशावर धनीपण चालविण्याची परवानगी मी देत नाहीं; तिन­ स्वस्थ राहाव­.
  
13. कारण प्रथम आदाम घडला, नंतर हव्वा.
  
14. आदाम भुलवला गेला नाहीं. स्त्री भुलून अपराधांत सांपडली.
  
15. तथापि ती मर्यादेन­ विश्वास, प्रीति व पवित्रता यांत राहिल्यास मुलांना जन्म देण्याच्या योगे तिच­ तारण होईल.