Home / Marathi / Marathi New Testament / Web / 1 Timothy

 

1 Timothy, Chapter 6

  
1. जे दास म्हणून जुवाखालीं आहेत त्या सर्वांनी आपापले धनी सर्व प्रकारच्या सन्मानास योग्य आहेत अस­ मानाव­, यासाठीं कीं देवाच्या नामाची व शिक्षणाची निंदा होऊं नये;
  
2. आणि ज्यांस विश्वास ठेवणारे धनी आहेत त्यांनी ह­ बंधु आहेत म्हणून त्यांचा अवमान करुं नये; तर अधिक सेवा करावी; कारण ज्यंास सेवेचा लाभ होतो ते विश्वास ठेवणारे व प्रिय आहेत. या गोश्टी शिकीव आणि यांविशयीं बोध कर.
  
3. जर कोणी अन्य त-हेच­ शिक्षण देतो आणि आपल्या प्रभु येशू खिस्ताचीं जीं सुवचन­ तीं, व सुभक्तयनुसाीर ज­ शिक्षण त­, मान्य करीत नाहीं,
  
4. तर तो मदांध आहे; त्यांस कांहीं कळत नाहीं, तो वादविवाद व शब्दयुद्ध यांमुळ­ वेडा बनला आहे; यांपासून हेवा, कलह, अपशब्द, दुस-यांविशयी कुकल्पना हीं उत्पन्न होतात;
  
5. मन बिघडलेल्या, सत्यास मुकलेल्या, सुभक्ति ही कमाईच­ साधन आहे अशी कल्पना करणा-या मनुश्यांची एकसारखीं भांडणे होतात.
  
6. संतोशसहित असलेली सुभक्ति तर मोठाच लाभ आहे.
  
7. आपण जगांत कांही आणिल­ नाहीं, आपल्याच्यान­ त्यांतून कांही नेववत नाहीं;
  
8. आपल्याला अन्नवस्त्र असल्यास तेवढ्यान­ तृप्त असाव­;
  
9. परंतु जे धनवान् होऊं पाहतात ते परीक्ष­त, पाशांत आणि मनुश्यांस नाशांत व विध्वंसांत बुडविणा-या अशा मूर्खपणाच्या व बाधक वासनांत सांपडतात.
  
10. कारण द्रव्याचा लोभ सर्व प्रकारच्या वाइटाच­ मूळ आहे; त्याच्या पाठीस लागून कित्येक विश्वासापासून बहकले आहेत; आणि त्यांनी स्वतःस फार खेदांनी भोसकून घेतल­ आहे.
  
11. हे देवभक्ता, तूं यांपासून पळ, आणि नीतिमत्व, सुभक्ति, विश्वास, प्रीति, धीर व सौम्यता यांच्या पाठीस लाग.
  
12. विश्वासासंबंधीच­ ज­ सुयुद्ध त­ कर, युगानुयुगाच­ जीवन मिळीव, त्यासाठीच तुला पाचारण झाल­ आहे, आणि तूं पुश्कळ साक्ष्यांसमोर तो सुस्वीकार करुन मान्य केला.
  
13. सर्वांस जीवन देणारा जो देवा त्याजसमोर आणि ज्या खिस्त येशून­ पंतय पिलातासमक्ष जो सुस्वीकार केला, त्याजसमोर मी तुला निक्षून सांगता­,
  
14. आपला प्रभु येशू खिस्त प्रकट होईपर्यंत तुं त्याची आज्ञा निश्कलंक व अदूश्य राख.
  
15. जो धन्य व एकच अधिपति, राजांचा राजा व प्रभूंचा प्रभु, ज्या एकालाच अमरत्व आहे, जो अगम्य प्रकाशांत राहतो, ज्याला कोणा मनुश्यान­ पाहिले नाहीं,
  
16. आणि कोणच्यान­ पाहवत नाहीं, तो त­ त्याच­ प्रकट होण­ यथाकाळीं दिसण्यांत आणील; त्याला सन्मान व युगानुयुगाच­ सामर्थ्य असो. आमेन.
  
17. प्रस्तुत युगांतल्या धनवानांस सांग कीं तूं अभिमानी होऊं नये, चंचल धनावर आशा ठेवूं नये, तर जो सदाजीवी देव आपल्यास उपभोगासाठी सर्व कांहीं विपुल देतो त्याजवर आशा ठेवावी;
  
18. चांगल­ त­ कराव­, सत्कर्माविशयीं धनवान् असाव­; दानशील, परोपकारी असाव­.
  
19. ज­ खर­ जीवन त­ मिळविण्यास पुढील काळी चांगला आधार होईल, अस­ साठवण आपणासाठी कराव­.
  
20. हे तीमथ्या, तुझ्या स्वाधीन केलेली ठेव संभाळ; अधर्माच्या रिकाम्या वटवटी आणि जिला विद्या ह­ नांव चुकीन­ दिल­ आहे तिचीं विरोधी मत­ वर्ज कर;
  
21. ती स्वीकारुन कितीएक विश्वासापासून चुकून गेले. तुजबरोबर कृपा असो.