Home / Marathi / Marathi New Testament / Web / 2 Corinthians

 

2 Corinthians, Chapter 9

  
1. पवित्र जनांची सेवा करण्याविशयीं मीं तुम्हांस लिहाव­ ह्याच­ अगत्य नाहीं;
  
2. कारण मला तुमची उत्सुकता ठाऊक आहे; तिच्यावरुन मासेदोनियांतील लोकांजवळ मी तुम्हांविशयीं अभिमानान­ म्हणत आह­ कीं अखया एका वर्शामाग­च तयार झाली. आणि या तुमच्या आस्थेन­ त्यांतील बहुतेकांस उत्तेजन प्राप्त झाल­ आहे.
  
3. तरी याबाबतीत तुम्हांविशयींचा आमचा अभिमान व्यर्थ होऊं नये म्हणून मी ह्या बंधूस पाठविल­ आहे, यासाठीं कीं मीं सांगितल­ होत­ तस­ तुम्हीं तयार असाव­;
  
4. नाहीं तर कदाचित् कोणी मासेदोनियाकर माझ्याबरोबर आले आणि तुम्ही तयार नाहीं अस­ त्यांना पाहिल­, तर या भरवशाविशयीं आमची (तुमची म्हणत नाहीं ) फजिती होईल.
  
5. यास्तव तुमच­ पूर्वी देऊं केलेले उपकारक दान जमा करण्याची व्यवस्था करावी; त­ कृपणतेन­ नव्हे तर उपकारबुद्धीन­ दिलेले अस­ तयार असाव­, म्हणून अगाऊ तुम्हांकडे जाण्याची बंधुवर्गाजवळ विनंति करण­ मला जरुरीच­ वाटल­.
  
6. ह­ ध्यानांत आणा कीं जो राखून पेरितो तो त्याच मानान­ त्याची कापणी करील; आणि जो सढळ हाताने पेरितो तो त्याच हातान­ त्याची कापणी करील.
  
7. प्रत्येकान­ आपापल्या मनांत ठरविल्याप्रमाण­ द्याव­; दुःखान­ किंवा जरुर पडत­ म्हणून देऊं नये; कारण ‘संतोशान­ देणारा देवाला’ आवडतो.
  
8. सर्व प्रकारची कृपा तुम्हांवर विपूल होऊं देण्यास देव शक्तिमान् आहे; यासाठीं कीं तुम्हांस सर्व गोश्टीत सगळा पुरवठा नेहमी होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी तुम्हांजवळ सर्व कांहीं विपुल व्हाव­.
  
9. त्यान­ चहूंकडे दिलें आहे; गरिबांस दानधर्म केला आहे; त्याची धार्मिकता युगानुयुग राहते, अस­ शास्त्रांत लिहिल­ आहे.
  
10. जो ‘पेरणा-याला बीं’ पुरवितो व ‘खाण्याकरितां अन्न’ पुरवितो तो तुम्हांस बीं पुरवील व त­ पुश्कळ करील आणि ‘तुमच्या धार्मिकतेच­ फळ वाढवील;’
  
11. म्हणजे तुम्ही सर्व प्रकारच्या औदार्यासाठी सर्व गोश्टींनीं धनसंपन्न व्हाल; त्या औदार्यावरुन आमच्या द्वार­ देवाच­ आभारप्र्रदर्शन होते.
  
12. ही सेवा केल्यान­ पवित्र जनांच्या गरजा पुरविल्या जातात; इतक­च केवळ नव्हे, तर देवाच­ फार आभारप्रदर्शन केल्यान­ ती अतिशय होते;
  
13. या सेवेच्या योग­ तुमची लायकी पटते; तुम्ही खिस्तसुवार्तेच्या केलेल्या पत्करान­ इमान­इतबार­ वागता; यांमुळे, आणि त्यांच्यासाठीं व सर्वांसाठी दान देण्याच­ ज­ तुमच­ औदार्य यांमुळ­, ते देवाचा महिमा वर्णितात;
  
14. आणि तुम्हांवर देवाची अतिशय कृपा असल्यामुळ­ ते तुम्हांकरितां प्रार्थना करितात व तुमच्या भेटीविशयीं उत्कंठित आहेत.
  
15. देवाच्या अवर्णनीय दानाबद्दल त्याची स्तुति असो.