Home / Marathi / Marathi New Testament / Web / 2 Peter

 

2 Peter, Chapter 2

  
1. तरी (इस्त्राएल) लोकांतहि खोटे संदेश्टे होते तसे तुम्हांतहि खोटे शिक्षक उत्पन्न होतील; ते नाशकारक पाखंडी मत­ गुप्तपण­ प्रचारांत आणितील; ज्या स्वामीन­ त्यांस विकत घेतल­ त्यालाहि ते नाकारतील, आणि आपणांवर आकस्मिक नाश ओढवून घेतील.
  
2. त्यांच्या कामातुरपणाच्या आचरणाच­ अनुकरण पुश्कळ लोक करितील; त्यांच्यामुळ­ सत्यमार्गाची निंदा होईल.
  
3. ते लोभाविश्ट होऊन कृत्रिम भाशणान­ तुम्हांवर पैसे मिळवितील; त्यांच्याकरितां नेमलेला दंड पहिल्यापासूनच विलंब करीत नाहीं, आणि त्यांचा नाश डुकल्या खात नाहीं;
  
4. ज्या देवदूतांनीं पाप केल­ त्यांस देवान­ सोडिल­ नाहीं तर त्यांस नरकांत टाकिल­ आणि न्यायनिवाड्याकरितां राखून अंधकारमय खळग्यांत ठेविल­;
  
5. त्यान­ प्राचीन जगालाहि सोडिल­ नाहीं, तर अभक्तांच्या जगावर जलप्रलय आणिला, आणि धार्मिकतेचा उपदेशक नोहा याच­ सात जणांसह रक्षण केल­;
  
6. पुढ­ होणा-या अभक्तांस उदाहरण देण्यासाठीं सदोम व गमोरा हीं नगरे भस्म करुन त्यास विध्वंसाची शिक्षा केली;
  
7. आणि अधार्मिक लोकांच्या कामातुर वर्तनान­ त्रासलेला धार्मिक लोट याची सुटका केली;
  
8. (तो धार्मिक मनुश्य त्यांच्यामध्य­ राहत होता; तेव्हां त्यांचीं अधार्मिक कृत्य­ पाहून व त्यांविशयीं ऐकून त्याचा धर्मशील जीव दिवस­दिवस कासावीस होत होता;)
  
9. भक्तिमान् लोकांस परीक्ष­तून सोडविण­ व अधार्मिक लोकांस शिक्षा भोगीत न्यायाच्या दिवसासाठीं राखून ठेवण­ ह­ प्रभूला कळत­.
  
10. विशेशतः अमंगळपणाच्या वासनेन­ देहोपभोगाच्या पाठीस लागणारे व अधिकार तुच्छ मानणारे यांस राखून ठेवण­ ह­ प्रभूला कळत­. ते उद्धट, स्वच्छंदी, थोरांची निंदा करण्यास न भिणारे, असे आहेत.
  
11. बळान­ व पराक्रमान­ अधिक असे देवदूतहि प्रभूसमोर त्यांस निंदून दोशी ठरवीत नाहींत.
  
12. ते निर्बुद्ध प्राणी स्वतःस कळत नाहींत अशांविशयीं निंदा करीत असतात; पकडले जाऊन त्यांचा नाश व्हावा एवढ्यासाठी जन्मलेल्या पशूंसारखे ते आहेत; त्यांचा स्वतःच्या भ्रश्टतेन­ नाश होईल.
  
13. अधर्माचरणाच­ वेतन म्हणजे चैनबाजी ह­ ते सुख मानितात, ते डाग व कलंक आहेत; तुम्हांबरोबर मेजवान्या खातांना कपटाच्या मौजा मारितात.
  
14. त्यांचे डोळे वेश्यावृत्तीन­ भरलेले आणि पाप करण्याविशयीं ते हावरे आहेत; ते अस्थिर मनांच्या लोकांना मोह घालितात; त्यांचें हृदय लोभाला सवकलेल­ आहे; ते शापाचीं मुल­ आहेत;
  
15. ते सरळ मार्ग सोडून बहकले, बौराचा पुत्र बलाम याच्या मार्गाला ते अनुसरले; त्याला अधर्माच­ वेतन प्रिय होत­.
  
16. त्याला त्याच्या उल्लंघनाबद्दल वाग्दंड झाला; मुक्या गाढवान­ मनुश्यवाणीन­ बोलून संदेश्ट्याचा वेडेपणा थांबविला.
  
17. ते जलशून्य झरे, वादळान­ उडविलेल­ धुक­, असे आहेत; त्यांच्यासाठी घनांधकाराची काळोखी राखलेली आहे.
  
18. भ्र्रमांत असणा-या लोकांतून ते बाहेर पडले न पडले तोच ते लोक त्यांस व्यर्थपणाच्या फुगीर गोश्टी सांगतात व दैहिक वासनाधीन करुन त्यांस कामातुरपणाचे मोह घालितात.
  
19. ते त्यांस स्वतंत्रेचे वचन देतात आणि स्वतः तर भ्रश्टतेचे दास आहेत; कारण ज्यान­ एकाद्याला जिंकून घेतलेले असत­ त्याचा तो दासहि बनलेला असतो.
  
20. प्रभु व तारणारा येशू खिस्त याच्या ज्ञानाद्वार­ जगाच्या मळांतून सुटल्यावर ते पुनः जर त्यांत गंुतून त्याच्या अधीन झाले तर त्यांची शेवटली दशा पहिल्या दशेपेक्षां वाईट झाली आहे.
  
21. कारण धार्मिकतेचा मार्ग समजून आल्यानंतर आपणांस दिलेल्या पवित्र आज्ञेपासून परावृत्त होण­ यापेक्षां तो न समजण­ ह­ त्यांस बर­ होत­.
  
22. ‘आपल्या ओकीकडे परतलेली ‘डुकरीण,’ अशी जी खरी म्हण आहे तिच्याप्रमाण­ त्यांची गोश्ट झाली आहे.