1. शेवटल्या काळीं कठीण दिवस येतील ह समजून घे.
2. कारण मनुश्ये स्वार्थी, धनलोभी, बढाईखोर, गर्विश्ठ, निंदक, आईबापांस प मानणारीं, कृतघ्न, अपवित्र,
3. ममताहीन, शांतताद्वेशी, चहाड, असंयमी, क्रूर, चांगल्यावर प्रेम न करणारीं,
4. विश्वासघातकी, हूड, मदांध, देवावर प्रेम न करितां विशयावर प्रेम करणारीं,
5. सुभक्तीच केवळ स्वरुप दाखवून स्वतःवर तिचा संस्कार नाहीं, अशीं तीं होतील; त्याजंपासूनहि दूर राहा.
6. जे लोक घरांत हळूच शिरुन पापांनीं भारावलेल्या, नाना प्रकारच्या वासनांनीं बहकलेल्या,
7. सदा शिकत असूनहि सत्याच्या ज्ञानाला कधीं न पोहचणा-या, अशा भोळîा स्त्रियांस वश करितात त्यांपैकीं हेहि आहेत.
8. यात्रेस व यांब्रेस यांनी जस मोशाला अडविल,ं तस हेहि सत्याला अडवितात; हे भ्रश्टबुद्धि बनलेले व विश्वासासंबंधान कसोटीस न उतरलेले असे आहेत.
9. तरी हे अधिक सरसावणार नाहींत; कारण जस त्यांचे मूर्खपण उघड झाल, तस ह्यांचहि सर्वांस उघड होईल.
10. तूं माझ शिक्षण, आचार, संकल्प, विश्वास, सहनशीलता, प्रीति, धीर हीं ओळखून आहेस;
11. आणि अंत्युखियांत, इकुन्यांत व लुस्त्रांत जीं संकट मजवर आलीं तीं सोसण्यांत व माझा जो छळ झाला तो सहन करण्यांत मला अनुसरलास; त्या सर्वांतून प्रभून मला सोडविल.
12. जे खिस्त येशूमध्य सुभक्तीन आयुश्य घालवावयास पाहतात त्या सर्वांचा छळ होईल;
13. आणि दुश्ट व भादू मनुश्य हीं फसवून व स्वतः फसून दुश्टपणांत अधिक सरसावतील.
14. तूं ज्या गोश्टी शिकलास व ज्यांविशयीं तुझी खात्री झाली त्या घरुन राहा.
15. त्या कोणापासून शिकलास ह, आणि तुला पवित्र शास्त्राची माहिती बालपणापासून आहे ह, तुला ठाऊक आहे; त खिस्त येशूमधील तुझ्या विश्वासाच्या द्वार तारणासाठीं तुला ज्ञानी करावयास समर्थ आहे.
16. प्रत्येक ईश्वरप्रेरित शास्त्रलेख, सद्बोध दोश दाखविण, सुधारणूक, नीतिशिक्षण यांकरितां उपयोगी आहे,
17. त्याच्यापासून देवभक्त पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामास सज्ज होतो.