Home / Marathi / Marathi New Testament / Web / Acts

 

Acts, Chapter 11

  
1. प्रेशितांनी व यहूदीया प्रातांत असलेल्या बंधुजनांनीं अस­ ऐकल­ कीं विदेशी लोकांनींहि देवाच­ वचन ग्रहण केल­.
  
2. मग पेत्र यरुशलेमास गेला तेव्हां सुंती लोक त्याजबरोबर वाद घालूं लागले कीं
  
3. बेसुंती माणसांकडे जाऊन त्यांच्या बरोबर तूं जेवलास.
  
4. तेव्हां पेत्रांन­ आरंभ करुन अनुक्रमान­ सविस्तर सांगण्यास सुरुवात केली:
  
5. मीं यापो नगरांत प्रार्थना करीत होता­; तेव्हां देहभान सुटून मीं असा एक दृश्टांत पाहिला कीं एक पात्र उतरल­, ते मोठ्या चांदव्यासारख­ चार कोपरे धरुन आकाशांतून सोडलेल­ अस­ माझ्यापर्यंत आल­;
  
6. त्याकडे मी न्याहाळून पाहून विचार करीत होता­ ता­ पृथ्वीवरले चतुश्पाद प्राणी, श्वापद­, सरपटणारे जंतु व आकाशांतली पाखर­ अशीं दृश्टीस पडलीं;
  
7. आणि मीं अशी वाणीहि ऐकली कीं, पेत्रा ऊठ; मारुन खा;
  
8. परंतु मी म्हणाला­, नको, नको, प्रभू; कारण निशिद्ध किंवा अशुद्ध अस­ कांही माझ्या ता­डात अजून कधीं गेल­ नाहीं.
  
9. मग दुस-यान­ आकाशांतून वाणी होऊन ती मला म्हणाली, देवान­ ज­ शुद्ध केल­ त­ निशिद्ध मानूं नको.
  
10. अस­ तीनदां झाल­; नंतर तीं अवघीं पुनः आकाशांत वर ओढलीं गेलीं.
  
11. इतक्यांत पाहा, ज्या घरांत आम्ही होता­ त्यापुढ­ कैसरीयांतून मजकडे पाठविलेलीं तीन माणस­ उभी राहिलीं.
  
12. तेव्हां आत्म्यान­ मला सांगितल­ कीं कांहीं कांक्षा ना बाळगितां त्यांच्याबरोबर जा. मग हे सहा बंधुहि मजबरोबर आले, आणि आम्ही त्या मनुश्याच्या घरांत गेलां.
  
13. त्यान­ आम्हांला सांगितल­ कीं मीं आपल्या घरी देवदूत उभा राहिलेला पाहिला. तो म्हणाला कीं यापोस कोणाला पाठवून शिमोन पेत्राला बोलावून आण;
  
14. ज्याच्या योग­ तुझ­ व तुझ्या सर्व कुटुंबाच­ तारण होईल अशा गोश्टी तो तुला सांगेल.
  
15. मी बोलूं लागला­ ता­, जसा आरंभी आपल्यावर तसा त्यांजवरहि पवित्र आत्मा आला.
  
16. तेव्हां प्रभून­ सांगितलेली गोश्ट मला आठवली, ती अशी कीं योहान पाण्यान­ बाप्तिस्मा करीत असे खर­; परंतु तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्यान­ होईल.
  
17. जेव्हां आपण प्रभु येशू खिस्तावर विश्वास ठेविला तेव्हां जस­ आपणांस तस­ त्यांसहि देवान­ सारखंेच दान दिल­; तर मग देवाला अडविणारा असा मी कोण?
  
18. ह­ ऐकून ते उगे राहिले, आणि देवाच­ गौरव करीत बोलले, तर मग देवान­ विदेशी लोकांसहि जीवनप्रात्यर्थ पश्चातापबुद्धि दिली आहे.
  
19. स्तेफनावरुन उöवलेल्या संकटामुळ­ जे पांगले होते ते फेनीके, कुप्र व अंत्युखिया एथपर्यंत यहूद्यांस मात्र देवाच­ वचन सांगत असत.
  
20. तरी त्यांजपैकी कित्येक कुप्री व कुरेनेकर होत, त्यांनी अंत्युखियांत येऊन प्रभु येशूची सुवार्ता हेल्लेणी लोकांसहि सांगितली.
  
21. तेव्हां प्रभूचा हात त्यांजबरोबर होता, आणि पुश्कळ लोक विश्वास धरुन प्रभूकडे वळले.
  
22. त्यांजविशयींच­ वर्तमान यरुशलेमांतल्या मंडळीच्या कानी आल­ तेव्हां त्यांनी बर्णबाला अंत्युखियापर्यंत पाठविल­;
  
23. तो तेथंे पोहंचल्यावर देवाची कृपा पाहून हर्शित झाला; आणि त्यान­ त्या सर्वांस बोध केला कीं निश्वयपूर्ण चित्तान­ प्रभूला बिलगून राहाव­.
  
24. तो चांगला मनुश्य होता, आणि पवित्र आत्म्यानें व विश्वासानें पूर्ण होता; तेव्हां प्रभूच्या शिश्यमंडळांत पुश्कळ जणांची भर पडली.
  
25. नंतर तो शौलाचा शोध करावयाला तार्सास गेला;
  
26. त्याचा शोध लागल्यावर त्यान­ त्याला अंत्युखियास आणिल­. मग अस­ झाल­ कीं त्यांनी तेथ­ वर्शभर मंडळीमध्य­ मिळूनमिसळून ब-याच लोकांस शिकविल­; आणि शिश्यांस खिस्ती ह­ नांव पहिल्यान­ अंत्युखियांत मिळाल­.
  
27. त्या दिवसांत यरुषलेमाहून अंत्युखियास संदेश्टे आले.
  
28. तेव्हां त्यांच्यांतील अगब नामक मनुश्यानें उठून आत्म्याच्या योगें सुचविलें कीं सर्व जगांत मोठा दुश्काळ पडणार आहे. हा दुश्काळ क्लौद्याच्या वेळेस झाला.
  
29. तेव्हां प्रत्येक षिश्यानें संकल्प केला कीं यहूदीयांत राहणा-या बंधुजनांच्या मदतीकरितां यथाषक्ति कांहीं पाठवून द्यावें;
  
30. त्याप्रमाणें त्यांनीं केलें, म्हणजे तें बर्णबा व षौल यांच्या हातीं वडीलवर्गाकडे पाठवून दिलें.