1. अंत्युखियाच्या मंडळींत बर्णबा, शिमोन निग्र, लुक्य कुरेनेकर, ज्याच पालन मांडलिक हेरोद राजाच्याबरोबर झाल होत तो मनाएल व शौल हे संदेश्टे व शिक्षक होते.
2. ते प्रभूची सेवा व उपास करीत असतां पवित्र आत्म्यान सांगितल कीं बर्णबा व शौल यांस ज्या कार्यासाठीं मीं बोलाविल आह त्यासाठीं त्यांस मजकरितां निराळ करुन ठेवा.
3. त्यांनी उपास व प्रार्थना करुन आणि त्यांजवर हात ठेवून त्यांची रवानगी केली.
4. याप्रमाण पवित्र आत्म्याच्या द्वार त्यांची रवानगी झाल्यावर ते सलुकीयांत येऊन तारवांतून कुप्रास गेले.
5. मग ते सलमीनांत असतां त्यांनी देवाचे वचन यहूद्यांच्या सभास्थानामध्य गाजविल; आणि योहान हाहि त्यांचा सेवक होता.
6. पुढ ते सर्व बेटा्रतून चालून पफेस गेल्यावर बर्येशू नांवाचा कोणीएक यहूदी जादूगीर व खोटा संदेश्टा त्यांस आढळला.
7. तो तेथील अधिकारी सिर्ग्य पौल नांवाच्या बुद्धिमान् मनुश्याजवळ होता; या अधिका-यान बर्णबा व शौल यांस बोलावून देवाच वचन ऐकण्याची उत्कंठा दर्शविली;
8. परंतु अलीम जादूगीर (याच्या नांवाचा हाच अर्थ आहे,) यान त्यांस अडवून अधिका-याला विश्वासापासून फितवावयाचा प्रयत्न केला.
9. तेव्हां शौल, ज्यास पौलहि म्हणत तो, पवित्र आत्म्यान पूर्ण होत असता त्याजकडे दृश्टी लावून म्हणाला,
10. अरे सर्व कपटान व सर्व लुच्चेगिरीन भरलेल्या सैतानाच्या पुत्रा, अवघ्या धार्मिकतेच्या वै-या, तूं प्रभूचे सरळ मार्ग विपरीत करण्याच सोडून देणार नाहींस काय?
11. तर पाहा, आतां प्रभूचा हात तुला प्रतिकूल आहे, तूं अंधळा होशील, व कांही वेळपर्यंत सूर्य तुला दिसणार नाहीं. तत्क्षणीच धुक व अंधार त्याजवर पडला; तेव्हां आपणाला हातीं धरुन न्याव म्हणून तो इकडे तिकड कोणा मनुश्याचा शोध करुं लागला.
12. तेव्हां ज झाल त पाहून त्या अधिका-यान प्रभूच्या शिक्षणावरुन आश्चर्य मानून विश्वास धरिला.
13. मग पौल व त्याच्या सोबतीचे लोक पफेहून तारवांतून पंफुल्यांतील पिर्गा एथ गेले, आणि योहान त्यांस सोडून यरुशलेमास माघारा गेला.
14. नंतर ते पिर्गा एथून निघून फिरतफरित पिसिदियांतील अंत्युखियास पोहंचले; आणि शब्बाथ दिवशीं सभास्थानांत जाऊन बसले.
15. तेव्हां नियमशास्त्र व संदेश्टे यांचे वाचन झाल्यावर सभास्थानाच्या अधिका-यांनीं त्यांस सांगून पाठविल कीं बंधुजनहो, तुम्हांजवळ लोकांकरितां कांही बोधवचन असल तर सांगा.
16. तेव्हां पौल उभा राहून हातान खुणावून म्हणाला: अहो इस्त्राएल लोकांनो, व देवाच भय बाळगणा-यांनो, ऐका,
17. या इस्त्राएल लोकांच्या देवान आपल्या पूर्वजांस निवडून घेतल, ते लोक मिसर देशांत प्रवासी असतां त्यांचा उत्कर्श केला आणि पराक्रमी भुजान त्यांस तेथून काढिलें.
18. पुढें सुमारें चाळीस वर्शेपर्यंत त्यानें त्यांची वर्तणूक रानांत सहन केली.
19. नंतर त्यान कनान देशांतील सात राज्य बुडवून तेथील भूमि त्यांस सुमार साडेचारश वर्शेपर्यंत वतन अशी दिली.
20. त्यानंतर त्यान शमुवेल संदेश्ट्यापर्यंत त्यांस न्यायाधीश नेमून दिले.
21. मग त्यांनी राजा मागितला; तेव्हां देवाने बन्यामीन वंशातील किशाचा पुत्र शौल ह्यास चाळीस वर्शेपर्यंत त्यांस दिल.
22. नंतर त्यान त्याला दूर करुन त्यांचा राजा होण्यासाठीं दाविदास उभे कंल, आणि त्याजविशयी प्रतिज्ञेन म्हटल कीं माझ्या मनासारिखा इशायाचा पुत्र दावीद मला मिळाला आहे, तो माझ्या सर्व इच्छा सिद्धीस नेईल.
23. ह्या मनुश्याच्या वंशजांत देवान वचनानुरुप इस्त्राएलासाठीं तारणारा येशू ह्यास आणिल;
24. त्याच्या प्रगट होण्याच्या पूर्वी योहानान पुढ येऊन पश्चातापाचा बाप्तिस्मा सर्व इस्त्राएल लोकांमध्य गाजविला होता.
25. योहान आपला कार्यक्रम पूर्ण करीत असतां म्हणाला, मी कोण आह म्हणून तुम्हांस वाटत? मी तो नव्ह, तर पाहा, ज्याच्या पायांतील वहाणा सोडावयास मीं योग्य नाहीं असा कोणी माझ्या मागून येत आहे.
26. अहो बंधुजनहो, अब्राहामाच्या वंशातील पुत्रांनो, व तुम्हांपैकीं देवाच भय बाळगणा-यांनो, आपल्याला या तारणाची वार्ता पाठविलेली आहे.
27. कारण यरुशलेमवासियांनीं व त्यांच्या अधिका-यांनीं त्याला न ओळखून आणि दर शब्बाथ दिवशीं वाचण्यांत येणारे संदेश्ट्यांचे शब्दहि न समजून, त्याला देाशी ठरविल्यान ते पूण केले;
28. आणि मरणदंडाच कोणतहि कारण सांपडल नसतां त्याचा वध करावा अशी त्यांनी पिलातास विनंति केली.
29. मग त्याजविशयीं लिहिलेल सर्व पूर्ण करुन त्यांनीं त्याला खांबावरुन खालीं उतरवून कबरेमध्य ठेविल.
30. देवान त्याला मेलेल्यांमधून उठविल;
31. त्याच्याबरोबर जे गालीलापासून यरुशलेमांत आले होते त्यांच्या दृश्टीस तो पुश्कळ दिवस पडत असे; ते आतां लोकांस त्याचे साक्षी आहेत.
32. आपल्या पूर्वजांस ज वचन दिल होत त्याची सुवार्ता आम्ही तुम्हांस सांगता:
33. देवान येशूला पुनः उठवून त वचन आपल्या मुलांबाळांकरितां पूर्ण केल आहे; दुस-या स्तोत्रांतहि अस लिहिल आहे, ‘तूं माझा पुत्र आहेस; आज मीं तुला जन्म दिला आहे.’
34. शिवाय, त्यान कुजण्याच्या अवस्थेपर्यंत परत जाऊं नये म्हणून त्यान त्याला मेलेल्यांतून उठविल; याविशयीं त्यान म्हटल आहे कीं ‘दाविदाच ज पवित्र व विश्वसनीय दान त तुम्हांला देईन.’
35. यास्तव आणखी एका स्तोत्रांत तो म्हणतो,‘ तूं आपल्या पवित्र पुरुशाला कुजूं देणार नाहींस.’
36. दाविदान आपल्या पिढींत देवाच्या इच्छेप्रमाण सेवा करुन महानिद्रा घेतली, आणि पूर्वजांबरोबर तो मिळून कुजून गेला;
37. परंतु ज्याला देवान उठविल तो कुजला नाहीं;
38. यास्तव बंधुजनहो, तुम्हांस ह ठाऊक असो कीं याच्याद्वार पापांची क्षमा तुम्हांस गाजवून सांगितली आहे;
39. आणि ज्यांविशयीं मोशाच्या नियमशास्त्रान तुम्ही न्यायी ठरत नाहीं त्या सर्वांविशयी याजकडून प्रत्येक विश्वास ठेवणारा न्यायी ठरतो,
40. यास्तव सावध राहा, नाहीं तर संदेश्ट्याच्या ग्रंथांत ज सांगितलेल आहे त तुम्हांवर येईल:
41. पाहा, अहो धिक्कार करणा-यांनो, पाहून आश्चर्य माना, व नाहींतसे व्हा; कारण तुमच्या काळांत मी एक कार्य करिता, त कार्य अस कीं त्याविशयीं तुम्हांला कोणीं सविस्तर सांगतिल तरी तुम्ही विश्वास धरणारच नाहीं.
42. ते बाहेर जातांना लोकांनीं विनंति केली कीं आम्हांस पुढल्या शब्बाथवारी या गोश्टी सांगाव्या,
43. आणि सभा उठल्यावर, यहूद्यांतील व भक्तिमान् यहूदी मतानुसारी यांच्यांतील पुश्कळ जण पौल व बर्णबा यांच्यामाग गेले; त्यांनतर त्यांजबरोबर बोलून देवाच्या कृपत टिकून राहण्यास त्यांच मन वळविल.
44. पुढल्या शब्बाथवारी बहूतेक सर्व नगर देवाच वचन ऐकावयाला जमल.
45. लोकसमुदायांस पाहून यहूदी लोकांस हेव्यामुळ चेव आला आणि पौल ज बोलला त्याचा विरोध करुन ते अपशब्द बोलूं लागले.
46. तेव्हां पौल व बर्णबा हे निर्भीडपण बोलले: देवाच वचन तुम्हांस प्रथम सांगावयाच अगत्य होत, तरी ज्या अर्थी तुम्ही त्याचा अव्हेर करितां व आपणांस सार्वकालिक जीवनाकरितां अयोग्य ठरवितां त्या अर्थी पाहा, आम्हीं विदेशी लोकांकड वळता.
47. कारण प्रभून आम्हांस आज्ञा दिली आहे, ती ही कीं मीं तुला राश्ट्रांचा प्रकाश अस ठेविल आहे, यासाठीं कीं पृथ्वीच्या दिगंतापर्यंत तूं तारण अस व्हाव.
48. हंे ऐकून विदेशी लोक हर्शयुक्त झाले, आणि त्यांनी देवाच्या वचनाचा महिमा वर्णिला; तेव्ळां जितके सार्वकालिक जीवनासाठीं नेमलेले होते तितक्यांनी विश्वास धरिला.
49. प्रभूच वचन त्या सर्व प्रातांत पसरत गेल.
50. तेव्हां यहूदी लोकांनी भक्तिमान् व कुलीन स्त्रियांस व नगरांतील मुख्य पुरुशांस चिथविल आणि पौल व बर्णबा यांचा छळ करुन त्यांस आपल्या प्रांतांतून घालविल.
51. त्यामंळ ते आपल्या पायांची धूळ त्यांजवर झटकून इकुन्यास गेले.
52. इकडे शिश्यमंडळ आनंदान व पवित्र आत्म्यान पूर्ण झाल.