1. मग तो दर्बे व लुस्त्र एथंेहि आला; आणि पाहा, तेथ तीमथ्य नाम कोणी शिश्य होता; तो विश्वास ठेवणा-या कोणीएका यहूदिणीचा पुत्र होता; त्याचा बाप हेल्लेणी होता.
2. तो लुस्त्रांतल्या व इकुन्यांतल्या बंधुवर्गाकडून नांवाजलेला होता.
3. त्यान आपणाबरोबर याव अशी पौलाची इच्छा होतीं; तेव्हां या ठिकाणीं जे यहूदी होते त्यांजमुळ त्यान त्याला घेऊन त्याची संुता केली कारण कीं त्याचा बाप हेल्लेणी आहे ह सर्वास ठाऊक होत.
4. तेव्हां त्यांनीं नगरांमधून जातां जातां यरुशलेमातील प्रेशित व वडीलवर्ग ह्यांनीं जे नियम ठरविले होते ते त्यांस पाळावयाला नेमून दिले.
5. यावरुन मंडळîा विश्वासांत स्थिर झाल्या व दिवसदिवस त्यांची संख्या वाढत चालली.
6. नंतर आसिया देशांत वचन सांगण्यास त्यांस पवित्र आत्म्याकडून अडथळा झाल्यामुळ ते फ्रुगिया व गलतिया ह्या प्रांतांमधून गेले;
7. आणि मुसियापर्यंत आल्यावर बिथुनियास जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला; परंतु येशूच्या आत्म्यान त्यांस जाऊं दिल नाहीं;
8. मग ते मुसियाजकडून जाऊन त्रोवसास खालीं गेले.
9. तेथ रात्रीं पौलाला असा दृश्टांत झाला: कोणी मासेदोनियाचा माणूस उभा राहून आपणाला विनंति करुन म्हणत आहे कीं, इकडे मासेदोनियांत येऊन आम्हांला साहाय् य कर.
10. असा दृश्टांत त्याला झाल्यानंतर त्या लोकांस सुवार्ता सांगावयाला देवान आपल्याला बोलाविल आहे अस अनुमान करुन आम्हीं मासेदोनियांत जाण्याचा लागलाच विचार केला.
11. तेव्हां त्रोवासापासून हाकारुन आम्ही नीट वाटेन समथ्राकेस गेला, व दुस-या दिवशीं नियापुलीस गेला;
12. तेथून फिलिप्पैस गेला, त मासेदोनियाच त्या भागांतल पहिल नगर असून तेथ रोमी लोकांची वसाहत आहे; त्या नगरांत आम्ही कांहीं दिवस राहिला.
13. मग शब्बाथ दिवशीं आम्ही वेशी बाहेरील नदीकाठीं, जेथ प्रार्थना होत असते अस आम्हांस वाटल तेथ, जाऊन बसला; आणि ज्या स्त्रिया तेथ जमल्या होत्या त्यांच्याबरोबर बोलूं लागलांे.
14. तेव्हां थुवतीरा नगराची लुदिया नांवाची कोणीएक स्त्री जांभळीं वस्त्रे विकणारी देवभक्तीण होती; तिन आमच भाशण ऐकल; तिच अंतःकरण प्रभून अस प्रफुल्लित केल कीं पौलाच्या सांगण्याकडे तिन लक्ष दिल.
15. मग तिचा व तिच्या कुटंुबाचा बाप्तिस्मा झाल्यावर तिन अशी विनंति केली कीं मी प्रभूवर विश्वास ठेवणारी आह अस जर तुम्हीं ठरविल आहे तर माझ्या घरीं येऊन राहा. ही विनंति तिन आग्रहान आम्हांकडून मान्य करविली.
16. मग अस झाल कीं आम्ही प्रार्थनास्थळाकडे जात असतां दैवज्ञवार अंगांत असलेली कोणीएक मुलगी आम्हांस आढळली; ती दैवप्रष्न सांगून आपल्या धन्यास पुश्कळ मिळकत करुन देत असे.
17. ती पौलाच्या माग येऊन मोठ्यान बोलली, हीं माणस परात्पर देवाचे दास आहेत; हे तुम्हांला तारणाचा मार्ग कळवितात.
18. अस ती पुश्कळ दिवस करीत असे. मग पौल फार अस्वस्थ होऊन माग फिरुन त्या पिशाचाला म्हणाला, येशू खिस्ताच्या नामान मी तुला आज्ञा करितांे कीं तूं इजमधून निघून जा; आणि त तत्काळ निघून गेल.
19. मग आपल्या मिळकतीची आशा गेली अस पाहून तिच्या धन्यांनीं पौल व सीला यांस धरुन अधिका-यांकडे पेठत ओढून नेल,
20. आणि त्यांनीं त्यांस अधिका-यांपुढ उभ करुन म्हटल, हे पुरुश यहूदी असून आमच्या नगराला फार त्रास देतात,
21. आणि आम्हां रोमी लोकांना जे परिपाठ स्वीकारावयाला व आचरावयाला योग्य नाहींंत ते हे सांगतात.
22. तेव्हां लोक त्यांजवर उठले; आणि अधिका-यांनीं त्यांची वस्त्र फाडून काढून त्यांस छड्या मारावयाची आज्ञा दिली.
23. मग त्यांस पुश्कळसे फटके मारिल्यावर बंदिशाळत टाकून त्यांनीं बंदिशाळेच्या नायकाला त्यांस बंदोबस्तान राखण्याचा हुकूम केला;
24. असा त्याला हुकूम मिळाल्यवर त्यान त्यांस आंतल्या बंदिखान्यांत घलून त्यांचे पाय खोड्यांत अडकविले.
25. सुमार मध्यरात्रीं पौल व सीला हे देवाला प्रार्थना करीत व गाण गात असतां बंदिवान त्यांचे ऐकत होते.
26. तेव्हां एकाएकीं असा मोठा भूमिकंप झाला कीं बंदिशाळेचे पाये डगमगले; सर्व दरवाजे लागलेच उघडले; व सर्वांचे बंद सुटले.
27. तेव्हां बंदिशाळेचा नायक झोपतून जागा होऊन त्यान बंदिशाळेचे दरवाजे उघडे पाहिले, आणि बंदिवान पळाले असतील अस वाटून तरवार उपसून तो आपला घात करणार होता.
28. इतक्यांत पौल मोठ्यान ओरडून म्हणाला, तूं स्वतःला कांही अपाय करुन घेऊं नको; कारण आम्ही सर्व एथच आहा.
29. मग दिवे आणवून तो आंत धावत गेला, कांपत कांपत पौल व सीला यांच्या पाया पडला,
30. आणि त्यांस बाहेर काढून म्हणाला, महाराज, माझ तारण व्हाव, म्हणून मला काय केल पाहिजे?
31. ते म्हणाले, प्रभु येशूवर विश्वास ठेव, म्हणजे तुझ व तुझ्या घराण्याच तारण होईल.
32. त्यांनी त्याला व त्याच्या घरांतील सर्वांस प्रभूच वचन सांगतिल.
33. मग रात्रीच्या त्याच घटकेस त्यान त्यांस जवळ घेऊन त्यांच्या जखमा धुतल्या; आणि तेव्हांच त्यान व त्याच्या सर्वांनीं बाप्तिस्मा घेतला.
34. मग त्यान त्यांस घरीं नेऊन खाऊं घातल, आणि देवावर विश्वास ठेवून सहूकुटंुब हर्श केला.
35. दिवस उगवल्यावर अधिका-यांनीं चोपदारांस पाठवून सांगितल कीं त्या माणसांस सोडून दे.
36. तेव्हां बंदिशाळेच्या नायकान पौलास अस वर्तमान सांगितल कीं तुम्हांला सोडाव म्हणून अधिका-यांनी माणस पाठविली आहेत; तर आतां स्वस्थपण निघून जा.
37. तेव्हां पौल त्यांस म्हणाला, आम्ही रोमी मनुश्य असतां अपराधी ठरविल्यावांचून त्यांनी आम्हांस उघडपण फटके मारुन बंदिशाळत टाकिल; आणि आतां ते आम्हांस गुप्तपण घालवितात काय? अस नको; तर त्यांनी स्वतः येऊन आम्हांस बाहेर न्याव.
38. मग चोपदारांनीं ह वर्तमान अधिका-यांस सांगितल, तेव्हां ते रोमी आहेत अस ऐकून त्यांस भय वाटल.
39. मग त्यांनीं येऊन त्यांची समजूत केली; आणि त्यांस बाहेर आणून नगरांतून निघून जाण्याची विनंति केली.
40. मग ते बंदिशाळतून निघून लुदियेच्या घरीं गेले, बंधुवर्गास भेटून त्यांनीं त्यांच समाधान केले, आणि तेथून ते मार्गस्थ झाले.