1. मग अस झाल कीं अपुल्लो करिंथांत असतां पौल वरच्या प्रांतांमधून जाऊन इफिसांत पोहंचला, तेथ कित्येक शिश्य त्याला आढळल;
2. त्यांस तो म्हणाला, तुम्हीं विश्वास धरिला तेव्हां तुम्हांस पवित्र आत्मा मिळाला काय? त्यांनीं त्याला म्हटल, पवित्र आत्मा दिलेला आहे हंे आम्ही ऐकल देखील नाहीं.
3. तो त्यांस म्हणाला, तर तुम्हीं कसला बाप्तिस्मा घेतला? ते म्हणाले, योहानाचा बाप्तिस्मा.
4. पौलान म्हटल, योहान पश्चातापाचा बाप्तिस्मा देत असे; तो लोकांस सांगत अस कीं माझ्यामागून येणा-यावर म्हणजे येशूवर तुम्हीं विश्वास ठेवावा.
5. ह ऐकून त्यांनी प्रभु येशूच्या नामांत बाप्तिस्मा घेतला;
6. आणि पौलान त्यांजवर हात ठेविले तेव्हां पवित्र आत्मा त्यांजवर आला; ते वेगवेगळîा भाशा बोलूं लागले व ईश्वरी संदेश देऊं लागले.
7. ते अवघे सुमार बारा पुरुश होते.
8. नंतर तो सभास्थानांत देवाच्या राजाच्या गोश्टीविशयीं संवाद करीत व प्रमाण पटवीत निर्भीडपण तीन महिने बोलत गेला.
9. मग कित्येक जण कठोर व विरोधी होऊन लोकांसमक्ष त्या मार्गाची निंदा करुं लागले, तेव्हां त्यान त्यांजमधून निघून शिश्यांसहि वेगळे केले, अािण तुरन्नाच्या शिक्षणगृहांत तो प्रतिदिवशीं संवाद करुं लागला.
10. अस दोन वर्शे चालल्यामुळ आसियांत राहणा-या सर्व यहूदी व हेल्लेणी लोकांनीं प्रभूच वचन ऐकल.
11. देवान पौलाच्या हातून असाधारण चमत्कार घडविले;
12. ते असे कीं रुमाल किंवा फडकीं त्याच्या अंगावरुन आणून रोग्यांवर घातलीं, म्हणजे त्यांचे रोग दूर होत असत व दुश्ट आत्मे त्यांच्यांतून निघून जात असत.
13. तेव्हां कित्येक पंचाक्षरी फिरस्ते यहूदी, दुश्ट आत्मे लागलेल्या लोकांवर प्रभु येशूच नाम उच्चारुन म्हणूं लागले, ज्या येशूची पौल घोशणा करितो त्याची मी तुम्हांस शपथ घालता.
14. अस करणारे इसम एक यहूदी मुख्य याजक स्किवा याचे सात पुत्र होते.
15. त्यांस दुश्ट आत्म्यान जबाब दिला, मी येशूला व पौलालाहि ओळखता; पण तुम्ही कोण आहां?
16. मग ज्या मनुश्यास दुश्ट आत्मा लागला होता त्यान त्यांजवर उडी घालून दोघांस हटविल आणि त्यांवर इतका पगडा बसविला कीं ते उघडेनागडे व घायाळ होऊन त्या घरांतून पळून गेले.
17. तेव्हां इफिसांत राहणारे यहूदी व हेल्लेणी या सर्वांस ह माहीत होऊन भय प्राप्त झाल, आणि प्रभु येषूच्या नामाचा महिमा झाला.
18. विश्वास ठेवणा-या लोकांपैकीं पुश्कळ जणांनीं येऊन आपलीं कृत्य पदरीं घेऊन तीं उघड केली.
19. जादू करणा-यांतील ब-याच लोकांनीं आपलीं पुस्तक जमा करुन सर्वांदेखतां जाळून टाकलीं; आणि त्यांच्या किंमतीचीं बेरीज केली तेव्हां ती पन्नास हजार रुपये झाली.
20. याप्रमाण प्रभूच वचन सामर्थ्यान वाढत जाऊन प्रबल झाल.
21. ह झाल्यावर मासेदोनिया व अखया ह्या प्रांतांतून यरुशलेमास जाव असा पौलान आपल्या मनांत निश्चय केला व म्हटल, तेथ गेल्यानंतर मला रोम शहरहि पाहिल पाहिजे.
22. मग आपली सेवा करणा-यांपैकीं तीमथ्य व एरास्त या दोघांस मासेदोनियास पाठवून तो स्वतः कांही दिवस आसियांत राहिला.
23. ह्या सुमारास त्या मार्गाविशयीं बरीच चळवळ झाली.
24. कारण कीं देमेत्रिय नांवाचा कोणीएक सोनार अर्तमी देवीचे रुप्याचे देव्हारे करुन कारागिरांस बराच कामधंदा लावून देत असे;
25. त्यान त्यांस व तसल्याच इतर कारागिरांस जमवून म्हटल, गड्यांनो, ह्या धंद्यान आपल्याला पैसे मिळतात ह तुम्हांस ठाऊक आहे.
26. तुम्ही पाहतां व ऐकता कीं इफिसांत केवळ नव्हे तर बहुतेक सर्व आसिया देशांत, हातांनीं केलेल्या आकृति देव नाहींत अस या पौलान बोलून व पुश्कळ लोकांच्या मनांत भरवून त्यांना फितविल आहे;
27. ह्यामुळ ह्या आपल्या धंद्याचीं अपकीर्ति होईल अस भय आहे; इतकच नव्हे, तर ज्या महादेवी अर्तमाची भक्ति सर्व आसिया व जगहि करित, तिच देऊळ तुच्छवत् व ती स्वतः महत्त्वभ्रश्ट होईल असहि भय आहे.
28. ह ऐकल्यावर ते क्रोधाविश्ट होऊन ओरडूं लागले कीं इफिसकरांची अर्तमी थोर.
29. इतक्यांत नगरांत धांदल उडाली; आणि पौलाचे वाटतल सोबती मासेदोनियाकर गायस व अरिस्तार्ख यांस पकडून त्यांस ओढीत ओढीत ते एकचित्तान नाटकगृहांत धावत गेले.
30. तेव्हां गर्दीत जाव अस पौलाच्या मनांत होत, पण शिश्यांनीं त्याला जाऊं दिल नाहीं.
31. शिवाय आसियाच्या अधिका-यांतील कित्येक त्याचे मित्र होते, त्यांनीं त्याला निरोप पाठवून विनंति केली कीं नाटकगृहांत जाऊन स्वतःला धोक्यांत घालूं नये.
32. तेव्हां कोणी कांहीं, कोणी कांहीं, अशा आरोळîा मारल्या; लोकांचा एकच गाधळ उडाला; आणि आपण कशाला जमला आहा ह बहुतेकांस कळल नाहीं.
33. मग अलेक्सांद्र याला यहूदी लोकांनीं पुढ ढकलल्यावर कित्येकांनीं त्याला गर्दीतून बाहेर ओढिल; तेव्हां अलेक्सांद्र हातान खुणावून लोकांची समजूत घालण्यास पाहत होता;
34. परंतु तो यहूदी आहे अस समजल्यावर, सुमार दोन तासापर्यंत, इफिसकरांची अर्तमी थोर, अशी सर्वांची एकच आरोळी झाली.
35. मग नगराचा शिरस्तेदार लोकांना शांत करुन म्हणाला, अहो इफिसकरांनो, महान् अर्तमीचा व ज्युपितरापासून पडलेल्या मूर्तीचा पुजारी इफिस नगर आहे, ह ज्याला ठाऊक नाहीं असा कोण माणूस आहे?
36. या गोश्टी निर्विवाद आहेत म्हणून तुम्हीं शांत असाव, कांही उतावळी करुं नये.
37. कारण जीं मनुश्य, तुम्हीं एथ आणिली आहेत तीं देवालय लुटणारी किंवा आपल्या देवीची निंदा करणारीं अशी नाहींत.
38. यास्तव देमेत्रिय व त्याच्या सोबतीचे कारागीर यांचा कोणाशीं वाद असल्यास न्यायगृह उघडी आहेत व न्यायाधीशहि आहेत, त्यांजपुढ त्यांनीं एकमेकांवर आरोप ठेवावा;
39. पण दुस-या एखाद्या गोश्टीची मागणी असली तर तीबद्दल कायदेशीर सभत ठरविल जाईल.
40. या दंगलांचे कारण काय ह्याचा जबाब आपणांस देतां येण्यासारखा नसल्यामुळ आजच्या प्रसंगावरुन आपणांवर बंड केल्याचा आरोप येण्याच भय आहे.
41. अस बोलून त्यान सभा विसर्जन केली.