1. मग पौल धर्मसभेकडे स्थिर दृश्टी करुन म्हणाला, बंधुजनहो, मी आजपर्यंत देवाबरोबर पूर्ण सöावकरुन प्रजाधर्मान वर्तला.
2. तेव्हां प्रमुख याजक हनन्या यान त्याच्याजवळ उभ राहणा-यांस त्याच्या ताडांत मारण्याची आज्ञा केली.
3. तेव्हां पौल त्याला म्हणाला, हे चुना लावलेल्या भिंती, तुला देव मारील; तूं नियमशास्त्राप्रमाण माझा न्याय करावयाला बसला असातां नियमशास्त्राविरुद्ध मला मारण्याची आज्ञा देतोस काय?
4. तेव्हां जवळ उभे राहणारे म्हणाले, देवाच्या प्रमुख याजकाची तूं निंदा करितोस काय?
5. पौलान म्हटल, बंधुजनहो, हा प्रमुख याजक आहे ह मला ठाऊक नव्हत; तूं ‘आपल्या लोकांच्या अधिका-यांविरुद्ध वाईट बोलू नका’ अस लिहिल आहे.
6. तेव्हां त्यांच्यामध्य एक भाग सदूकी व एक भाग परुशी आहे, अस ताडून पौल धर्मसभेमध्य मोठ्यान म्हणाला, बंधुजनहो, मी परुशी आहे व परुश्यांचा पुत्र आह; आमची आशा व मेलेल्यांच पुनः उठण यांसंबधान माझी चौकशी होत आहे.
7. तो ह बोलत आहे ताच परुशी व सदूकी यांचा कलह होऊन लोकसभेत फूट पडली.
8. कारण पुनः उठण होत नाहीं आणि देवदूत व आत्माहि नाहीं, अस सदूकी म्हणतात; परुशी तर ह्या दोन्ही गोश्टी मान्य करितात.
9. तेव्हां मोठा गलबला झाला; आणि जे शास्त्री परुश्यांच्या पक्षाचे होते त्यांच्यांतून कांही उठून भांडत म्हणाले, या मनुश्याच्या ठायीं आम्हांस कांही वाईट दिसत नाहीं; जर आत्मा किंवा देवदूत त्याजबरोबर बोलला असला तर मग कस?
10. असा त्यांचा मोठा कलह चालला असतां ते पौलाला फाडून टाकतील अस भय वाटून सरदारान शिपायांस हुकूम केला कीं खालीं जाऊन त्याला त्यांजमधून सोडवून गढींत आणाव.
11. त्याच रात्रीं प्रभु त्याजपुढ उभा राहून म्हणाला, धीर धर; जशी तूं यरुशलेमांत मजविशयींची साक्ष दिली तशी रोम येथंेहि तुला द्यावी लागेल.
12. मग दिवस उगवल्यावर, कित्येक यहूदी कट करुन स्वतःस शपथेन बद्ध करुन घेऊन म्हणाले, आपण पौलाचा जीव घेईपर्यंत खाणारपिणार नाहीं.
13. हा कट करणारे इसम चाळिसांहून अधिक होते.
14. ते मुख्य याजक व वडीलमंडळ यांजकडे येऊन म्हणाले, पौलाचा जीव घेईपर्यंत आम्ही अन्नाला शिवणार नाहीं, अशा कडकडीत शपथेन आम्ही आपणांस बद्ध करुन घेतल आहे.
15. तर आतां त्याजविशयीं आणखी कांहीं बारकाईन विचारपूस करावयाची आहे, या निमित्तान त्याला आपणाकडे आणाव अस तुम्हीं सभेसहित सरदाराला समजाव; म्हणजे तो जवळ आला न आला ताच त्याचा जीव घेण्यास आम्ही तयार आहा.
16. ते दबा धरुन बसल्याच पौलाच्या भाचान ऐकल, आणि गढींत जाऊन त्यान पौलाला त सांगितल.
17. तेव्हां पौलान एका जमादाराला बोलावून म्हटल, या तरुणाला सरदाराकडे घेऊन जाव; याला त्यास कांहीं सांगावयाच आहे.
18. तेव्हां त्यान त्याला सरदाराकडे नेऊन म्हटल, बंदिवान पौल यान मला बोलावून विनंति केली कीं या तरुणाला आपणाकडे आणाव, त्याला आपणाबरोबर कांही बोलावयाच आहे.
19. तेव्हां सरदारान त्याचा हात धरुन त्याला एकीकडे नेऊन विचारिल, मला सांगावयाच आहे त काय?
20. तो म्हणाला, यहूद्यांनीं असा एकोपा केला आहे कीं पौलाविशयीं आणखी कांही बारकाईन विचारपूस करावयाच्या निमित्तान त्याला उद्यां खालीं सभेमध्य आणाव, अशी आपणाकडे विनंति करावी.
21. तर आपण त्याच ऐकूं नये; कारण त्यांच्यापैकीं चाळिसांहून अधिक माणस त्याच्यासाठीं दबा धरुन बसलीं आहेत; त्यांनीं शपथ घेतली आहे कीं त्याला जिव मारीपर्यंत आपण खाणारपिणार नाहीं; आणि आतां ते तयार होऊन आपली कबुली मिळण्याची वाट पाहत आहेत.
22. तेव्हां तूं ह मला कळविल ह कोणाला सांगू नको, अस सरदारान त्या तरुणाला बजावून सांगून त्याला निरोप दिला.
23. मग त्यान दोघां जमादारांस बोलावून सांगितल, कैसरीया एथ जावयाला दोनश शिपाई, सत्तर स्वार व दोनश भालेकरी असे प्रहर रात्रीस तयार करुन ठेवा;
24. आणि पौलाला बसवून फेलिक्स सुभेदाराकडे संभाळून नेण्याकरितां पाठाळें मिळवा.
25. शिवाय त्यान अशा मजकुराच पत्र लिहिल:
26. नामदार फेलिक्स सुभेदार यांस क्लौद्य लुसिया याचा सलाम.
27. ह्या मनुश्यास यहूद्यांनीं धरिल होत आणि त्याचा घात त्यांजकडून होणार होता, इतक्यांत हा रोमी आहे, अस कळल्यावरुन मीं शिपाई घेऊन जाऊन त्याला सोडविल;
28. आणि याजवर आरोप आणल्याच काय कारण होत ह समजून घेण्याच्या इच्छन त्याला त्यांच्या धर्मसभत खालीं नेले;
29. तेव्हां त्यांच्या नियमशास्त्रांतील वादग्रस्त गोश्टींसंबंधीं त्याजवर कांही ठपका आणिला होता, परंतु मरणाची किंवा बंधनांची शिक्षा देण्याजोगा असा त्याजवर आरोप नव्हता, अस दिसून आल.
30. या मरणाविरुद्ध कट होणार आहे अशी मला खबर लागतांच मीं त्याला आपल्याकडे पाठविल आहे, वाद्यांसहि आपल्यासमोर खटला चालविण्यास सांगतिल आहे. (सुखरुप असाव.)
31. शिपायांनीं हुकूमाप्रमाणे पौलाला रात्रीस अंतिपत्रिसास नोल;
32. आणि दुस-या दिवशीं त्याजबरोबर जाण्यास स्वार ठेवून ते गढींत परत आले.
33. स्वारांनीं कैसरीयांत जाऊन सुभेदाराला पत्र देऊन पौलालाहि त्याजपुढ उभे केल.
34. त्यान पत्र वाचून विचारल, हा कोणत्या प्रांताचा आहे? तो किलिकियाचा आहे अस समजल्यावर,
35. त्यान म्हटल, तुझे वादी आले म्हणजे मीं तुझ ऐकेन; आणि त्यान त्याला हेरोदाच्या वाड्यांत ठेवाव असा हुकूम सोडिला.