Home / Marathi / Marathi New Testament / Web / Acts

 

Acts, Chapter 24

  
1. पांच दिवसांनंतर प्रमुख याजक हनन्या कांहीं वडीलमंडळ आणि तिर्तुल्ल नाम­ कोणीएक वकील यांस घेऊन खालीं आला; आणि त्यांनीं सुभेदाराला पौलाविरुद्ध मजकूर कळविला.
  
2. त्याला बोलाविल्यावर तिर्तुल्ल त्याजवर दोशारोप करुं लागला, तो येणेप्रमाण­: नामदार फेलिक्स महराज, आपल्यामुळ­ आम्हांस फार स्वस्थता मिळाली आहे, आणि आपल्या दूरदर्शीपणान­ या राश्ट्रांत सुधारणा होत आहे;
  
3. यास्तव तिचा आम्ही पूर्ण कृतज्ञेन­, सर्व प्रकार­ व सर्वत्र आदर करिता­.
  
4. तरी आपला अधिक खोळंबा करुं नये म्हणून विनंति करिता­ कीं मेहरबानीन­ आमच­ थोडक्यांत ऐकाव­.
  
5. हा माणूस केवळ पीडा असा आम्हांस आढळला आहे, आणि जगांतल्या सर्व यहूदी लोकांत बंड उठविणारा असून नासोरी लोकांच्या पंथाचा पुढारी आहे;
  
6. ह्यान­ मंदिरहि विटाळविण्याचा प्रयत्न केला; त्याला आम्हीं धरिल­; (व आमच्या नियमशास्त्राप्रमाण­ याचा न्याय ठरविण्यास पाहत होता­;
  
7. पण लुसिया सरदारान­ येऊन, मोठ्या जबरदस्तीन­ याला आमच्या हातांतून काढून नेल­;
  
8. आणि याच्या वाद्यांस आपणाकडे येण्याची आज्ञा केली;) याची आपण चौकशी कराल तर ज्या गोश्टींचा दोशारोप आम्ही त्याजवर करिता­, त्या सर्वांविशयीं त्याजकडूनच आपणाला समजेल,
  
9. तेव्हां या गोश्टी अशाच आहेत, अस­ बोलून यहूद्यांनींहि पुश्टीकरण दिल­.
  
10. मग सुभेदारान­ बोलण्यास खुणाविल्यावर पौलान­ उत्तर दिल­: आपण बहुत वर्शे या लोकांचे न्यायाधीश आहां ह­ मला ठाऊक आहे, म्हणून मी आपल्या गोश्टीविशयीं संतोशान­ प्रत्युत्तर देता­.
  
11. आपणांस सहज समजेल कीं मला यरुशलेमांत भजन करावयास जाऊन अजून बारांपेक्षां अधिक दिवस झाले नाहींत;
  
12. आणि मंदिरांत, सभास्थानांत किंवा नगरांत कोणाबरोबर वादविवाद करितांना किंवा लोकांत बंडाळी माजवितांना मी त्यांस आढळला­ नाहीं.
  
13. ज्या गोश्टीचा दोशारोप ते मजवर आतां करीत आहेत, त्यांची आपणापुढ­ त्यास शाबिती करितां येत नाहीं.
  
14. तरी इतकंे आपणाजवळ कबूल करिता­ कीं ज्या मार्गाला ते विपथ म्हणतात त्या मार्गाप्रमाण­ ज­ ज­ नियमशास्त्रानुसार आहे व ज­ ज­ संदिश्टलेखांत आहे त्या सर्वांवर विश्वास ठेवून मी आमच्या पूर्वजांच्या देवाची सेवा करिता­;
  
15. आणि धार्मिकांचे व अधार्मिकांचेहि पुनः उठण­ होईल, अशी जी ते आशा धरितात तीच आशा मी देवाकडे पाहून धरिता­.
  
16. यामुळ­ देवासंबंधान­ व मनुश्यासंबंधान­ माझ­ मन सतत षुद्ध राखण्याचा मी यत्न करिता­.
  
17. मी पुश्कळ वर्शांनीं आपल्या लोकांत दानधर्म करावयास व अर्पण­ वाहावयास आला­;
  
18. हीं करीत असतां मी व्रतस्थ असा मंदिरांत आढळला­, माझ्याबरोबर लोकांचा घोळका नव्हता, अगर दंगल होत नव्हता; तरी तेथ­ आसियाचे कित्येक यहूदी होते;
  
19. त्यांचे माझ्याविरुद्ध कांही होत­ तर त्यांनीं आपणापुढ­ येऊन मजवर दोशारोप करावयाचा असता;
  
20. किंवा यांनीं तरी सांगाव­ कीं मीं धर्मसभेपुढ­ उभा राहिला­ असतां माझा कोणता अपराध यांस दिसून आला.
  
21. यांच्यामध्य­ उभे राहून, मेलेल्यांच्या पुनः उठण्याविशयीं माझा न्याय आज तुम्हांकडे होत आहे, हे शब्द मी मोठयान­ बोलला­; हा माझा उद्धार अपराध असला तर असेल.
  
22. फेलिक्साला त्या मार्गाची चांगली माहिती असल्यामुळ­ त्यान­ खटला तहकूब करुन म्हटल­, लुसिया सरदार येईल तेव्हां तुमच्या प्रकरणाचा निकाल करीन;
  
23. आणि त्यान­ जमादाराला हुकूम केला की याजवर रखवाली ठेवावी; तरी याला मोकळीक असावी; आणि याच्या स्वकीयांस याची सेवा करण्याविशयीं मनाई नसावी.
  
24. मग कांही दिवसानंतर फेलिक्स आपली यहूदीण बायको द्रुसिल्ला इच्यासहित आला, व त्यान­ पौलाला बोलावून खिस्त येशूवरील विश्वासाविशयीं त्याजपासून ऐकून घेतल­.
  
25. तेव्हां धार्मिकता, इंद्रियदमन व भावी न्याय यांविशयीं तो भाशण करीत असतां, फेलिक्सान­ भयभीत होऊन म्हटल­, आतां तूं जा; संधि सांपडली म्हणजे तुला बोलावीन.
  
26. आणखी आपणास पौलाकडून द्रव्य मिळेल अशी आशाहि त्यान­ धरिली. यास्तव त्याला पुनः पुनः बोलावून आणून तो त्याच्याबरोबर संभाशण करीत असे.
  
27. पुढ­ दोन वर्शानंतर फेलिक्साच्या जागेवर पुर्क्य फेस्त हा आला; तेव्हां यहूद्यांची मर्जी संपादण्याच्या इच्छेन­ फेलिक्स पौलाला कैद­तच ठेवून गेला.