Home / Marathi / Marathi New Testament / Web / Acts

 

Acts, Chapter 25

  
1. मग फेस्त सुभ्यांत येऊन तीन दिवसांनी कैसरीयाहून यरुशलेमास वर गेला.
  
2. तेव्हां प्रमुख याजक व यहूद्यांतील मुख्य पुरुश यांनीं त्याजकडे पौलावर फिर्याद केली;
  
3. 3आणि, मेहरबानी करुन त्याला यरुशलेमांत बोलावून घ्याव­, अशी त्याकडे विनंति केली; ते वाट­त त्याचा घात करण्याकरितां दबा धरण्याच्या व्यवस्थंेत होते.
  
4. फेस्तान­ उत्तर दिल­, पौल कैसरीयांत कैद­त आहे, मी स्वतः लवकरच जाणार आह­ं;
  
5. म्हणून त्या मनुश्याचा कांही अपराध असला तर तुम्हांतील प्रमुखांनीं माझ्याबरोबर येऊन त्याजवर आरोप ठेवावा.
  
6. मग तो त्यांजमध्य­ आठदहा दिवस राहून कैसरीयास खालीं गेला; आणि दुस-या दिवशीं न्यायासनावर बसल्यावर त्यान­ पौलाला आणावयाचा हुकूम केला.
  
7. तो आल्यावर यरुशलेमाहून आलेले यहूदी यांनीं त्याच्यासभोवत­ उभे राहून ज्यांचा पुरावा त्यांच्यान­ करवेना असे पुश्कळ भयंकर आरोप त्याजवर ठेविले;
  
8. पौलान­ प्रत्युत्तर केल­ कीं मीं यहूद्यांच्या नियमशास्त्राचा, मदिराचा किंवा कैसराचा कांही अपराध केला नाहीं.
  
9. तेव्हां यहूद्यांची मर्जी संपादावी अशा इच्छेन­ फेस्त पौलाला म्हणाला, यरुशलेमास जाऊन तेथ­ माझ्यापुढ­ या गोश्टींविशयीं तुझा न्याय व्हावा अशी तुझी इच्छा आहे काय?
  
10. तेव्हां पौलान­ म्हटले, कैसराच्या न्यायासनापुढ­ मी उभा आह­, एथ­च माझा न्याय व्हावा; मीं यहूद्यांचा कांही अन्याय केला नाहीं, ह­ आपणहि चांगल­ ओळखतां.
  
11. मीं अन्याय केला असला किंवा मरणास योग्य अस­ कांही केल­ असल­ तर मी मरावयास अमान्य नाहीं; परंतु ते मजवर जे आरोप आणितात, त्यांत जर एकहि खरा ठरत नाहीं, तर त्यांच्या स्वाधीन मला करण्याचा कोणाला अधिकार नाहीं; मी कैसराजवळ न्याय मागता­.
  
12. तेव्हां फेस्तान­ सभेची मसलत घेऊन उत्तर दिल­, कैसराजवळ न्याय मागितला आहेस, तर तूं कैसरापुढ­ जाशील.
  
13. मग कांही दिवस झाल्यावर अग्रिप्पा राजा व बर्णीका हीं कैसरीयास येऊन फेस्ताला भेटली.
  
14. तेथ­ तीं पुश्कळ दिवस राहिलीं; तेव्हां फेस्तान­ राजापुढ­ पौलाच­ प्रकरण काढून म्हटल­, फेलिक्सान­ बंदींत ठेविलेला असा एक मनुश्य एथ­ आहे;
  
15. मी यरुशलेमास गेला­ त­व्हां त्याजवर यहूद्यांच्या मुख्य याजकांनीं व वडील मंडळींनीं फिर्याद करुन त्याजविरुद्ध ठराव व्हावा म्हणून विनंति केली.
  
16. त्यांस मीं उत्तर दिल­ कीं आरोपी व वादी हे समोरासमोर येऊन, आरोपाविशयीं प्रत्युत्तर देण्याचा आरोपीला प्रसंग मिळण्यापूर्वी कोणत्याहि माणसाला दंडाकरितां सोपून द्याव­ अशी रोमी लोकांची रीत नाहीं.
  
17. यास्तव ते येथ­ आल्यावर कांही उशीर न करितां, दुस-या दिवशी न्यायासनावर बसून मीं त्या मनुश्याला आणावयाचा हुकूम केला.
  
18. वादी उभे असतां ज्या वाईट गोश्टींचा त्याजविशयी माझ्या मनंात संशय आला होता त्यांचा आरोप त्यांनी त्याजवर ठेविला नाहीं;
  
19. केवळ त्यांच्या धर्माविशयीं व जो जीवंत आहे म्हणून पौल म्हणतो असा कोणी मृत झालेला येशू याजविशयीं ह्याचा व त्यांचा वाद होता.
  
20. तेव्हां ह्याची चौकशी कशी चालवावी ह­ मला सुचेनास­ झाल्यामुळ­ मीं त्याला विचारिले, यरुशलेमास जाऊन तेथ­ या गोश्टीविशयीं तुझा न्याय व्हावा अशी तुझी इच्छा आहे काय?
  
21. तेव्हां बादशहाच्या निकालासाठीं मला ठेवाव­ अशी पौलान­ मागणी केल्यावरुन मी हुकूम केला कीं याला कैसराकडे पाठवीपर्यंत कैद­ंत ठेवाव­.
  
22. अग्रिप्पा फेस्तला म्हणाला, त्या माणसाच­ ऐकाव­ अस­ माझ्याहि मनांत आहे. त्यान­ उत्तर दिल­, उद्यां त्याच­ ऐकावयास आपल्याला मिळेल.
  
23. दुस-या दिवशीं अग्रिप्पा व बर्णीका हींं मोठ्या थाटान­ येऊन सरदार व नगरांतील मुख्य लोक यांच्यासुद्धां दरबारांत गेलीं, आणि फेस्तान­ हुकूम दिल्यावर पौेलाला तेथ­ आणिल­.
  
24. तेव्हां फेस्त म्हणाला, अग्रिप्पा महाराज, व आम्हांबरोबर असणारे सर्व जनहो, या माणसाला तुम्ही पाहतां ना? ह्यान­ ह्यापुढ­ जीवंत राहूं नये अस­ ओरडत यहूद्यांच्या सर्व समुदायान­ यरुशलेमास व एथ­हि मला अर्ज केला;
  
25. परंतु त्यान­ मरणास योग्य अस­ कांही केल­ नाहीं अस­ मला समजल­, आणि त्यान­ स्वतः बादशहाजवळ न्याय मागितला, म्हणून त्याला पाठवावयाचा मीं निश्चय केला.
  
26. याविशयीं मीं आपल्या स्वामीला काय लिहाव­ अस­ कांही निश्चित नाहीं, म्हणून तुमच्यापुढ­ व विशेश­करुन अग्रिप्पा महाराज, आपणापुढ­ याला आणिल­ आहे; यासाठीं कीं चौकशी झाली म्हणजे मला कांही तरी लिहावयास सांपडेल.
  
27. बंदिवानास पाठवितांना त्याजवरील दोशारोप न कळविण­ ह­ मला ठीक दिसत नाहीं.