23. तेव्हां त्यांनी एक दिवस नेमस्त करुन त्याला सांगितल्यावर त्या दिवशीं पुश्कळ लोक त्याच्या बि-हाडीं आले; त्यांस देवाच्या राज्याविशयीं साक्ष देण्याकरितां आणि येशूविशयीं मोशाच्या नियमशास्त्रावरुन व संदिश्टलेखांवरुन त्यांची खातरी करण्याकरितां तो सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्या विशयाची फोड करीत होता.