Home / Marathi / Marathi New Testament / Web / Acts

 

Acts, Chapter 2

  
1. नंतर प­टेकॉस्ट म्हणजे पन्नासावा दिवस आला तेव्हां ते सर्व एकत्र जमले असतां,
  
2. अकस्मात् मोठ्या वा-याच्या सुसाट्यासारिखा आकाशांतून नाद आला, आणि ज्या घरांत ते बसले होते त­ सर्व त्यान­ भरल­.
  
3. अग्नीच्या जिभांसारख्या वेगवेगळîा झालेल्या जिभा त्यांस दिसल्या; आणि त्या प्रत्येकावर एकएक अशा बसल्या.
  
4. तेव्हां ते सर्व पवित्र आत्म्यान­ परिपूर्ण झाले, आणि आत्म्यान­ जस­ त्यांस वदविल­ तस­ ते अन्य भाशांतून बोलूं लागले.
  
5. त्या वेळेस आकाशाखालच्या प्रत्येक राश्ट्रांतील भक्तिमान् यहूदी यरुशलेमांत राहत होते.
  
6. तो नाद झाल्यावर लोकसमुदाय एकत्र होऊन गा­धळून गेला; कारण कींं प्रत्येकान­ आपापल्या भाश­त त्यांस बोलतांना ऐकल­.
  
7. ते सर्व चकित व विस्मित होऊन म्हणाले, पाहा, हे बोलणारे सर्व गालीली ना?
  
8. तर आपण प्रत्येक जण आपापली जन्मभाशा ऐकता­ ह­ कस­?
  
9. पार्थी, मेदी, एलामी, मेसोपटेम्या, यहूदीया, कप्पदुकिया, पंत, आसिया,
  
10. फ्रुगिया, पंफूलिया, मिसर व कुरणेच्या जवळचा लिबुवा देश यांतले राहणारे, यहूदी व यहूदीयमतानुसारी असे रोमीय प्रवासी,
  
11. क्रेतीय, अरब, असे आपण त्यांस आपापल्या भाशांत देवाचीं महत्कर्मे सांगतांना ऐकता­.
  
12. तेव्हां ते सर्व विस्मित होऊन व गा­धळून जाऊन एकमेकांस म्हणाले, ह­ काय असेल?
  
13. तर कित्येक लोक थट्टा करुन म्हणले, हे नव्या द्राक्षारसान­ मस्त झाले आहेत.
  
14. तेव्हां पेत्र अकरा शिश्यांसुद्धां उभा राहून त्यांस मोठ्यान­ म्हणाला, अहो यहूूदी लोकांनो व यरुशलेमांतील सर्व राहणा-यांनो, ह­ लक्षांत आणा व माझ­ बोलण­ ऐकून घ्या;
  
15. तुम्हांस वाटत­ तसे हे मस्त झाले नाहींत; कारण हा दिवसाचा पहिला प्रहर आहे;
  
16. परंतु हा प्रकार योएल संदेश्ट्याच्या द्वार­ सांगितलेल्या संदेशाप्रमाण­ घडला आहे; तो संदेश असा:-
  
17. देव म्हणतो, शेवटल्या दिवसाांत अस­ होईल की मी आपल्या आत्म्याचा मनुश्यमात्रावर वर्शाव करीन; तेव्हां तुमचे पुत्र व तुमच्या कन्या संदेश देतील, तुमच्या तरुणांस दृश्टांत होतील व तुमच्या वृद्धांस स्वप्न­ पडतील;
  
18. आणखी त्या दिवसांत मी आपल्या दासांवर व आपल्या दासींवर आपल्या आत्म्याचा वर्शाव करीन; म्हणजे तीं संदेश देतील;
  
19. वर आकाशांत उत्पात, व खालीं पृथ्वीवर चिन्ह­, म्हणजे रक्त, अग्नि व धूर्मरुप वाफ अशीं दाखवीन;
  
20. परमेश्वराचा महान् व प्रसिद्ध दिवस येण्यापूर्वी सूर्य अंधकारमय व चंद्र रक्तमय होईल;
  
21. तेव्हां अस­ होईल कीं जो कोणी परमेश्वराच­ नाम घेऊन त्याचा धावा करील तो तरेल.
  
22. अहो इस्त्राएल लोकांनो, या गोश्टी ऐका; नासोरी येशू याच्याद्वार­ देवान­ जीं महत्कृत्य­, व अöुत­ व चिन्ह­े तुम्हांला दाखविलीं त्यांची तुम्हांला माहिती आहे, त्यांवरुन देवान­ तुम्हांकरितां पटविलेला असा तो मनुश्य होता;
  
23. तो देवाच्या संकल्पाप्रमाण­ व पूर्वज्ञानाप्रमाण­ तुमच्या स्वाधीन झाल्यावर तुम्हीं त्याला धरुन अधर्म्याच्या हातांनीं वधस्तंभावर खिळून मारिल­,
  
24. त्याला देवान­ मरणाच्या वेदनांपासून सोडवून उठविल­, कारण त्यान­ मरणाच्या स्वाधीन राहाव­ ह­ अशक्य होत­.
  
25. दावीद त्याजविशयीं अस­ म्हणतो: मीं प्रभूला आपणांपुढ­ नित्य पाहिल­ आहे; मीं ढळूं नये म्हणून तो माझ्या उजवीकडे आहे;
  
26. यास्तव माझ­ हृदय आनंदित, व माझी जीभ उल्लासित झाली; आणखी माझा देहहि आशेमध्य­ निवास करील;
  
27. कारण तूं माझा जीव अधोलोकांत राहूं देणार नाहींस, व आपल्या पवित्र पुरुशाला कुजण्याचा अनुभव येऊं देणार नाहींस.
  
28. जीवनाचे मार्ग तूं मला कळविले आहेत; तूं आपल्या दर्शनान­ मला हर्शभरित करिशील.
  
29. अहो बंधुजनहो, कुलाधिपति दावीद याजविशयीं मी तुम्हांबरोबर प्रशस्तपण­ बोलता­. तो मेला, त्याला पुरल­ व त्याची कबर आतांपर्यंत आपल्यामध्य­ आहे.
  
30. तो संदेश्टा होता आणि त्याला ठाऊक होत­ की देव शपथ वाहून म्हणाला, तुझ्या संततीतील एकाला तुझ्या राजासनावर बसवीन,
  
31. ह्याच­ पूर्वाज्ञान असल्यामुळ­ तो खिस्ताच्या उठण्याविशयीं बोलला कीं त्याचा आत्मा अधोलोकांत राहंू दिला नाहीं, आणि त्याच्या देहाला कुजण्याचा अनुभव आला नाहीं.
  
32. त्या येशूला देवान­ उठविल­ याविशयीं आम्ही सर्व साक्षी आहा­.
  
33. यास्तव तो देवाच्या उजव्या हस्त­ उच्च पदीं बसविलेला आहे व त्याला पवित्र आत्म्याविशयींच­ वचन प्राप्त झाल­ आहे आणि त्यान­, तुम्ही ज­ पाहतां व ऐकतां त­, ओतिल­ आहे.
  
34. दावीद स्वर्गास चढून गेला नाहीं; पण तो स्वतः म्हणतो: परमेश्वरान­ माझ्या प्रभूला सांगितल­ की
  
35. मी तुझ­ वैरी तुझ्या पायांचे आसन करीपर्यंत तूं माझ्या उजवीकडे बैस.
  
36. यास्तव इस्त्राएलाच्या सर्व घराण्यान­ ह­ निश्चयपूर्वक समजून घ्याव­ कीं ज्या येशूला तुम्हीं वधस्तंभावर खिळून मारिल­ त्याला देवान­ प्रभु व खिस्त अस­ करुन ठेविल्रे आहे.
  
37. ह­ ऐकून त्यांच्या अंतःकरणांस चुरचुर लागली, आणि ते पेत्र व इतर प्रेशित यांस म्हणाले, बंधुजनहो, आम्हीं काय कराव­?
  
38. पेत्र त्यांस म्हणाला, पश्चाताप करा, आणि पापांची क्षमा व्हावी म्हणून तुम्ही प्रत्येक जण येशू खिस्ताच्या नामांत बाप्तिस्मा घ्या; म्हणजे पवित्र आत्म्याच­ दान तुम्हांला प्राप्त होईल.
  
39. कारण त­ वचन तुम्हांस, तुमच्या मुलांबाळांस व सर्व ज­ दूर आहेत त्यांस, म्हणजे जितक्यांस प्रभु जो आपला देव स्वतःकडे बोलावील, तितक्यांस आहे.
  
40. आणखी त्यान­ दुस-या पुश्कळ गोश्टींनीं त्यांस साक्ष दिली व बोध करुन म्हटल­, या कुटिल पिढीपासून तुम्ही आपला बचाव करुन घ्या.
  
41. तेव्हां ज्यांनी त्याच­ वचन ग्रहण केल­ त्यांचा बाप्तिस्मा झाला; आणि त्या दिवशीं सुमार­ तीन हजार मनुश्यांची त्यांच्यात भर पडली.
  
42. तीं प्रेशितांच्या शिक्षणांत, संगतींत, भाकर मोडण्îांत व प्रार्थना करण्यांत तत्पर असत.
  
43. तेव्हां प्रत्येक मनुश्याला भय प्राप्त झाल­; आणि प्रेशितांच्या हातून पुश्कळ अöुत­ व चिन्ह­ घडत होतीं.
  
44. तेव्हां सर्व विश्वास ठेवणारे एकत्र होते, आणि त्यांचे सर्व समाईक होत­.
  
45. त­ आपापली जमीन व मालमत्ता विकून जसजशी प्रत्येकाला गरज लागत असे तसतस­ सर्वांस वांटून देत असत.
  
46. ते प्रतिदिवशीं एकचित्तान­ मंदिरांत जात असत; घरीं भाकर मोडीत असत; आणि देवाची स्तुति करीत हर्शान­ व सालस मनान­ अन्न खात असत;
  
47. सर्व लोक त्यांस प्रसन्न असत; आणि तारणप्राप्ति झालेल्या इसमांची प्रभु प्रतिदिवशी त्यांच्यांत भर घालीत असे.