Home / Marathi / Marathi New Testament / Web / Acts

 

Acts, Chapter 8

  
1. त्याच्या वधाविशयीं शौल मान्य होता. त्या दिवसांत यरुशलेमांतल्या मंडळीचा मोठा पाठलाग झाला; म्हणून प्रेशितांखेरीज ते सर्व, यहूदीया व शेमरोन या प्रदेशांत पांगून गेले.
  
2. स्तेफनाला धार्मिक मनुश्यांनीं नेऊन पुरिल­, आणि त्याजसाठीं मोठा शोक केला.
  
3. इकडे शौलान­ मंडळीस हैराण करुन टाकिल­, तो घरोघर जाऊन पुरुशांस व स्त्रियांसहि धरुन आणून तुरुंगांत टाकीत असे.
  
4. तेव्हां जे पांगून गेले ते वचनाची सुवार्ता सांगत देशांतून फिरले,
  
5. आणि फिलिप्पान­ शोमरोन शहरीं जाऊन त्यांस खिस्ताची घोशणा केली.
  
6. तेव्हां लोकसमुदायांनीं ऐकून व फिलिप्प दाखवीत होता तीं चिन्ह­ पाहून त्यान­ सांगितलेल्या गोश्टींकडे एकमतान­ लक्ष दिल­.
  
7. ज्यांस अशुद्ध आत्मे लागले होते त्यांच्यातील पुश्कळांतून ते अशुद्ध आत्मे मोठ्यान­ ओरडून निघन गेले; पुश्कळ पक्षघाती व पांगळीं मनुश्य­ बरीं झालीं;
  
8. आणि त्या नगरांत फार आनंद झाला.
  
9. त्या नगरांत जादूगिरी करुन शोमरोनी लोकांस थक्क करणारा असा शिमोन नावांचा कोणीएक मनुश्य होता, आणि मी कोणी मोठा आह­ अस­ तो सांगत असे.
  
10. सर्व लहानथोर त्याच­ लक्षपूर्वक ऐकून बोलत असत कीं जिला देवाची महाशक्ति म्हणतात ती हा आहे.
  
11. त्यान­ त्यांस दीर्घकाळापासून आपल्या जादूगिरीन­ थक्क केल­ होत­, म्हणून त्यांच­ लक्ष त्याजकडे होत­;
  
12. तरी फिलिप्प देवाच­ राज्य व येशू खिस्ताच­ं नाम यांविशयींची सुवार्ता सांगत होता तेव्हां लोकांनीं विश्वास धरिला; आणि पुरुश व स्त्रिया यांचा बाप्तिस्मा झाला.
  
13. शिमोनान­हि स्वतः विश्वास धरिला व बाप्तिस्मा घेऊन तो फिलिप्पाच्या सहवासांत राहिला, आणि जीं चिन्ह­ व मोठीं अöुत कृत्य­ घडलीं तीं पाहून तो थक्क झाला.
  
14. नंतर शोमरोनान­ देवाच­ वचन स्वीकारिल­ अस­ यरुशलेमांतल्या प्रेशितांनीं ऐकून त्यांजकडे पेत्र व योहान यांस पाठविल­;
  
15. ते तेथ­ आल्यावर त्यांनी, त्यांस पवित्र आत्मा मिळावा म्हणून, त्यांजसाठीं प्रार्थना केली,
  
16. कारण तोपर्यंत त्यांच्यांतील कोणावरहि तो आला नव्हता, केवळ प्रभु येशूच्या नामांत त्यांचा बाप्तिस्मा झाला होता.
  
17. तेव्हां त्यांनीं त्यांजवर आपले हात ठेविले आणि त्यांस पवित्र आत्मा मिळाला.
  
18. नंतर प्रेशितांचे हात ठेविल्यान­ पवित्र आत्मा मिळतो ह­ शिमोनान­ पाहून त्यांस द्रव्य दाखवून म्हटल­,
  
19. ज्या कोणावर मी आपले हात ठेवीन त्याला पवित्र आत्मा मिळावा असा अधिकार मलाहि द्या.
  
20. तेव्हां पेत्र त्याला म्हणाला, तुझ्या रुप्याचा तुझ्याबरोबर नाश होवो, कारण देवाच­ दान पैक्यान­ मिळवावयाचा तूं विचार केला.
  
21. या गोश्टींत तुला भाग किंवा वांटा नाहीं; कारण तुझ­ अंतःकरण देवाच्या दृश्टीन­ नीट नाहीं.
  
22. तूं या आपल्या दुश्टतेचा पश्चाताप करुन प्रभूची प्रार्थना कर, म्हणजे तुझ्या अंतःकरणांतल्या कल्पनेची तुला कदाचित् क्षमा होईल;
  
23. कारण तूं अतिशय कडूपणंत व अधर्माच्या बंधनांत आहेस अस­ माझ्या दृश्टीस येत­.
  
24. तेव्हां शिमोनान­ म्हटल­, तुम्हीं सांगितलेल्या गोश्टींपैकीं कांही मजवर येऊं नये म्हणून तुम्हीच माझ्यासाठीं प्रभूची प्रार्थना करा.
  
25. नंतर त्यांनी साक्ष देऊन प्रभूच­ वचन गाजविल्यावर ते यरुशलेमांत परत आले; तेव्हां त्यांनी शोमरोनी लोकांच्या पुश्कळशा गांवांतून सुवार्ता सांिगतली.
  
26. नंतर प्रभूच्या दूतांने फिलिप्पाला म्हटल­, ऊठ, जी वाट यरुशलेमापासून गज्जाकडे जाते त्या वाटेन­ म्हणजे दक्षिणेकडे जा; ती रान आहे.
  
27. मग तो उठून निघला; आणि पाहा, एक कूशी शंढ, कूशी लोकांची राणी कांदके हिचा मोठा अधिकारी होता व त्याच्या हाती तिच­ सर्व भांडार होत­; तो यरुशलेमांत भजनासाठीं आला होता;
  
28. तो परत जातांना आपल्या रथांत बसून यशया संदेश्ट्याचा ग्रंथ वाचीत होता.
  
29. तेव्हां फिलिप्पाला आत्म्यान­ सांगतिल­, तूं जाऊन त्याचा रथ गांठ.
  
30. फिलिप्प धावत गेला तेव्हां त्यान­ त्याला यशया संदेश्ट्याचा ग्रंथ वाचतांना ऐकल­; त्यावर तो म्हणाला, आपण ज­ वाचीत आहां त­ आपणांस समजत­ काय?
  
31. त्यान­ म्हटल­, कोणीं मार्ग दाखविल्यावांचून मला कस­ समजेल? मग त्यान­ फिलिप्पाला आपल्याजवळ बसावयाला वर बोलाविल­.
  
32. तो जो शास्त्रलेख वाचीत होता तो हा होता: त्याला मंेढरासारिख­ वधासाठीं नेले, आणि जस­ का­करुं आपल्या कातरणा-याच्या पुढ­ गप्प असत­, तसा तो आपल­ ता­ड उघडीत नाहीं
  
33. त्याच्या लीन अवस्थ­त त्याला न्याय मिळाला नाहीं; त्याच्या पिढीच­ वर्णन कोण करील? कारण त्याचा जीव पृथ्वीवरुन घेतला गेला.
  
34. तेव्हां शंढान­ फिलिप्पाला म्हटल­, संदेश्टा कोणाविशयीं अस­ म्हणतो, स्वतःविशयीं किंवा दुस-या कोणाविशयीं, ह­ मला सांगाल का?
  
35. तेव्हां फिलिप्पान­ बोलावयास आरंभ केला व या लेखापासून सुरुवात करुन येशूची सुवार्ता त्याला सांगितली.
  
36. मग वाटेन­ जात असतां ते एका जलसंचयाजवळ आले, तेव्हां शंढ म्हणाला, पाहा ह­ पाणी; मला बाप्तिस्मा घेण्यास काय अडचण?
  
37. (फिलिप्पान­ म्हटल­, जर आपण आपल्या सर्व अंतःकरणान­ विश्वास धरितां तर योग्य आहे. तेव्हां त्यान­ उत्तर दिल­, येशू खिस्त देवाचा पुत्र आहे असा मी विश्वास धरिता­.)
  
38. तेव्हां त्यान­ रथ उभा करावयास सांगितल­; मग फिलिप्प व शंढ असे ते उभयतां पाण्यांत उतरले; आणि त्यान­ त्याला बाप्तिस्मा दिला.
  
39. मग ते पाण्यांतून वर आले तेव्हां प्रभूचा आत्मा फिलिप्पाला घेऊन गेला; म्हणून तो पुनः शंढाच्या दृश्टीस पडला नाहीं; नंतर तो आपल्या वाटेन­ हर्श करीत चालला.
  
40. इकडे फिलिप्प अजोत नगरांत आढळला; आणि कैसरिया एथ­ येईपर्यंत त्याला वाटेत जीं गांव­ लागलीं त्यांतून जातांना त्यान­ सुवार्ता सांगितली.