1. धन्यांनो, तुम्हांसहि स्वर्गांत धनी आहे ह लक्षांत बाळगून तुम्ही आपल्या दासांबरोबर न्यायान व ममतेन वागा.
2. प्रार्थनत तत्पर असा व तिच्यात ईशोपकारस्मरण करीत जाग्त राहा;
3. आणखी आम्हांसाठींहि प्रार्थना करा, अशी कीं खिस्ताच्या ज्या गुजामंळ मी बंधनांतहि आह त सांगावयास देवान आम्हांसाठी वचनाच दार उघडाव;
4. यासाठीं कीं जस मला बोलल पाहिजे तस बोलून मीं त गूज प्रकट कराव.
5. बाहेरच्या लोकांबरोबर सुज्ञतेन वागा; संधि साधून घ्या.
6. तुमच बोलण सर्वदा कृपायुक्त, मिठान रुचकर केल्यासारख असाव, म्हणजे प्रत्येकाला कसकस उत्तर द्यावयाच ह तुम्हीं समजाव.
7. प्रिय बंधु तुखिक, प्रभूमधील विश्वासूं सेवक व माझा सोबतीचा दास, हा माझ कस काय चालल आहे त तुम्हांस कळवील;
8. त्याला मीं तुम्हांकडे यासाठींच पाठविल कीं आमच वर्तमान तुम्हांस कळाव व त्यान तुमच्या मनाच समाधान कराव.
9. त्याबरोबर विश्वासू व प्रिय बंधु अनेसिम, तुम्हांतला एक, यालाहि पाठविल आहे; ते एथील सर्व मजकूर तुम्हांस कळवितील.
10. माझा सोबती बंदिवान अरिस्तार्ख तुम्हांस सलाम सांगतो, आणि बर्णबाचा बंधु मार्क हाहि सलाम सांगतो, (त्याजविशयीं तुम्हांस आज्ञा मिळाल्या आहेत; तो तुम्हांकडे आला तर त्याचा स्वीकार करा;)
11. युस्त नांवाचा येशू सलाम सांगतो; हे संुतेचे बंधु आहेत; हे मात्र देवाच्या राज्याकरितां माझे सहकारी आहेत व ते माझ सात्वंन असे झाले.
12. खिस्त येशूचा दास एपफ्रास जो तुमच्यांतलाच आहे तो तुम्हांस सलाम सांगतो; तो आपल्या प्रार्थनांमध्य सर्वदा तुम्हांसाठीं जीव तोडून विनंति करीत आहे, कीं ईश्वरेच्छेन प्राप्त झालेल्या सर्व स्थितींत तुम्हीं परिपूर्ण व निर्भ्रांत अस स्थिर राहाव.
13. त्याजविशयीं मी साक्ष देता कीं तुम्हांसाठीं व जे लावदिकीयांत व हेरापलींत आहेत त्यांच्यासाठीं तो फार श्रम करीत आहे.
14. प्रिय वैद्य लूक व देमास हे तुम्हांस सलाम सांगतात.
15. लावदिकीयांतील बंधु, नुंफा व तिच्या घरीं जमणारी मंडळी यांस सलाम सांगा.
16. ह पत्र तुमच्यांत वाचून दाखविल्यावर लावदिकीयांतील मंडळींतहि वाचण्यांत याव; व लावदिकीयास गेलेलें पत्र आणवून तुम्हींहि वाचाव अशी व्यवस्था करा.
17. अर्खिप्पला सांगा कीं जी सेवा तुला प्रभूमध्य मिळाली आहे ती पूर्ण करण्यास तिकडे लक्ष दे.
18. मीं पौलान स्वहस्त लिहिलेला सलाम. माझ्या बंधनांची आठवण ठेवा. तुम्हांवर कृपा असो.