15. देवाच्या कृपेला कोणी अंतरुं नये, ‘ कोणीं कडूपणाच्या मुळान अंकुरित होऊन उपद्रव देऊं नये’ व त्यामुळ पुश्कळांस विटाळ होईल तो होऊं नये; कोणीं जारकर्मी असूं नये, किंवा ज्यान एका जेवणासाठीं ‘आपले ज्येश्ठपण विकल’ त्या ‘एसावा’ सारखे कोणीं ऐहिक बुद्धीच असूं नये, याकडे लक्ष द्या.