Home / Marathi / Marathi New Testament / Web / Hebrews

 

Hebrews, Chapter 3

  
1. यास्तव पवित्र बंधूनो, स्वर्गातल्या पाचारणाचे भागीदारहो, आपण स्विकारिलेल्या धर्मांचा प्रेशित व मुख्य याजक येशू याजकडे लक्ष लावा.
  
2. तो आपल्या नेमणा-याशीं ‘विश्वासू होता; तसा ‘मोशेहि देवाच्या सर्व घराण्यांत विश्वासू होता.’
  
3. जितक्यान­ घर बांधणा-याला घरांपेक्षा अधिक सन्मान आहे तितक्यान­ हा मोशापेक्षां अधिक वैभवास योग्य मोजिलेला आहे.
  
4. प्रत्येक घर कोणीं तरी बांधिलेल­ असत­; आणि सर्व वस्तु करणारा देव आहे.
  
5. ज­ पुढ­ सांगावयाच­ होत­ त्याच्या साक्षीसाठीं ‘त्याच्या सर्व घराण्यांत मोशे हा सेवक ह्या नात्यान­ विश्वासू होता.’
  
6. खिस्त हा पुत्र असा ‘त्याच्या घरावर’ होता; आपण आपल्या आशेसंबंधीं भरवसा व आपला अभिमान शेवटपर्यंत दृढ राखिल्यास त्याच­ ते घर आपण आहा­.
  
7. यावरुन, आज जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल,
  
8. तर रानांतील परीक्षेच्या दिवशीं इस्त्राएली लोकांनी चिथवणी केल्याप्रमाण­, तुम्ही आपली मन­ कठीण करुं नका.
  
9. तेथंे तुमच्या वाडवडिलांनी कसोटीस लावून मला पारखल­, आणि चाळीस वर्श­ माझी कृत्य­ पाहिलीं.
  
10. त्यामुळ­ त्या पिढीला कंटाळून मी म्हणाला­, हे सर्वदा भ्रांत मनाचे लोक आहेत, ह्यांनी माझे मार्ग जाणिले नाहींत;
  
11. त्याप्रमाण­ मी रागान­ शपथ वाहून म्हणाला­, हे माझ्याबरोबर विसावा भोगावयाचे नाहींत.
  
12. बंधुजनहो, या शास्त्रलेखांत पवित्र आत्म्यान­ म्हटल्याप्रमाण­ जीवंत देवाला सोडून द्याव­, अस­ अविश्वासाच­ दुश्ट मन तुम्हांतील कोणाच­हि होऊं नये म्हणून जपा.
  
13. जोपर्यंत ‘आज म्हटलेला वेळ आहे तोंपर्यंत एकमेकांस तुम्ही प्रतिदिवशी बोध करा, यासाठीं कीं पापाच्या फसवणुकींन­ तुम्हांतील कोणीं ‘कठीण’ होऊं नय­.
  
14. कारण जर आपण आपला आरंभीचा भरवसा शेवटपर्यंत दृढ धरिला तर खिस्तामध्य­ आपल्याला अंशभाग आहे.
  
15. अस­ म्हटल­ आहे: आज जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल, तर चिथावणींत केल्याप्रमाण­ तुम्ही आपली मन­ कठीण करुं नका.
  
16. यांत सांगितलेल­ ऐकूण ‘चिथावणारे’ ते कोण होते? मेाशाच्या हस्त­ मिसरांतून निघालेले सर्वच नव्हत काय?
  
17. ‘चाळीस वर्शे’ तो कोणास ‘कंटाळली?’ ज्यांनीं पाप केलें, ज्यांचीं ‘प्रेतें रानांत पडलीं,’ त्यांस नव्हे काय?
  
18. ‘शपथ वाहून’ कोणला म्हणाला कीं ‘तुम्ही माझ्या विश्रामस्थानीं येणारच नाही?’ ज्यांनी अवज्ञा केली त्यांसच कीं नाहीं?
  
19. तर अविश्वासामुळ­ त्यांच्यान­ आंत येववल­ नाहीं अस­ आपल्याला दिसून येतंे.