Home / Marathi / Marathi New Testament / Web / Hebrews

 

Hebrews, Chapter 4

  
1. यास्तव ‘त्याच्या विश्रामस्थानीं’ येण्याविशयींचे वचन अद्यापि देऊन ठेविलल­ आह­; त्यामुळ­ तुम्हांतींल कोणीं त्याला अंतरल्यासारख­ दिसूं नये म्हणून धास्ती बाळगून असा.
  
2. त्यांच्यासारखी आपल्यालाहि सुवार्ता सांगण्यांत आली आहे, परंतु ऐकलेल­ वचन त्यांस लाभदायक झाल­ नाहीं; कारण ऐकणा-यांमध्य­ विश्वासाबरोबर त्याच­ सम्मेलन झाल­ नाहीं.
  
3. त्याप्रमाण­ मी आपल्या रागान­ शपथ वाहून म्हणाला­, ते माझ्या विश्रामस्थानीं येणारच नाहींत; या लेखांत त्यान­ सांगितलेल्या ‘विश्रामस्थानीं’ ‘आपण’ जे विश्वास ठेविलेले आहा­ ते ‘येता­;’ त्याचीं ‘कृत्य­’ जगाच्या स्थापनेपासून समाप्त झालीं.
  
4. कारण सातव्या दिवसाविशयींं एका ठिकाणीं त्यान­ अस­ म्हटल­ आहे कीं ‘सातव्या दिवशीं देवान­ आपली सर्व कृत्य­ संपवून विश्रांति घेतली;’
  
5. आणि, ते माझ्या विश्रामस्थानींं येणारच नाहींत, असाहि हा लेख आहे.
  
6. कोणी तरी त्यांत यावयाला पाहिज­ होत­, त­ राहिल­ आहे; आणि ज्यांस पूर्वी सुवार्ता सांगण्यांत आली होती ते अवज्ञेमुळ­ त्यांत आले नाहींत;
  
7. म्हणून इतक्या काळानंतर दाविदाच्या द्वार­ सांगितलेल्या वरील लेखाप्रमाण­ त्यान­ ‘आज’ असा एक दिवसहि ठरविला; तो लेख असाः आज जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल, तर आपलीं मन­ कठीण करुं नका.
  
8. यहोशवान­ त्यांस विसावा दिला असता तर त्यानंतर त्यान­ दुस-या दिवसाविशयीं म्हटल­ नसत­.
  
9. यास्तव देवाच्या लोकांसाठी शब्बाधाचा विसावा राहिला आहे.
  
10. ‘जो कोणी त्याच्या विसाव्यांत आला आहे’ त्यान­, जसा ‘देवान­ आपली कृत्य­ संपवून विसावा घेतला’ तसा ‘आपलींहि कृत्यें संपवून विसावा घेतला आहे.’
  
11. यास्तव त्या ‘विसाव्यांत येण्यास’ आपण होईल तितका प्रयत्न करावा, यासाठीं कीं त्यांच्या अवज्ञेच्या उदाहरणाप्रमण­ कोणीं पतित होऊं नये.
  
12. देवाच­ वचन सजीव, सतेज, कोणत्याहि दुधारी तरवारीपेक्षां तीक्ष्ण, जीव व आत्मा, सांधे व मज्जा यांस भेदून आरपार जाणारें आणि मनाच्या भावाना व कल्पना यांचें परीक्षक अस­ आहे;
  
13. आणि त्याच्या दृश्टीला अदृश्य अशी कोणतीहि सृश्ट वस्तु नाही, तर ज्याच्याबरोबर आपला संबंध आहे त्याच्या दृश्टीला सर्व उघडेवाघड­ आहे.
  
14. तर मग आकाशांतून पास गेलेला देवाचा पुत्र येशू हा थोर प्रमुख याजक आपल्याला आहे, म्हणून आपण जो स्वीकार केला तो दृढ धरुन राहूं.
  
15. कारण ज्याला आपल्या अशक्तपणाच­ दुःख होत नाहीं, असा आपला प्रमुख याजक नाहीं, तर तो सर्व प्रकार­ आपल्याप्रमाण­ पारखलेला होता; तरी निश्पाप राहिला.
  
16. आपल्याला दया प्राप्त व्हावी आणि गरजेच्या वेळीं साहाय्य होण्यासाठीं कृपा मिळावी, म्हणून आपण धैर्यान­ कृपेच्या राजासनाजवळ जाऊं.