Home / Marathi / Marathi New Testament / Web / Hebrews

 

Hebrews, Chapter 6

  
1. यास्तव आपण खिस्ताविशयींच्या मूळारंभींच्या गोश्टी सोडून प्रौढतेप्रत जाण्याचा नेटान­ प्रयत्न करुं; निर्जीव कर्मांचा पश्चाताप, देवावरचा विश्वास,
  
2. आणि बाप्त्स्म्यिांच­, हात वर ठेवण्याच­, मृतांच्या पुनरुत्थानाच­ व सार्वकालिक न्यायाच­ शिक्षण, हा पाया आपण पुनः घालूं नय­.
  
3. देव होऊं देईल तर ह­ आपण करुं.
  
4. कारण जे एकदां प्रकाशित झाले, ज्यांनी स्वर्गीय दानाची रुचि घेतली, जे पवित्र आत्म्याचे वांटेकरी झाले,
  
5. आणि ज्यांनीं देवाच्या सुवचनाची व येणा-या युगाच्या सामर्थ्याची रुचि घेतली,
  
6. ते जर पतित झाले तर त्यांस पश्चाताप होईल अस­ पुनः नवीन करण­ अशक्य आहे; ह­ त्यांचे पतन म्हणजे त्यांनी देवाच्या पुत्राला नव्यान­ वधस्तंभावर खिळण­ व त्याचा उघड अपमान करण­ अस­ आहे.
  
7. कारण जी ‘भूमि’ आपणावर वारंवार पडलेला पाऊस पिऊन आपली लागवड करणा-यांस उपयोगी अशी ‘हिरवळ’ उपजविते; तिला देवाचा आशिर्वाद मिळतो;
  
8. आणि जी भूमि ‘कांटेझाड­ व कुसळ­ उपजविते,’ ती टाकाऊ व शापित होण्याच्या लागास आलेली आहे; तिचा शेवट जळणे हा आहे.
  
9. जरी आम्ही अस­ बोलता­ तरी, प्रिय बंधूंनो, तुमची स्थिति ह्यापेक्षां चांगली व तारणाकडे नेणारी आहे असा आम्हांस तुम्हांविशयीं भरवसा आहे,
  
10. कारण तुमच­ कार्य आणि तुम्हीं पवित्र जनांची केलेली व करीत असलेली सेवा, यावरुन जी प्रीति तुम्हीं त्याच्या नामावर दाखविली तीहि देवान­ विसरावी असा तो अन्यायी नाहीं.
  
11. आमची अशी उत्कंठा आहे कीं तुम्हांपैकीं प्रत्येकान­ आशेची पूर्ण खातरी करुन घेण्यासाठीं तशीच आस्था शेवटपर्यंत बाळगावी;
  
12. म्हणजे तुम्ही आळशी होणार नाहीं, तर जे विश्वासान­ व धीरान­ वचनांचीं फळ­ वारशान­ उपभोगणारे होतात त्यांचे अनुकारी व्हाल.
  
13. देवान­ अब्राहामाला वचन दिल­, तेव्हां त्याला शपथ वाहण्यास स्वतःपेक्षा कोणी मोठा नसल्यामुळ­, त्यान­ ‘आपलीच शपथ वाहून’ म्हटल­ कीं
  
14. ‘मी तुला आशीर्वाद देईनच देईन, व तुझ­ संतान वाढवीनच वाढवीन.’
  
15. त्यान­ धीरान­ वाट पाहिली म्हणून त्याला ह्याप्रमाणे वचनाच­ फळ प्राप्त झाल­;
  
16. मनुश्य­ आपणांपेक्षां मोठ्याची शपथ वाहतात; आणि आपलें स्थापित करण्यासाठीं शपथ ही त्याच्यामध्य­ सर्व वादांचा शेवट आहे.
  
17. यास्तव आपल्या संकल्पाची निर्विकारता वचनाच्या वतनदारांस विशेश दाखवावी या इच्छेन­ देव शपथेच्या द्वार­ मध्यें आला,
  
18. यासाठीं कीं ज्यांविशयीं खोट­ बोलण­ देवाला अशक्य आहे अशा दोन निर्विकार गोश्टींनीं आपल्याला चांगले उत्तेजन याव­; ते आपण, स्वतःपुढ­ ठेवण्यांत आलेली आशा धरुन ठेवण्याकरितां आश्रयास धावला­.
  
19. ती आषा आपल्याला जिवांचा नांगर आहे. तो अचल, बळकट व ‘पडद्याच्या आंतल्या स्थळीं पोहंचणारा’ असा आहे;
  
20. ‘तेथ­ मलकीसदेकाच्या संप्रदायाप्रमाण­ युगानुयुगाचा’ प्रमुख याजक झालेला येशू अग्रगामी असा आपल्याकरितां आंत गेला आहे.