1. हा ‘मलकीसदेक,’ ‘षालेमाचा राजा’ व परात्पर देवाचा याजक होता; अब्राहाम राजास मारुन परत आला तेव्हां त्यान सामोर जाऊन त्याला आशीर्वाद दिला.
2. व त्याला ‘अब्राहामान सर्व लुटीचा दशमांश दिला;’ तो आपल्या नांवाच्या अर्थाप्रमाण एक तर नीतिमत्त्वाचा राजा आणि दुसरा ‘शालेमाचा राजा’ म्हणजे शांतीचा राजा होता;
3. त्याचा बाप, आई, वंशावळ, जन्मदिवस व आयुश्याचा शेवट हीं (सांगितलीं) नाहींत; या गोश्टींनीं जो देवाच्या पुत्रासारखा झालेला तो सतत राहणारा ‘याजक’ असा ठरतो.
4. तर आतां कुलधिपति ‘अब्राहाम’ यान ज्याला लुटींंतील उत्तम वस्तूंचा ‘दशमांश दिला’ तो केवढा मोठा असावा ह पाहा.
5. लेवीच्या संतानांपैकीं ज्याला याजकपण मिळत त्यांस लोकांपासून, म्हणजे अब्राहामाच्या पोटीं जन्म घेतलेल्या आपल्या बंधुवर्गापासून, नियमशास्त्राप्रमाण दशमांश घेण्याची आज्ञा आहे;
6. परंतु ज्याचा वंश त्या लोकांपासून नव्हता त्यान अब्राहामापासून दशमांश घेतला आणि ज्याला वचन मिळालीं होतीं त्याला ‘आशीर्वाद दिला.’
7. श्रेश्ठाकडून कनिश्ठाला आशीर्वाद मिळतो ह निर्विवाद आहे.
8. इकडे पाहतां मर्त्य मनुश्यांला ‘दशमांश मिळतात, परंतु तिकडे, जीवंत राहणारा आहे अशी ज्याविशयीं साक्ष आहे, त्याला मिळाले;
9. आणि दशमांश घेणारा लेवी यानहि अब्राहामाच्या द्वार दशमांश दिलेच अस म्हणतां येईल.
10. कारण ‘त्याच्या बापाला मलकीसदेक भेटला’ त्या वेळेस तो त्याच्या पोटीं होता.
11. यावरुन ज्याच्या संबंधांत लोकांस नियमशास्त्र प्राप्त झाल त्या लेवीय योजकाप्रमाण पूर्णता झाली असतीं तर मलकीसदेकाच्या सपं्रदयाच्या दुस-या ‘याजकाचा उöव व्हावा व त्यान अहरोनाच्या संप्रदायाप्रमाण म्हटलेल नसाव याच काय अगत्य राहिल असत?
12. याजकपण पालटल म्हणजे नियमशास्त्रहि अवश्य पालटत.
13. ज्याच्याविशयीं ह वचन सांगितल ंतो, ज्या वंशांतल्या कोणीहि वेदीजवळ काम केल नव्हत, अशा दुस-या वंशांतला आहे.
14. कारण आपला प्रभु यहूदापासून उत्पन्न्ा झाला ह उघड आहे; त्या वंशांतील याजकपणासंबंधान मोशान कांहीं सांगितल नाहीं;
15. आणि दैहिक आज्ञेच्या नियमान नव्हे तर अक्षय्य् य जीवनाच्या सामर्थ्यान झालेला असा मलकीसदकेसारखा’ दुसरा ‘याजक’ झाला, यावरुन आम्हीं सांगितल त अधिकच स्पश्ट होत.
17. त्याजविशयीं अशी साक्ष आहे: तूं मलकहसदेकाच्या संप्रदयाप्रमाण युगानुयुग याजक आहेस.
18. पूर्वीची आज्ञा कमजोर व निरुपयोगी असल्यामुळ तिचा लोप झाला आहे,
19. (कारण नियमशास्त्रान कशाचीहि पूर्णता झाली नाहीं,) आणि अधिक चांगल्या आशेची स्थापना झालीं आहे; त्या आशेच्या द्वार आपण देवाजवळ जाता.
20. ज्यापेक्षां तो शपथेवांचून याजक झाला नाहीं,
21. (ते तर शपथेवाचंून याजक झालेले आहेत; पण तूं युगानुयुग याजक आहेस अशी शपथ परमेश्वरान वाहिली आणि ती तो बदलणार नाहीं, अस ज्यान त्याजविशयीं सांगितल त्याच्या त्या शपथेन हा याजक झाला.)
22. त्यापेक्षां तो अधिक चांगल्या कराराचा जामीन झाला आहे.
23. त्यांना नेहमीं टिकून राहण्यास मृत्यूचा अडथळा असल्यामुळ पुश्क्ळ याजक होऊन गेले;
24. पण हा ‘युगानुयुग’ राहणारा असल्यामुळ याच याजकपण अढळ आहे.
25. ह्यामुळ याच्या द्वार देवाजवळ जाणा-यांस हा पूर्णपण तारण्यास समर्थ आहे; कारण त्यांच्यासाठीं मध्यस्थी करण्यास हा सर्वदा जीवंत आहे.
26. असाच प्रमुख याजक आपल्याला असण योग्य होत; तो पवित्र, सात्विक, निर्मळ, पापी जनांपासून वेगळा व आकाशाहून उंच करण्यांत आलेला असा आहे.
27. त्याला त्या प्रमुख याजकांप्रमाण पहिल्यान स्वतःच्या पापांसाठीं, मग लोकांच्या पापांसाठी, प्रतिदिवशीं यज्ञ करण्याच अगत्य नाहीं; कारण त्यान स्वतःला अर्पिल्यान त अर्पण एकदाच करुन ठेविल आह.
28. नियमशास्त्र दुर्बळ अशा मनुश्यांस प्रमुख याजक नेमित; पण नियमशास्त्रानंतरच्या शपथेच वचन ‘युगानुयुग’ परिपूर्ण केलेल्या ‘पुत्राला’ नेमित.