1. पहिल्या करारांतहि उपासनेचे विधि होते व पवित्रस्थान होत; पण त पार्थिव होत.
2. कारण पहिला मंडप तयार केलेला होता त्यांत दिव्याच झाड, मेज व समर्पित भाकरी होत्या; त्याला पवित्रस्थान म्हटल आहे;
3. आणि दुस-या पडद्याच्या पलीकडे परमपवित्रस्थान म्हटलेला मंडप होता;
4. त्यांत सोन्याच धुपाटण व सोन्यान सभोवतीं मढविलेला कराराचा कोश होता; या कोशांत मान्ना ठेवलेल सुवर्णपात्र, कळîा आलेली अहरोनाचीं काठी, व कराराच्या पाट्या हीं होतीं;
5. आणि त्याच्यावर गौरवशाली करुबीम दयासनावर छाया करीत होते; यांविशयीं आतां सविस्तर सांगण्याच प्रयोजन नाहीं.
6. या वस्तूंची अशी व्यवस्था केलेली असतां याजक उपासना करण्यास पहिल्या मंडपांत नित्य जात असतात;
7. दुस-यांत प्रमुख याजक मात्र वर्शांतून एकदां स्वतःबद्दल व लोकांच्या अज्ञानान झालेल्या पापांबद्दल ज रक्त अर्पण करावयाच त घेऊन जातो, त्यावांचून जात नाही.
8. तेणकरुन पवित्र आत्मा दर्शवितो कीं जोपर्यंत पहिला मंडप उभा आहे तोपर्यत परमपवित्रस्थानाची वाट प्रकट होत नाहीं;
9. तो मंडप वर्तमानकाळीं दृश्टांतरुप आहे; त्याच्या व्यवस्थेप्रमाण उपासकाचा विवेकभाव पूर्ण करावयास समर्थ नाहींत अशीं दान व यज्ञपशू अर्पण करण्यांत येतात;
10. खाण, पिण, नाना प्रकारचीं क्षालन यांसुद्धां तीं अर्पण, केवळ दैहिक विधि असे होते, ते सुधारणुकीच्या काळापर्यंत लावून दिले होते.
11. खिस्त हा भावी चांगल्या गोश्टीसंबंधी प्रमुख याजक असा येऊन, हातांनी केलेला नाहीं, म्हणजे या सृश्टींतला नाहीं अशा अधिक मोठ्या व पूर्ण मंडपांतून,
12. आणि बकरे व गो-हे यांचे रक्त नव्हे, तर आपल रक्त घेऊन एकदाच परमपवित्रस्थानांत गेला, आणि त्यान सार्वकालिक मुक्ति मिळविली.
13. कारण बक-यांचे व बैलांचे रक्त आणि विटाळलेल्यांवर शिंपडलेली कालवडीची राख हीं जर देहाची शुद्धि होईल अस पवित्र करितात,
14. तर सार्वकालिक आत्म्याच्या योग ज्यान निश्कलंक अशा स्वतःस देवाला अर्पण केल त्या खिस्ताच रक्त तुमचा विवेकभाव जीवंत देवाच्या सेवेसाठीं निर्जीव कर्मांपासून किती विशेशकरुन शुद्ध करील?
15. आणि तो याचकरितां नव्या कराराचा मध्यस्थ आहे की पहिला करार चालू असतां जीं उल्लंघने झालीं, त्यांपासून मुक्ति होण्यासाठीं मरण झाल्यान, सार्वकालिक वारशाच वचन पाचारण झालेल्यांस मिळाव.
16. कारण जेथ मृत्युपत्र आहे तेथ मृत्युपत्रकर्त्याचा मृत्यु सिद्ध होण अवश्य आहे.
17. मृत्यु झाल्यावर मृत्युपत्र अमलांत येत; कारण मृत्युपत्रकर्ता जीवंत आहे तोपर्यंत त कधी चालावयाच नाहीं.
18. यास्तव पहिल्या कराराचीहि स्थापना रक्तावांचून झाली नाहीं.
19. मोशान नियमशास्त्राप्रमाण सर्व आज्ञा सर्व लोकांस सांगितल्यावर, पाणी, किरमिजी लोकर व एजोब यांसह गो-ह्यांचे व बक-यांचे रक्त घेऊन पुस्तकावर व सर्व लोकांवरहि सिंचन करीत म्हटलः
20. ‘जो करार देवान आज्ञा करुन तुम्हांसाठीं दिला त्याच रक्त आहे;’
21. आणि त्यान तसेच मंडप व सेवेचीं सर्व पात्र यांवर रक्त शिंपडिल.
22. नियमशास्त्राप्रमाण रक्तान सर्व शुद्ध होतात, आणि रक्तपातावांचून पापमोचन होत नाहीं, असे म्हटल असतां चालेल.
23. याप्रमाण स्वर्गांतील वस्तूंचे नमुने अषान शुद्ध होण अवश्य होत; स्वतः स्वर्गीय वस्तु तर यांहून चांगल्या यज्ञांनी शुद्ध होण अवश्य होत.
24. ख-या गोश्टीच्या नमुन्यासारख हातांनीं केलेल पवित्रस्थान यांत खिस्त गेला नाहीं, तर आपल्यासाठीं देवासन्मुख उभा राहण्यास स्वर्गांत गेला;
25. आणि जसा प्रमुख याजक प्रतिवर्शी दुस-याच रक्त घेऊन परमपवित्रस्थानांत जाता, तसा तो स्वतःला वारंवार अर्पण करावयास गेला नाहीं;
26. तो गेला असता तर जगाच्या स्थापनेपासून त्याला वारंवार दुःख सोसाव लागल असत; पण तो युगांच्या समाप्तीस स्वतःच्या यज्ञान पाप नाहींतशीं करण्यासाठीं एकदाच प्रकट झाला आहे.
27. ज्या अर्थी मनुश्यांस एकदाच मरण, व त्यानंतर न्याय होण नेमून ठेविल आहे,
28. त्याअर्थी खिस्त ‘बहुतांची पाप स्वंतःवर घेण्यास’ एकदाच अर्पिला गेला, आणि जे त्याची वाट पाहतात त्यांस तारणासाठीं पापविरहित असा दुस-यान दिसेल.