Home / Marathi / Marathi New Testament / Web / James

 

James, Chapter 5

  
1. अहो धनवानांनो, जे कश्ट तुम्हांला होणार त्यांविशयी आक्रोश करीत रडा.
  
2. तुमच­ धन नासल­ आहे, व तुमच्या वस्त्रांला कसर लागली आहे.
  
3. तुमच­ सोन­ व तुमच­ रुप­ यांस जंग चढला आहे; त्यांचा तो जंग तुम्हांविरुद्ध साक्ष होईल, आणि तो ‘अग्नी’ सारखा तुमचा देह खाईल. ‘तुमच­ धन सांठविण­,’ शेवटल्या दिवसांत झाल­.
  
4. पाहा, ज्या कामक-यांनीं तुमचीं शेत­ कापिलीं आहेत त्यांची तुम्हीं अडकवून ठेविलेली ‘मजुरी ओरडत आहे;’ आणि कापणा-याच्या आरोळया ‘सेनाधीश प्रभूच्या कानीं’ गेल्या आहेत.
  
5. तुम्हीं पृथ्वीवर चैनबाजी व विलास केला आहे; ‘वधाच्या दिवशीं’ तुम्हीं आपल्या मनाची तृप्ति केली आहे.
  
6. धार्मिकांस तुम्हीं दोशी ठरविल­, त्याचा घात केला; तो तुम्हांस ‘अडवीत’ नाहीं.
  
7. अहो बंधंूनो, प्रभूच्या आगमनापर्यत धीर धरा. पाहा, शेतकरी भूमीच्या मोलवान् पिकाची वाट पाहत असतां, त्यास ‘पहिला व शेवटला पाऊस’ मिळेपर्यंत त्याविशयीं, तो धीर धरितो.
  
8. तुम्हीहि धीर धरा, आपलीं अंतःकरण­ स्थिर करा, कारण प्रभूचें आगमन जवळ आल­ आहे.
  
9. बंधूंनो, तुम्हीं दोशी ठरुं नये म्हणून एकमेकांवर चिडून कुरकुर करुं नका; पाहा; न्यायाधीश दारानजीक उभा आहे.
  
10. बंधंूनो, जे संदेश्टे प्रभूच्या नामान­ बोलले त्याच­ दुःखसहन व त्यांचा धीर यांविशयीं कित्ता घ्या.
  
11. पाहा, ‘ज्यांनी सहन केल­ त्यांस आपण धन्य म्हणता­;’ तुम्हीं ईयोबाच्या धीराविशयीं ऐकल­ आहे, आणि प्रभूकडून जो त्याचा शेवट झाला तो पाहिला आहे; यावरुन ‘प्रभु फार कनवाळू व दयाळू’ आहे ह­ तुम्हीं पाहिल­.
  
12. माझ्या बंधंूनो, मुख्यतः शपथ वाहूं नका; स्वर्गाची, पृथ्वीची किंवा कोणतीहि दुसरी शपथ वाहूं नहा; तुम्हीं दोशी ठरुं नये म्हणून तुम्हांस होय म्हणावयाच­ तर होय म्हणा; नाहीं म्हणावयाच­ तर नाहीं म्हणा.
  
13. तुम्हांपैकीं कोणी दुःख भोगीत आहे काय? त्यान­ प्रार्थना करावी. कोणी आनंदित आहे काय? त्यान­ स्तोत्र­ गावीं.
  
14. तुम्हांपैकी कोणी दुखणाईत आहे काय? त्यान­ मंडळीच्या वडिलांना बोलवाव­, आणि त्यांनी प्रभूच्या नामान­ त्याला तेल लावाव­ व त्याजवर ओणवून प्रार्थना करावी;
  
15. विश्वासाची प्रार्थना दुखणाइतास वांचवील, प्रभू त्याला उठवील, आणि त्यान­ पाप­ केलीं असली तरी त्याला क्षमा होईल.
  
16. यास्तव तुम्हीं निरोगी व्हाव­ म्हणून आपलीं पातक­ एकमेकांजवळ कबूल करुन एकमेकांसाठी प्रार्थना करा. धार्मिकाची प्रार्थना कार्य करण्यांत फार प्रबळ असते.
  
17. एलिया आपल्यासारख्या स्वभावाचा मनुश्य होता; त्यान­ पाऊस पडूं नये अशी आग्रहान­ प्रार्थना केली, आणि साडेतीन वर्शेपर्यंत पृथ्वीवर पाऊस पडला नाहीं.
  
18. पुनः त्यान­ प्रार्थना केली; तेव्हां आकाशान­ पाऊस पाडिला, आणि भूमीनें आपल­ फळ उपजविल­.
  
19. माझ्या बंधूंनो, तुम्हांमधील कोणीं सत्यापासून बहकला आणि त्याला कोणीं माघार­ फिरविल­,
  
20. तर पापी मनुश्याला त्याच्या भ्रांतिमय मार्गापासून फिरविणारा तो त्याचा जीव मरणापासून तारील, व पापांची रास झाकील, अस­ त्यान­ समजाव­.