Home / Marathi / Marathi New Testament / Web / John

 

John, Chapter 12

  
1. मग येशू वल्हांडणाच्या पूर्वी सहा दिवस बेथानीस आला; ज्या लाजराला येशून­ मेलेल्यांतून उठविल­ तो तेथ­ होता.
  
2. तेथ­ त्यांनीं त्याच्यासाठीं जेवणावळ केली; तेव्हां मार्था सेवा करीत होती; आणि लाजर त्याच्या पंक्तीस बसणा-यांपैकीं एक होता,
  
3. तेव्हां मरीयेन­ अर्ध शेर शुद्ध जटामांसीच­ मोलवान् सुगंधीं तेल घेऊन येशूच्या चरणांस लाविल­, आणि आपल्या केसांनीं त्याचे चरण पुसले; तेव्हां त्या सुगंधी तेलाच्या वासान­ घर भरुन गेल­.
  
4. त्याला धरुन देणारा, त्याच्या शिश्यांतील यहूदा इस्कर्योत नाम­ एक जण म्हणाला,
  
5. ह­ सुगंधी तेल पाऊणश­ रुपयांस विकून ते गरिबांस कां दिले नाहीत?
  
6. त्याला गरिबांची काळजी होती म्हणून तो ह­ म्हणाला अस­ नाहीं; तर तो चोर असून त्याच्याजवळ डबी होती; तींत ज­ टाकण्यांत येई तें तो चोरुन घेत असे, म्हणून अस­ म्हणाला.
  
7. यावरुन येशून­ म्हटल­, माझ्या उत्तरकार्याच्या दिवसांसाठीं त­ तिला ठेवूं द्या;
  
8. कारण गरीब नेहमीं तुम्हांजवळ आहेत; परंतु मी तुम्हांजवळ नेहमीं आह­ अस­ नाहीं.
  
9. तो तेथ­ आह­ अस­ यहूद्यांतील साधारण लोकांपैकीं पुश्कळांस कळल­; आणि केवळ येशूकरितांच नाहीं, तर ज्या लाजराला त्यान­ मेलेल्यांतून उठविल­ होत­ त्यालाहि पाहण्याकरितां ते आले.
  
10. मुख्य याजाकांनीं लाजरालाहि जिव­ मारण्याचा निश्चय केला.
  
11. कारण त्याजमुळ­ पुश्कळ यहूदी त्यांना सेाडून येशूवर विश्वास ठेवीत होते.
  
12. दुस-या दिवशीं सणास आलेला मोठा लोकसमुदाय येशू यरुशलेमास येत आहे अस­ ऐकून
  
13. खजुरीच्या झावळîा घेऊन त्याच्या भेटीस बाहेर निघाला, आणि गजर करुन म्हणाला: ‘होसान्ना; प्रभूच्या नामान­ येणारा,’ इस्त्राएलाचा राजा ‘धन्यवादीत असो.’
  
14. येशूला लहान गाढव मिळाल्यावर त्याच्यावर तो बसला;
  
15. ह­ लिहिल्याप्रमाण­ घडल­, त­ अस­: ‘हे सीयोनेच्या कन्ये, भिऊं नको, पाहा, तुझा राजा गाढवीच्या शिंगरावर बसून येतो.’
  
16. या गोश्टी त्याचे शिश्य प्रथम समजले नव्हते; येशूच­ गौरव झाल्यावर त्यांस आठवण झाली कीं त्याजविशयीं या गोश्टी लिहिल्या असून त्याप्रमाण­ लोकांनीं त्याला केल­.
  
17. त्यान­ लाजराला कबर­तून बोलावून मेलेल्यांतून उठविल­, त्या वेळेस जो लोकसमदाय त्याजबरोबर होता त्यान­ साक्ष दिली.
  
18. ह्यावरुनहि लोक त्याला भेटावयास गेले, कारण त्यान­ ह­ चिन्ह केल­ होत­ अस­ त्यांनीं ऐकल­.
  
19. यास्तव परुशी एकमेकांस म्हणाले, तुमच­ कांहीं चालत नाहीं ह­ लक्षांत आणा; पाहा, जग त्याच्यामाग­ चालल­ आहे.
  
20. सणांत उपासना करावयास आलेल्या लोकांपैकीं कांही हेल्लेणी होते;
  
21. त्यांनीं गालीलांतील बेथसैदाकर फिलिप्प याच्याजवळ येऊन विनंति केली कीं महाराज, येशूला भेटाव­ अस­ आमच्या मनांत आहे.
  
22. फिलिप्पान­ येऊन अंद्रियाला सांगितल­, आणि अंद्रिया व फिलिप्प यांनीं येऊन येशूला सांगितल­.
  
23. येशून­ त्यांस म्हटल­, मनुश्याच्या पुत्राच­ गौरव होण्याची वेळ आली आहे.
  
24. मी तुम्हांस खचीत खचीत सांगता­, गव्हाचा दाणा जमिनींत पडून मेला नाहीं तर तो एकटाच राहतो; आणि मेला तर बहुत पीक देतो.
  
25. जो आपल्या जिवावर प्रीति करितो तो त्याला मुकेल; आणि जो या जगांत आपल्या जिवाचा द्वेश करतो तो त्याच­ सार्वकालिक जीवनासाठीं रक्षण करील.
  
26. जर कोणी माझी सेवा करील तर त्यान­ मला अनुसराव­; म्हणजे जेथ­ मी आहे तेथ­ माझा सेवकही असेल; कोणी माझी सेवा करील तर पिता त्याचा मान करील.
  
27. आतां माझा जीव व्याकुळ झाला आहे; मी काय बोलूं?
  
28. हे पित्या या घटकेपासून माझ­ रक्षण कर; तरी मी यासाठींच या घटक­त आला­ आह­; हे पित्या, तूं आपल्या नामाच­ गौरव कर. तेव्हां अशी आकाशवाणी झाली कीं मीं त­ गौरविल­ आहे आणि पुनःहि गौरवीन.
  
29. तेव्हां जे लोक उभ­ राहून ऐकत होते ते म्हणाले, गर्जना झाली; दुसरे म्हणाले, त्याच्याबरोबर देवदूत बोलला.
  
30. येशून­ उत्तर दिल­, ही वाणी मजसाठीं नाहीं, तर तुम्हांसाठीं झाली. आतां या जगाचा न्याय होतो;
  
31. आतां या जगाचा अधिकारी बाहेर टाकिला जाईल.
  
32. मला पृथ्वीपासुन उंच केल­ तर मी आपणाकडे सर्वांस ओढीन.
  
33. आपण कोणत्या मरणान­ मरणार ह­ सुचविण्याकरितां तो अस­ बोलला.
  
34. यास्तव लोकांनीं त्याला विचारिल­, खिस्त सर्वकाळ राहील अस­ आम्हीं नियमशास्त्रांतून ऐकल­ आहे; तर मनुश्याच्या पुत्राला उंच केल­ पाहिजे अस­ आपण कस­ म्हणतां? हा मनुश्याचा पुत्र आहे तरी कोण?
  
35. यावरुन येशून­ त्यांस म्हटल­, आणखी थोडा वेळ तुम्हांमध्य­ उजेड आहे, तुम्हांस अंधारांन­ गांठू नये म्हणून तुम्हांस उजेड आहे तोपर्यंत चाला; कारण जो अंधारांत चालतो त्याला आपण कोठ­ जाता­ ह­ कळत नाहीं;
  
36. तुम्हीं उजेडाचे पुत्र व्हाव­ म्हणून तुम्हांस उजेड आहे ता­पर्यंत उजेडावर विश्वास ठेवा. येशू या गोश्टी बोलला आणि निघून जाऊन त्यांच्यापासून गुप्त राहिला;
  
37. त्यान­ त्यांच्यासमोर इतकीं चिन्ह­ केलीं असतांहि त्यांनी त्याजवर विश्वास ठेविला नाहीं;
  
38. यासाठीं कीं यशया संदेश्ट्यान­ जी गोश्ट सांगितली होती ती पूर्ण व्हावी; ती अशी: प्रभू, आम्हीं ऐकलेल्या वार्तेवर कोणीं विश्वास ठेविला आहे? परमेश्वराचा भुज कोणास प्रगट झाला आहे?
  
39. यामुळ­ त्यांच्यान­ विश्वास ठेववेना; यषया आणखी म्हणाला:
  
40. त्यांनी डोळîांनीं पाहूं नये, अंतःकरणान­ समजूं नये, वळूं नये व मीं त्यांस बर­ करुं नये, म्हणून त्यान­ त्यांचे डोळे अंधळे केले व त्यांच­ अंतःकरण कठीण केल­ आहे.
  
41. यशयान­ त्याच­ गौरव पाहिल­ म्हणून अस­ म्हटल­, आणि तो त्याजविशयीं बोलला.
  
42. अस­ असूनहि अधिका-यांतून देखील पुश्कळ जणांनीं त्याजवर विश्वास ठेविला, परंतु आपण सभाबहिश्कृत होऊं नये म्हणून परुश्यांमुळ­ त्यांनीं ह­ कबूल केल­ नाहीं;
  
43. कारण त्यांस देवाकडील गौरवापेक्षां मानवाकडील गौरव अधिक आवडल­.
  
44. तेव्हां येशू उच्च स्वरान­ म्हणाला, जो मजवर विश्वास ठेवितो तो मजवर विश्वास ठेवीत नाहीं, तर ज्यान­ मला पाठविल­ त्याजवर ठेवितो;
  
45. आणि जो मला पाहतो तो, ज्यान­ मला पाठविल­ त्याला पाहतो.
  
46. मी जगांत प्रकाश असा झालो आह­, यासाठीं कीं मजवर विश्वास ठेवणा-या कोणींहि अंधारांत राहूं नये.
  
47. माझीं वचन­ ऐकून कोणी पाळीत नाहीं तर त्याचा न्याय मी करीत नाहीं, कारण मी जगाचा न्याय करण्यासाठीं नाही, तर जगाच­ तारण करण्यासाठीं आला­.
  
48. जो मला अव्हेरितो व माझ्या वचनांचा स्वीकार करीत नाहीं त्याचा न्याय करणारा एक जण आहे; ज­ वचन मीं सांगितल­ त­च शेवटल्या दिवशीं त्याचा न्याय करील.
  
49. कारण मी आपल्या मनच­ बोलला­ नाहीं, तर मीं काय सांगाव­ व काय बोलाव­ यांविशयीं ज्या पित्यान­ मला पाठविल­ त्यान­च मला आज्ञा दिली आहे.
  
50. त्याची आज्ञा सार्वकालिक जीवन आहे ह­ मला ठाऊक आहे; यास्तव ज­ कांहीं मी बोलता­ त­ पित्यान­ मला सांगितल्याप्रमाण­ बोलता­.