Home / Marathi / Marathi New Testament / Web / John

 

John, Chapter 18

  
1. ह­ बोलल्यावर येशू आपल्या शिश्यांसुद्धा किद्रोन ओहळाच्या पलीकडे गेला, तेथ­ बाग होता, त्यांत तो व त्याचे शिश्य गेले.
  
2. ही जागा त्याला धरुन देणारा यहूदा यालाहि ठाऊक होती; कारण येशू आपल्या शिश्यांसहित तेथ­ वारंवार जात असे.
  
3. तेव्हां मुख्य याजक व परुशी यांजपासून पलटण व शिपाई मिळाल्यावर यहूदा फाणस, मशाली व हत्यार­ घेऊन तेथ­ आला.
  
4. येशू आपणावर ज­ कांही येणार त­ सर्व जाणून बाहेर आला आणि त्यांस म्हणाला, तुम्ही कोणाचा शोध करितां?
  
5. त्यांनीं त्याला उत्तर दिल­ कीं नासरेथकर येशूचा. तो त्यांस म्हणाला, तो मी आह­. त्याला धरुन देणारा यहूदाहि त्यांच्याबरोबर उभा होता.
  
6. तो मी आह­, अस­ तो म्हणतांच ते माग­ हटून भूमीवर पडले.
  
7. तेव्हां त्यान­ त्यांस पुनः विचारिल­, कोणाचा शोध करितां? ते म्हणाले, नासरेथकर येशूचा.
  
8. येशून­ उत्तर दिल­, तो मी आह­ अस­ मी तुम्हांस सांगितल­, माझा शोध करीत असलां तर यांस जाऊं द्या.
  
9. जे तूं मला दिले आहेत त्यांतून एकहि मीं हरविला नाहीं, अस­ ज­ वचन तो बोलला त­ पूर्ण व्हाव­ म्हणून ह­ झाल­.
  
10. शिमोन पेत्राजवळ तरवार होती, ती त्यान­ उपसून प्रमुख याजकाच्या दासावर चालविली आणि त्याचा उजवा कान कापून टाकिला; त्या दासाच­ नांव मल्ख होत­.
  
11. येशू पेत्राला म्हणाला, तरवार म्यानांत घाल; पित्यान­ जो प्याला मला दिला तो मीं पिऊं नये काय?
  
12. मग पलटण, हजारांचा सरदार व यहूद्यांचे शिपाई यांनीं येशूला धरुन बांधिल­.
  
13. आणि त्याला प्रथम हन्नाकडे नेल­; कारण कयफा जो त्या वर्शी प्रमुख याजक होता त्याचा हा सासरा होता.
  
14. एका मनुश्यान­ं लोकांबद्दल मराव­ ह­ हितावह आहे अशी ज्यान­ यहूद्यांस मसलत दिली, तोच हा कयफा होता.
  
15. शिमोन पेत्र व दुसरा एक शिश्य हे येशूच्या मागंे चालले. तो शिश्य प्रमुख याजकाच्या ओळखीचा होता आणि तो येशूबरोबर प्रमुख याजकाच्या वाड्यांत गेला;
  
16. पेत्र दाराजवळ बाहेर उभा राहिला होता. यास्तव जो दुसरा शिश्य प्रमुख याजकाच्या ओळखीचा होता त्यान­ बाहेर येऊन व द्वारपालिकेला सांगून पेत्राला आंत नेल­.
  
17. यावरुन ती तरुण द्वारपालिका पेत्राला म्हणाली, तूंहि त्या माणसाच्या शिश्यांतील आहेस काय, त्यान­ म्हटल­, मी नाहीं.
  
18. तेव्हां थंडी होती, म्हणून दास व शिपाई हे कोळशांचा विस्तव पेटवून शेकत उभे राहिले होते; आणि त्यांच्याबरोबर पेत्रहि उभा राहून शेकत होता.
  
19. तेव्हां प्रमुख याजकान­ येशूला त्याच्या शिश्यांविशयीं व त्याच्या शिकवणीविशयीं विचारिल­.
  
20. येशून­ त्याला उत्तर दिल­ कीं, मी जगासमोर उघड बोललो आह­; जेथ­ सभास्थानांत व मंदिरांत सर्व यहूदी मिळतात तेथ­ मीं नेहमी शिक्षण दिल­; गुप्तपण­ कांही बोलला­ नाहीं.
  
21. मला कां विचारितोस? मी काय बोलला­ ह­ ज्यांनीं ऐकल­ आहे त्यांस विचार; पाहा, मी ज­ बोलला­ त­ त्यांस ठाऊक आहे.
  
22. त्यान­ अस­ म्हटल्यावर जवळ उभा राहणारा एक शिपाई येशूला चपडाक मारुन म्हणाला, तूं प्रमुख याजकाला असा जबाब देतोस काय?
  
23. येशून­ त्याला उत्तर दिल­; मी वाईट बोललो असला­ तर त्या वाइटाविशयीं साक्ष दे, बर­ बोलला­ असला­ तर मला कां मारितोस?
  
24. तेव्हां हन्नान­ त्याला प्रमुख याजक कयफा याजकडे बांधलेल­च पाठविल­.
  
25. शिमोन पेत्र शेकत उभा राहिला होता. ते त्याला म्हणाले, तूंहि त्याच्या शिश्यांतील आहेस काय? तो नाकारुन बोलला; मी नाहीं.
  
26. मग ज्याचा कान पेत्रान­ कापून टाकिला होता त्याचा एक नातलग प्रमुख याजकाच्या दासांपैकीं एक होता; तो म्हणाला, मीं तुला त्याच्याबरोबर बागांत नाहीं का पाहिल­?
  
27. पेत्रान­ पुनः नाकारिल­; आणि तेव्हांच का­बडा आरवला.
  
28. नंतर त्यांनीं येशूला कयफाच्या एथून कचेरींत नेल­; तेव्हां सकाळ होती; आणि आपणांस विटाळ होऊं नये, वल्हांडणाच­ भोजन करितां याव­, म्हणून ते स्वतः कचेरींत गेले नाहींत;
  
29. यास्तव पिलात त्यांजकडे बाहेर येऊन म्हणाला, तुम्ही या मनुश्यावर काय आरोप आणितां?
  
30. त्यांनीं त्याला उत्तर दिल­, तो दुश्कर्मी नसता तर आम्हीं त्याला तुमच्या स्वाधीन केल­ नसत­.
  
31. पिलातान­ त्यांस म्हटल­, तुम्हीच त्याला घेऊन आपल्या शास्त्राप्रमाण­ त्याचा न्याय ठरवा. यहूदी त्याला म्हणाले, कोणाचा जीव घेण्याचा आम्हांला अधिकार नाहीं;
  
32. आपण कोणत्या मरणान­ मरणार ह­ कळवितांना येशून­ ज­ वचन सांगितल­ होत­ त­ पूर्ण व्हाव­ म्हणून अस­ झाल­.
  
33. यास्तव पिलात पुनः कचेरींत गेला, आणि येशूला बोलावून म्हणाला, तूं यहूद्यांचा राजा आहेस काय?
  
34. येशून­ उत्तर दिल­, तूं आपण होऊन ह­ म्हणतोस, किंवा दुस-यांनी तुला मजविशयीं सांगितल­?
  
35. पिलातान­ उत्तर दिल­, मी यहूदी आह­ काय? तुझ्याच लोकांनीं व मुख्य याजकांनीं तुला माझ्या स्वाधीन केल­; तूं काय केल­स?
  
36. येशून­ उत्तर दिल­, माझ­ राज्य या जगाच­ नव्हे; माझ­ राज्य या जगाच­ असत­ तर मीं यहूद्यांच्या स्वाधीन होऊं नये म्हणून माझ्या शिपायांनीं लढाई केली असती, परंतु माझ­ राज्य एथल­ नव्हे.
  
37. यावरुन पिलात त्याला म्हणाला, तर तूं राजा आहेस काय? येशून­ उत्तर दिल­ कीं मी राजा आह­ अस­ तूं म्हणतोस. मी यासाठीं जन्मला­ आह­ व यासाठीं जगांत आला­ आह­ कीं मी सत्याविशयीं साक्ष द्यावी. जो कोणी सत्याचा आहे तो माझी वाणी ऐकतो.
  
38. पिलात त्याला म्हणाला, सत्य काय आहे? अस­ बोलून तो पुनः यहूद्यांकडे बाहेर जाऊन त्यांस म्हणाला, याच्याठायीं मला कांही आपराध दिसत नाहीं.
  
39. पण वल्हांडणांत मीं तुम्हांसाठीं एका इसमाला सोडाव­ अशी तुमची रीत आहे; म्हणून मीं तुम्हांसाठीं यहूद्यांच्या राजाला सोडाव­ अशी तुमची इच्छा आहे काय?
  
40. तेव्हां ते पुनः ओरडून म्हणाले, याला नको, तर बरब्बाला सोडा. बरब्बा हा एक लुटारु होता.