Home / Marathi / Marathi New Testament / Web / John

 

John, Chapter 19

  
1. नंतर पिलातान­ येशूला घेऊन फटके मारविले.
  
2. शिपायांनीं कांट्यांचा मुगूट गुंफून त्याच्या मस्तकावर घातला व जांभळ­ वस्त्र त्यास पांघरविल­;
  
3. आणि ते त्याजकडे येऊन म्हणाले, हे यहूद्यांच्या राजा, तुझा जयजयकार असो ! मग त्यांनीं त्याला चपडाका मारिल्या.
  
4. तेव्हां पिलातान­ पुनः बाहेर जाऊन त्यांस म्हटल­, पाहा, त्याच्या ठायीं मला कांही अपराध दिसत नाहीं, ह­ तुम्हांस कळाव­ म्हणून मी त्याला तुम्हांकडेे बाहेर आणिता­.
  
5. यास्तव येशू कांट्यांचा मुगूट व जांभळ­ वस्त्र घातलेला असा बाहेर आला आणि पिलात त्यांस म्हणाला, पाहा हा मनुश्य !
  
6. मुख्य याजक व त्यांचे शिपाई त्याला पाहून ओरडून म्हणाले, ह्याला वधस्तंभाशी खिळा. पिलात त्यांस म्हणाला, तुम्हीच त्याला घेऊन वधस्तंभाशीं खिळा कारण मला त्याच्या ठायी अपराध दिसत नाहीं.
  
7. यहूद्यांनीं त्याला उत्तर दिल­, आम्हांस शास्त्र आहे, आणि त्या शास्त्राप्रमाण­ ह्यांनीं मेल­ पाहिजे, कारण ह्यान­ स्वतःला देवाचा पुत्र केल­.
  
8. यास्तव पिलात ह­ बोलण­ ऐकून अधिकच भ्याला;
  
9. आणि तो पुनः कचेरींत जाऊन येशूला म्हणाला, तूं कोठला आहेस? परंतु येशून­ त्याला उत्तर दिल­ नाहीं.
  
10. यास्तव पिलातान­ त्याला म्हटल­, तूं माझ्याबरोबर बोलत नाहींस काय? तुला सोडण्याचा अधिकार मला आहे, व तुला वधस्तंभावर खिळण्याचा अधिकार मला आहे ह­ तुला ठाऊक नाहीं काय?
  
11. येशून­ उत्तर दिल­, तुला वरुन अधिकार देण्यांत आला नसता तर मजवर तो मुळींच चालला नसता; यास्तव ज्यान­ मला तुझ्यास्वाधीन केल­ त्याच­ पाप अधिकच आहे.
  
12. यावरुन पिलातान­ त्यास सोडविण्याची खटपट केली; परंतु यहूदी आरडाओरड करुन म्हणाले, तुम्हीं याला सोडिल­ तर तुम्ही कैसराचे मित्र नाहीं; जो कोणी आपणाला राजा करितो तो कैसराचा विरोध करितो.
  
13. हे शब्द ऐकून पिलातान­ येशूला बाहेर आणिल­ आणि इब्री भाश­त गब्बाथा म्हणजे फरसबंदी ह्या नांवाच्या जागीं तो न्यायासनावर बसला.
  
14. तेव्हां वल्हांडणाच्या तयारीचा दिवस असून सुमार­ सहावा तास होता; तेव्हां त्यान­ यहूद्यांस म्हटल­, पाहा तुमचा राजा !
  
15. यावरुन ते ओरडले, त्याची वाट लावा, त्याची वाट लावा; त्याला वधस्तंभावर खिळा. पिलात त्यांस म्हणाला, मीं तुमच्या राजाला वधस्तंभावर खिळाव­ काय? मुख्य याजकांनीं उत्तर दिल­ कीं कैसरावांचुन आम्हांस कोणी राजा नाहीं.
  
16. मग त्यान­ त्याला वधस्तंभाशीं खिळण्याकरितां त्यांच्या स्वाधीन केल­.
  
17. त्यांनीं येशूला आपल्या ताब्यांत घेतल­; आणि तो आपला वधस्तंभ स्वतः वाहत कवटीच­ स्थान म्हटलेल्या जागीं गेला; त्या जागेला इब्री भाश­त गुलगुथा म्हणतात;
  
18. तेथ­ त्यांनीं त्याला व त्याजबरोबर दुस-या दोघांला, एकाला एका बाजूस, व एकाला दुस-या बाजूस आणि येशूला मध्य­, अस­ वधस्तंभावर खिळिल­.
  
19. पिलातान­ दोशपत्रकहि लिहून वधस्तंभावर लाविल­; त्यांत यहूद्यांचा राजा नासोरी येशू अस­ लिहिल­ होत­,
  
20. येशूला वधस्तंभाशीं खिळिल­ त­ स्थळ नगराच्या जवळ होत­, म्हणून पुश्कळ यहूद्यांनीं त­ देाशपत्रक वाचिल­. त­ इब्री, रोमी व हेल्लेणी या भाशांत लिहिल­ होत­.
  
21. यास्तव यहूद्यांचे मुख्य याजक पिलाताला म्हणाले, यहूद्यांचा राजा अस­ लिहूं नका, तर मी यहूद्यांचा राजा आह­ अस­ त्यान­ म्हटल­, अस­ लिहा.
  
22. पिलातान­ उत्तर दिल­, मी लिहिल­ त­ लिहिल.
  
23. शिपायांनीं येशूला वधस्तंभावर खिळिल्यानंतर त्याचीं वस्त्र­ घेतलीं आणि एकाएका शिपायाला एकएक विभाग असे त्यांच चार विभाग केले; त्यांनीं अंगरखाहि घेतला; त्या अंगरख्याला शिवण नसून तो वरपासून खालपर्यंत सबंध विणलेला होता.
  
24. यास्तव ते एकमेकांस म्हणाले, हा आपण फाडूं नये, तर कोणाला येईल ह­ चिठ्या टाकून पाहूं; ह­ यासाठीं झाल­ की त्यांनीं माझीं वस्त्र­ आपसांत वांटून घेतलीं, आणि माझ्या पेहरावर चिठ्या टाकिल्या, असा जो शास्त्रलेख तो पूर्ण व्हावा. त्याप्रमाण­ शिपायांनीं केले.
  
25. येशूच्या वधस्तंभाजवळ त्याची आई, त्याची मावशी, क्लोपाची बायको मरीया, आणि मरीया मग्दालीया, ह्या उभ्या होत्या.
  
26. मग येशून­ आपल्या आईला व ज्या शिश्यावर त्याची प्रीति होती त्याला जवळ उभ­ राहिलेले पाहून आईला म्हटल­, बाई, पाहा, हा तुझा पुत्र !
  
27. मग त्यान­ शिश्याला म्हटल­, पाहा, ही तुझी आई ! त्या वेळेपासून त्या शिश्यान­ तिला आपल्या घरीं ठेवून घेतले.
  
28. यानंतर सर्व पूर्ण झाल­ आह­ ह­ जाणून येशून­ शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून, मला तहान लागली आहे, अस­ म्हटल­.
  
29. तेथ­ आंब भरुन ठेवलेल­ एक भांड­ होत­; म्हणून त्यांनीं आंब भरलेला स्पंज एजोबाच्या कठीवर बसवून त्याच्या ता­डाला लाविला.
  
30. येशून­ आंब घेतल्यानंतर, पूर्ण झाल­ आहे, अस­ म्हटले; आणि मस्तक लववून आपला आत्मा समर्पण केला.
  
31. तो तयारीचा दिवस होता, म्हणून शब्बाथ दिवशी शरीर­ वधस्तंभावर राहूं नयेत (कारण तो शब्बाथाचा दिवस मोठा होता) म्हणून त्यांचे पाय मोडावे आणि त्यांस घेऊन जाव­ अशी यहूद्यांनीं पिलाताजवळ विनंति केली.
  
32. मग शिपायांनीं येऊन त्याजबरोबर वधस्तंभावर खिळलेल्या पहिल्याचे व दुस-याचे पाय मोडिले;
  
33. परंतु येशूकडे येऊन तो मरुन गेला आहे अस­ पाहून त्यांनीं त्याचे पाय मोडिले नाहींत;
  
34. तरी शिपायांतील एकान­ त्याच्या कुशींत भाला भोसकिला, ता­ रक्त व पाणी निघाल­.
  
35. ज्यान­ ह­ पाहिल­ त्यान­ साक्ष दिली आहे व त्याची साक्ष खरी आहे; आपण खर­ बोलता­ ह­ त्याला ठाऊक आहे, यासाठीं कीं तुम्हींहि विश्वास धरावा.
  
36. ‘त्याच­ हाड मोडणार नाहीं’ हा शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून या गोश्टी घडल्या.
  
37. शिवाय दुस-याहि शास्त्रलेखांत अस­ म्हटल­ आहे कीं ‘ज्याला त्यांनीं विंधिल­ त्याजकडे ते पाहतील.’
  
38. त्यानंतर अरिमथाईकर योसेफ हा येशूचा एक शिश्य असून यहूद्यांच्या भयामुळें गुप्त शिश्य असा होता त्यान­ येशूच­ शरीर घेऊन जाण्यास पिलाताजवळ विनंति केली. पिलातान­ परवानगी दिल्यावरुन त्यान­ जाऊन त्याच­ शरीर नेल­;
  
39. आणि त्याजकड­ पहिल्यान­ रात्रीं आलेला निकदेमहि गंधरस व अगरु यांचे सुमार­ शंभर शेर मिश्रण घेऊन आला.
  
40. त्यांनीं येशूच­ शरीर घेऊन यहूद्यांच्या उत्तरकार्याच्या रीतीप्रमाण­ सुगंध द्रव्यांसहित तागाच्या वस्त्रांनीं गुंडाळिल­.
  
41. ज्या ठिकाणीं त्याला वधस्तंभावर खिळिल­ होत­ त्या ठिकाणीं एक बाग असून तिच्यांत एक नवी कबर होती, तिच्यामध्य­ त्या वेळेपर्यंत कोणासहि ठेविल­ नव्हत­.
  
42. यहूद्यांच्या तयारीच्या दिवसामुळ­ त्यांनीं येशूला तेथ­ ठेविल­, कारण ती कबर जवळ होती.