Home / Marathi / Marathi New Testament / Web / John

 

John, Chapter 6

  
1. त्यानंतर येशू गालीलाच्या, म्हणजे तिबिर्या समुद्राच्या पलीकडे गेला;
  
2. तेव्हां पुश्कळ लोकसमुदाय त्याच्यामागून चालला, कारण दुखणाइतांसंबंधान­ जीं चिन्ह­ तो करीत असे तीं त्यांनीं पाहिली होतीं.
  
3. येशू डा­गरावर जाऊन तेथ­ आपल्या शिश्यांसह बसला.
  
4. यहूद्यांचा वल्हांडण सण जवळ आला होता,
  
5. तेव्हां येशून­ दृश्टी वर करुन व मोठा लोक समुदाय आपणाकडे येत आहे अस­ पाहून फिलिप्पाला म्हटल­, यांस खावयाला आपण भाकरी कोठून विकत आणाव्या?
  
6. ह­ तर त्यान­ त्याची परीक्षा पाहण्याकरितां म्हटल­; आपण काय करणार ह­ त्याला ठाऊक होत­.
  
7. फिलिप्पान­ त्याला उत्तर दिल­, यांच्यातील एकेकान­ थोड­ थोड­ घेतल­ तरी पन्नास रुपयांच्या भाकरी पुरणार नाहींत.
  
8. त्याच्या शिश्यांतील एक जण, म्हणजे शिमोन पेत्राचा भाऊ अंद्रिया, त्याला म्हणाला,
  
9. एथ­ एक मुलगा आहे, त्याच्याजवळ जवाच्या पांच भाकरी व दोन मासळîा आहेत; परंतु त्या इतक्यांस कशा पुरणार?
  
10. येशू म्हणाला लोकांस बसवा. त्या ठिकाणीं पुश्कळ गवत होत­; तेथ­ बसणा-या पुरुशांची संख्या सुमार­ पांच हजार होतीं.
  
11. येशून­ त्या भाकरी घेतल्या; आणि ईशोपकारस्मरण केल्यावर बसलेल्यांस वांटून दिल्या; तस­च त्या मासळîांतूनहि त्यांस पाहिजे तितक­ दिल­.
  
12. ते तृप्त झाल्यावर त्यान­ आपल्या शिश्यांस सांगितल­; कांही फुकट जाऊं नये म्हणून उरलेले तुकडे गोळा करा;
  
13. मग जेवणा-यांस पुर­ झाल्यावर जवाच्या पांच भाकरींपैकीं उरलेले तुकडे त्यांनीं गोळा केले; त्या तुकड्यांनीं बारा टोपल्या भरल्या.
  
14. त्यान­ केलेले चिन्ह पाहून त्या मनुश्यांनीं म्हटले­, जगांत येणारा जो संदेश्टा तो खरोखर हाच आहे.
  
15. मग ते येऊन आपणास राजा करण्याकरितां धरुं पाहत आहेत ह­ ओळखून येशू पुनः डा­गरावर एकटाच निघून गेला.
  
16. संध्याकाळ झाल्यावर त्याचे शिश्य खालीं समुद्राकडे गेले;
  
17. आणि मचव्यांत बसून समुद्राच्या पलीकडे कफर्णहूमास चालले; इतक्यांत अंधार पडला, ता­वर येशू त्यांच्याजवळ आला नव्हता;
  
18. आणि मोठा वारा सुटून समुद्र खवळूं लागला होता.
  
19. मग सुमार­ कोस सवा कोस वल्हवून गेल्यावर त्यांनी येशूला समुद्रावरुन चालून मचव्याजवळ येतांना पाहिल­; आणि त्यांना भय वाटल­;
  
20. परंतु तो त्यांस म्हणाला, मी आह­, भिऊं नका.
  
21. यास्तव त्याला मचव्यावर घेण्याची त्यांस इच्छा झाली; इतक्यांत त्यांस जावयाच­ होत­ त्या ठिकाणीं मचवा किना-यास पोहंचला.
  
22. दुस-या दिवशीं जो लोकसमुदाय समुद्राच्या पलीकडे उभा होता त्यान­ पाहिल­ की ज्या एका मचव्यांत त्याचे शिश्य बसले होते त्यावांचून तेथ­ दुसरा मचवा नव्हता, आणि येशू आपल्या शिश्यांबरोबर त्या मचव्यांत बसला नव्हता, तर त्याचे शिश्य मात्र निघून गेले होते;
  
23. (तरी जेथ­ प्रभून­ ईशोपकारस्मरण केल्यावर त्यांनीं भाकर खाल्ली त्या ठिकाणाजवळ तिबिर्यापासून दुसरे मचवे आले होते;)
  
24. तेथ­ येशू नाहीं व त्याच­ शिश्यहि नाहींत अस­ लोकसमुदायान­ पाहिल­, तेव्हां ते मचव्यांत बसून येशूचा शोध करीत कर्फणहूमास आले.
  
25. तेव्हां तो त्यांस समुद्राच्या पलीकडे भेटल्यावर ते त्याला म्हणाले, गुरुजी, एथ­ कधीं आलां?
  
26. येशून­ त्यांस उत्तर दिल­, मी तुम्हांस खचीत खचीत सांगता­, तुम्हीं चिन्ह­ पाहिलीं म्हणून नाहीं, तर भाकरी खाऊन तृप्त झालां म्हणून माझा शोध करितां.
  
27. नाशवंत अन्नासाठीं श्रम करुं नका, तर सार्वकालिक जीवनासाठीं टिकणार­ ज­ अन्न मनुश्याचा पुत्र तुम्हांस देईल, त्यासाठीं श्रम करा; कारण पिता जो देव त्यान­ त्याजवर शिक्क मारिला आहे.
  
28. यावरुन त्यांनीं त्याला म्हटल­, देवाचीं काम­ आमच्या हातून व्हावी म्हणून आम्हीं काय कराव­?
  
29. येशून­ त्यांस उत्तर दिल­, देवाच­ काम ह­च आहे कीं ज्याला त्यान­ पाठविल­ त्याजवर तुम्हीं विश्वास ठेवावा.
  
30. यावरुन त्यांनीं त्याला म्हटल­, आम्हीं ज­ पाहून आपणांवर विश्वास ठेवावा अस­ चिन्ह आपण कोणत­ दाखवितां? आपण काय काम करितां?
  
31. आमच्या पूर्वजांनीं अरण्यांत मान्ना खाल्ला; अस­ लिहिल­ आह­ कीं ‘त्यान­ त्यांस स्वर्गातून भाकर खावयाला दिली.’
  
32. यावरुन येशून­ त्यांस म्हटल­, मी तुम्हांस खचीत खचीत सांगता­, मोशान­ तुम्हांस स्वर्गातून येणारी भाकर दिली अस­ नाहीं, माझा पिता तर स्वर्गातून येणारी खरी भाकर तुम्हांस देतो.
  
33. कारण जी स्वर्गांतून उतरते व जगाला जीवन देते ती देवाची भाकर होय.
  
34. यास्तव ते त्याला म्हणाले, प्रभूजी, ही भाकर आम्हांस नित्य द्यावी.
  
35. येशून­ त्यांस म्हटल­, जीवनाची भाकर मी आह­; जो मजकडे येतो त्याला भूक लागणार नाहीं.
  
36. आणि जो मजवर विश्वास ठेवितो त्याला कधींहि तहान लागणार नाहीं, परंतु तुम्हीं मला पाहिल­ असतांहि विश्वास ठेवीत नाहीं, अस­ मीं तुम्हांस सांगितल­.
  
37. पिता ज­ मला देतो त­ सर्व मजकडे येईल; आणि जो मजकडे येतो त्याला मी घालविणार नाहींच.
  
38. कारण मीं आपल्या इच्छेप्रमाण­ नाहीं, तर ज्यान­ मला पाठविल­ त्याच्या इच्छेप्रमाण­ कराव­ म्हणून स्वर्गांतून उतरला­ आह­;
  
39. आणि ज्यान­ मला पाठविल­ त्याची इच्छा हीच आहे कीं त्यान­ ज­ सर्व मला दिल­ आहे त्यांतून मीं कांहीं हरवूं नये, तर शेवटल्या दिवशीं मीं ते उठवाव­.
  
40. माझ्या पित्याची इच्छा हीच आहे कीं जो कोणी पुत्राला पाहून त्याजवर विश्वास ठेवितो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हाव­; त्याला शेवटल्या दिवशीं मी उठवीन.
  
41. मी स्वर्गातून उतरलेली भाकर आह­ अस­ तो म्हणाला, म्हणून यहूदी त्याजविशयीं कुरकूर करुं लागले.
  
42. त्यांनी म्हटल­, योसेफाचा पुत्र येशू, ज्याचीं आईबाप­ आपल्याला ठाऊक आहेत, तोच हा आहे ना? तर तो आतां कस­ म्हणतो मी स्वर्गातून उतरलांे आहे?
  
43. येशून­ त्यांस उत्तर दिल­, तुम्ही आपसांत कुरकूर करुं नका.
  
44. ज्यान­ मला पाठविल­ त्या पित्यान­ आकर्शिल्यावांचून कोणाच्यान­ मजकडे येववत नाहीं; त्याला शेवटल्या दिवशीं मी उठवीन.
  
45. संदेश्ट्यांच्या ग्रंथांत अस­ लिहिल­ आहे कीं ‘ते सर्व देवान­ शिकविलेले असे होतील.’ जो कोणी पित्याच­ ऐकून शिकला आहे तो मजकडे येतो.
  
46. पित्याला कोणी पाहिले आहे अस­ नाहीं; जो देवापासून आहे त्यान­ मात्र पित्याला पाहील­ आहे.
  
47. मी तुम्हांस खचीत खचीत सांगता­, जो विश्वास धरितो त्याला सार्वकालिक जीवन आहे.
  
48. मी जीवनाची भाकर आह­.
  
49. तुमच्या पूर्वजांनीं अरण्यांत मान्ना खाल्ला तरी ते मेले.
  
50. स्वर्गातून उतरलेली भाकर अशी आहे कींं ती कोणी खाल्ली तर तो मरणार नाहीं.
  
51. स्वर्गातून उतरलेली जीवंत भाकर मी आह­; या भाकरींतून जो कोणी खाईल तो सर्वकाळ वांचेल; जी भाकर मी देईन ती जगाच्या जीवनासाठी माझा देह अशी आहे.
  
52. यास्तव यहूदी आपसांमध्य­ वितंडवाद करुं लागून म्हणाले, हा आम्हांस आपला देह खावयाला कसा देईल?
  
53. यावरुन येशून­ त्यांस म्हटल­, मी तुम्हांस खचीत खचीत सांगता­, तुम्हीं मनुश्याच्या पुत्राचा देह खाल्ला नाहीं व त्याच­ रक्त प्यालां नाहीं तर तुम्हांमध्य­ जीवन नाहीं;
  
54. जो माझा देह खातो व रक्त पितो त्याला सार्वकालिक जीवन आहे; त्याला शेवटल्या दिवशीं मी उठवीन.
  
55. कारण माझा देह खर­ खाद्य आहे व माझ­ रक्त खर­ पेय आहे.
  
56. जो माझा देह खातो व माझ­ रक्त पितो तो मजमध्य­ राहतो व मी त्याजमध्य­ राहता­.
  
57. जस­ जीवंत अशा पित्यान­ मला पाठविल­ आणि मी पित्यामुळ­ वांचता­, तस­ जो मला खातो तोहि मजमुळ­ वांचेल.
  
58. स्वर्गांतून उतरलेली जी भाकर ती हीच आहे; पूर्वज खाऊनसवरुन मेले, तस­ ह­ नाहीं; जो ही भाकर खातो तो सर्वकाळ वांचेल.
  
59. तो कफर्णहूमांत शिक्षण देत असतां त्यान­ सभास्थानांत या गोश्टी सांगितल्या.
  
60. त्याच्या शिश्यांपैकीं पुश्कळ जणांनीं ह­ ऐकून म्हटल­, ह­ वचन कठीण आहे, ह­ कोणाच्यान­ ऐकवेल?
  
61. आपले शिश्य याविशयीं कुरकूर करीत आहेत ह­ मनांत ओळखून येशू त्यांस म्हणाला, तुम्ही यामुळ­ अडखळतां काय?
  
62. मनुश्याचा पुत्र पूर्वी जेथ­ होता तेथ­ जर तुम्ही त्याला चढतांना पाहाल तर?
  
63. जीवंत करणारा तो आत्माच आहे, देहापासून कांही लाभ होत नाहीं; मीं जी वचन­ तुम्हांस सांगितलीं आहेत ती आत्मा व जीवन आहेत;
  
64. तरी तुम्हांपैकीं असे कित्येक आहेत कीं ते विश्वास धरीत नाहींत. विश्वास न धरणारे कोण आणि आपणाला धरुन देणारा कोण ह­ येशूला पहिल्यापासून ठाऊक होत­.
  
65. मग तो म्हणाला, यासाठींच मीं तुम्हांस सांगतिल­ आहे कीं माझ्या पित्यापासून कोणाहि मनुश्याला ही देणगी मिळाल्यावांचून त्याच्यान­ मजकडे येववत नाहीं.
  
66. यावरुन त्याच्या शिश्यांतील पुश्कळ जण परत गेले, ते पुनः कधीं त्याजबरोबर चालले नाहींत.
  
67. यास्तव येशू बारा शिश्यांस म्हणाला, तुम्हांलाहि निघून जाण्याची इच्छा आहे काय?
  
68. शिमोन पेत्रान­ त्याला उत्तर दिल­, प्रभुजी, आम्हीं कोणाकडे जाव­? सार्वकालिक जीवनाचीं वचन­ आपणाजवळच आहेत;
  
69. आणि आपण देवाचे पवित्र पुत्र आहां, असा आम्हीं विश्वास धरिला आहे व ओळखल­ आहे.
  
70. येशून­ त्यांस उत्तर दिल­ कीं मीं तुम्हां बारा जणांस निवडून घेतल­ कीं नाहीं? तरी तुम्हांतील एक जण सैतान आहे.
  
71. ह­ तो शिमोन इस्कर्योत याचा पुत्र यहूदा याविशयीं बोलला, कारण तो बारा शिश्यांतील एक असून त्याला धरुन देणारा होता.