Home / Marathi / Marathi New Testament / Web / Luke

 

Luke, Chapter 11

  
1. मग अस­ झाल­ कीं तो एका ठिकाणीं प्रार्थना करीत होता, आणि ती त्यान­ समाप्त केल्यावर त्याच्या शिश्यांतील एकान­ त्याला म्हटल­, प्रभुजी, जस­ योहानान­ आपल्या शिश्यांस प्रार्थना करावयास शिकविल­ तस­ आपणहि आम्हांस शिकवा.
  
2. तो त्यांस म्हणाला, तुम्ही प्रार्थना कराल तेव्हां अस­ म्हणा: हे (आमच्या स्वर्गातील) पित्या, तुझ­ नाम पवित्र मानिल­ जावो; तुझ­ राज्य येवो; (जस­ स्वर्गात तस­ पृथ्वीवरहि तुझ्या इच्छेप्रमाण­ होवो;)
  
3. आमची प्रतिदिवसाची भाकर प्रतिदिवशीं आम्हांस दे;
  
4. आणि आमच्या पापांची क्षमा कर, कारण आम्ही आपल्या प्रत्येक ऋण्याला क्षमा करिता­; आम्हांस परीक्ष­त आणूं नको; (तर आम्हांस वाईटापासून सोडीव.)
  
5. मग त्यान­ त्यांस म्हटल­, तुम्हांमध्य­ असा कोण आह­ कीं त्याला मित्र असून तो त्याजकडे मध्यरात्रीं जाऊन त्याला म्हणतो, गड्या, मला तीन भाकरी उसन्या दे;
  
6. कारण माझा एक मित्र प्रवासाहून मजकडे आला आहे, आणि त्याला वाढावयास मजजवळ कांही नाहीं;
  
7. आणि तो आंतून उत्तर देईल, मला श्रम देऊं नको; आतां दार लाविल­ आहे व माझी मुल­ माझ्याजवळ निजलीं आहेत; माझ्यान­ उठून तुला देववत नाहीं?
  
8. मी तुम्हांस सांगता­, तो त्याचा मित्र आहे यामळ­ जरी तो उठून त्याला देणार नाहीं, तरी त्याच्या आग्रहामुळ­ ज­ कांहीं पाहिजे त­ उठून त्याला देईल.
  
9. मी तुम्हांस सांगता­, मागा म्हणजे तुम्हांस दिल­ जाईल; शोधा म्हणजे तुम्हांस सापडेल; ठोका म्हणजे तुम्हांस उघडल­ जाईल;
  
10. कारण जो कोणी मागतो त्याला मिळत­, जो शोधितो त्याला सांपडत­, जो कोणी ठोकितो त्याच्यासाठीं उघडल­ जात­;
  
11. तुम्हांमध्य­ असा कोण बाप आहे कीं त्याच्याजवळ त्याच्या मुलान­ भाकर मागितली असतां तो त्याला धा­डा देईल?
  
12. किंवा अंड­ मागितल­ असतां त्याला विंचू देईल?
  
13. तर तुम्ही वाईट असतां तुम्हांला आपल्या मुलांनी चांगल्या देणग्या द्यावयाच­ कळत­, तर मग स्वर्गीय पित्याजवळ जे मागतात त्यांस तो किती विशेश­करुन पवित्र आत्मा देईल?
  
14. एकदा तो एक भूत काढीत होता, त­ मुके होत­. तेव्हां अस­ झाल­ कीं भूत निघाल्यावर मुका बोलूं लागला; त्यावरुन लोकसमुदायांस आश्चर्य वाटल­.
  
15. तरी त्यांतील कित्येक म्हणाले, भूतांचा अधिपति जो बालजबूल त्याच्या साह्यान­ हा भूत­ काढितो.
  
16. दुस-या कित्येकांनीं त्याची परीक्षा पाहण्याकरितां त्याच्याजवळ आकाशांतील चिन्ह मागितल­;
  
17. परंतु त्यांन­ त्याच्या मनांतील कल्पना जाणून त्यांस म्हटल­, आपसांत फूट पडलेल­ कोणतेहि राज्य ओसाड पडत­ आणि घरावर घर पडत­.
  
18. सैतानांतहि फूट पडली तर त्याच­ राज्य कस­ टिकेल? कारण, मी बाल्जबूलाच्या साह्यान­ भूत­ काढिता­, अस­ तुम्ही म्हणतां.
  
19. मी बाल्जबूलाच्या साह्यान­ भूत­ काढिता­ तर तुमचे पुत्र कोणाच्या साह्यान­ काढितात? यामुळ­ ते तुमचा न्याय करितील;
  
20. परंतु मीं जर देवाच्या सामर्थ्यान­ भूत­ काढिता­ तर देवाच­ राज्य तुम्हांवर येऊन चुकल­ आहे.
  
21. जेव्हां हत्यारबंद बळकट मनुश्य आपल्या वाड्याची रखवाली करितो तेव्हां त्याची मालमत्ता निर्भय राहते;
  
22. तरी त्याच्यापेक्षां बळकट असा एकादा मनुश्य त्याजवर येऊन त्याला जिंकितो तेव्हां ज्या शस्त्रसामग्रीवर त्यान­ भरवसा ठेवला होता ती तो घेऊन जातो, व त्यान­ लुटून आणलेली चीजवस्तू वांटून टाकतो.
  
23. जो मला अनुकूळ नाहीं तो मला प्रतिकूळ आहे; आणि जो माझ्याबरोबर गोळा करीत नाहीं तो उधळतो.
  
24. मनुश्यांतून अशुद्ध आत्मा निघाला म्हणजे तो निर्जन स्थलीं विश्रांतीचा शोधकरीत हिंडतो; आणि ती न मिळाली म्हणजे म्हणतो, ज्या माझ्या घरांतून मी निघाला­ त्यांत परत जाईन;
  
25. आणि तो आल्यावर त­ झाडलेल­ व सुशोभित केलेल­ आहे अस­ पाहतो.
  
26. नंतर तो जाऊन आपणापेक्षां दुश्ट असे सात आत्मे बरोबर घेतो; आणि ते आंत शिरुन तेथ­ राहतात, मग त्या मनुश्याची शेवटली दशा पहिल्या दशेपेक्षां वाईट होते.
  
27. तो या गोश्टी बोलत असतां अस­ झाल­ कीं लोकसमुदायांतील कोणीएक स्त्री उच्च स्वरांन­ त्याला म्हणाली, ज्या ओटींन­ आपला भार वाहिला व जी स्तन­ आपण चोखिलीं तीं धन्य.
  
28. तो म्हणाला, जे देवाच­ वचन ऐकून त­ पाळितात तेच धन्य.
  
29. तेव्हां लोकसमुदाय त्याच्याजवळ एकत्र जमत असतां तो अस­ म्हणूं लागला, ही पिढी वाईट आहे, ही चिन्ह मागते; परंतु योनाच्या चिन्हावांचून तिला चिन्ह मिळणार नाहीं.
  
30. कारण जसा योना निनवेकरांस चिन्ह झाला तसा मनुश्याचा पुत्र या पिढीला होईल.
  
31. दक्षिणेची राणी न्यायकाळी या पिढीच्या लोकांबरोबर उठून त्यांस दोशी ठरवील; कारण शलमोनाच­ ज्ञान ऐकावयास ती पृथ्वीच्या सीमेपासून आली; तर पाहा, शलमोनापेक्षां श्रेश्ठ असा कोणी एथ­ आहे.
  
32. निनवेचे लोक न्यायकाळीं या पिढीच्याबरोबर उभे राहून हिला दोशी ठरवितील; कारण त्यांनी योनाच्या उपदेशावरुन पश्चाताप केला; तर पाहा, योनापेक्षां श्रेश्ठ असा कोणी येथ­ आहे.
  
33. कोणी दिवा लावून तळघरांत किंवा मापाखाली ठेवीत नाहीं, तर आंत येणा-यांस उजेड दिसावा म्हणून दिवठणीवर ठेवितो.
  
34. तुझ्या शरीराचा दिवा तुझा डोळा आहे; तुझा डोळा निर्दोश असला तर तुझ­ शरीरहि अंधकारामय आहे.
  
35. यास्तव तुझ्यामध्य­ जो प्रकाष आहे तो अंधार तर नसेलना, ह­ पाहा.
  
36. तुझ­ सर्व शरीर प्रकाशमय असल­, म्हणजे त्याचा कोणताहि भाग अंधकारमय नसला, तर दिव्याच्या ज्योतींन­ तुला प्रकाश प्राप्त होतो त्याप्रमाण­ त­ पूर्ण प्रकाशमय होईल.
  
37. तो बोलत आहे इतक्यांत एका परुश्यान­ त्याला आपल्या एथ­ भोजनास येण्याची विनंति केली; मग तो आंत जाऊन भोजनास बसला.
  
38. त्यान­ भोजनापूर्वी स्नान केल­ नाहीं अस­ पाहून परुश्याला आश्चर्य वाटल­;
  
39. परंतु प्रभून­ त्याला म्हटल­, तुम्ही परुशी ताटवाठी बाहेरुन स्वच्छ करितां; परंतु तुमचा अंतर्भाग अपहार व दुश्टपणा यांनीं भरला आहे.
  
40. अहो मूर्खांनो, ज्यान­ बहिर्भाग केला त्यानंे अंतर्भागहि केला नाहीं काय !
  
41. तर ज­ आंत आहे त्याचा दानधर्म करा म्हणजे, पाहा, सर्व तुम्हांस शुद्ध आहे.
  
42. तुम्हां परुश्यांस धिक्कार असो ! तुम्ही पुदिना, सताप व प्रत्येक भाजी यांचा दशमांश देतां, पण न्याय व देवाची प्रीति यांची उपेक्षा करितां; या गोश्टी करावयाच्या होत्या, व त्या सोडावयाच्या नव्हत्या.
  
43. तुम्हां परुश्यांस धिक्कार असो ! सभास्थानांमध्य­ श्रेश्ठ असान­ व बाजारांत नमस्कार घेण­ हीं तुम्हांस आवडतात.
  
44. तुम्हांस धिक्कार असो ! ज्या अदृश्य कबरांवरुन माणस­ न समजतां चालतात त्यांसारख­ तुम्ही आहां.
  
45. तेव्हां शास्न्न्यांतील कोणीएकान­ त्याला म्हटल­, गुरुजी, आपण अस­ बोलून आमचीहि निंदा करितां.
  
46. तो म्हणाला, तुम्हां शास्न्न्यांसहि धिक्कार असो ! वाहावयास अवघड अशीं ओझीं तुम्ही माणसांवर लादितां, आणि स्वतः आपल­ एक बोट देखील त्या ओझ्यांस लावीत नाहीं.
  
47. तुम्हांस धिक्कार असो ! तुम्ही संदेश्टयांचीं थडगीं बांधितां, आणि त्यांस तर तुमच्या पूर्वंजांनीं जिव­ मारिल­.
  
48. तुम्ही साक्षीदार आहां व आपल्या पूर्वजांच्या कर्मास मान्य आहां, कारण त्यांनीं त्यांस जिव­ मारिल­ व तुम्ही त्यांची थडगीं बांधितां.
  
49. देवज्ञानान­हि म्हटल­, मी त्यांजकडे संदेश्टे व प्रेशित पाठवीन, आणि त्यांच्यांतील कित्येकांस ते जिव­ मारितील व छळितील;
  
50. यासाठीं कीं जगाच्या स्थापनेपासून त्या सर्व संदेश्ट्यांच­ रक्त,
  
51. म्हणजे हाबेलाच्या रक्तापासून वेदीच्या व पवित्रस्थानाच्यामध्य­ ज्या जख-याचा घात झाला त्याच्या रक्तापर्यंत ज­ रक्त पाडिल­ गेल­ त्याचा हिशोब या पिढीपासून घेतला जावा; हो, मी तुम्हांस सांगता­, त्याचा हिशेब शब्बाथ या पिढीपासून घेतला जाईलच.
  
52. तुम्हां शास्न्न्यांस धिक्कार असो ! तुम्ही ज्ञानाची किल्ली घेऊन गेलां; तुम्ही स्वतः आंत गेलां नाहीं व जे आंत जात होते त्यांस तुम्हीं अटकाव केला.
  
53. तो तेथून बाहेर आल्यावर शास्त्री व परुशी आवेशान­ त्याच्या अंगावर येऊन त्यान­ पुश्कळशा गोश्टींविशयीं बोलाव­ म्हणून त्याला चिडवूं लागले;
  
54. आणि त्याच्या ता­डून कांही निघाल्यास त्याला पकडाव­ म्हणून टपून राहिले.