Home / Marathi / Marathi New Testament / Web / Luke

 

Luke, Chapter 13

  
1. त्याच समयीं तेथ­ असणा-या कित्येकांनीं त्याला, ज्या गालीलकरांच­ रक्त पिलातान­ त्यांच्या यज्ञांत मिश्रित केल­ होत­, त्यांजविशयीं सांगितल­.
  
2. त्यान­ त्यांस उत्तर दिल­, या गालीलकरांनीं अस­ दुःख भोगिल­ यावरुन दुस-या सर्व गालीलकरांपेक्षा ते पापी होते अस­ तुम्हांस वाटत­ काय?
  
3. मी तुम्हांस सांगता­, नव्हते; तरी पण तुम्हीं पश्चाताप न केल्यास त्याप्रमाण­ नाश पावाल;
  
4. किंवा ज्या अठरा जणांवर शिलोहांतील बुरुज पडून त्यांचा घात झाला, ते यरुशलेमांम राहणा-या सर्व मनुश्यांपेक्षां अपराधी होते अस­ तुम्हांस वाटत­ काय?
  
5. मी तुम्हांस सांगता­, नव्हते; तरी पण तुम्हीं पश्चाताप न केल्यास सर्व तसाच नाश पावाल.
  
6. त्यान­ हा दाखला सांगितला: कोणाएकाच­ द्राक्षमळîांत लाविलेल­ अंजिराच­ एक झाड होत­; त्यावर तो फळ पाहावयास आला परंतु त्याला मिळाल­ नाहीं.
  
7. तेव्हां त्यान­ माळîाला म्हटल­, पाहा, मी आज तीन वर्शे या अंजिरावर पाहावयास येता­ परंतु मला कांहीं आढळत नाहीं; त­ तोडून टाक; भूमीला उगाच भार तरी कां असावा?
  
8. तेव्हां त्यान­ त्याला उत्तर दिल­, महाराज, यंदाच­हि वर्श त­ असूं द्या, म्हणजे मी त्याच्याभोवत­ खणून खत घालीन;
  
9. मग त्याला फळ आल­ तर बर­; नाहीतर आपण त­ तोडून टाकाव­.
  
10. तो शब्बाथ दिवशीं एका सभास्थानांत शिकवीत होता.
  
11. तेव्हां पाहा, जिला अठरा वर्शे विकाराचा आत्मा लागला होता अशी एक स्त्री तेथ­ होती; ती कुबडी असल्यामुळ­ तिला अगदीं उभ­ राहवत नसे.
  
12. तिला येशून­ पाहून बोलावून म्हटल­, बाई, तूं आपल्या विकारापासून मुक्त झाली आहेस.
  
13. त्यान­ तिजवर हात ठेवितांच ती सरळ झाली व देवाचा महिमा वर्णू लागली.
  
14. येशून­ शब्बाथ दिवशीं रोग बरा केला म्हणून सभास्थानाचा अधिकारी संतप्त होऊन लोकसमुदायाला म्हणाला, काम करण्याचे असे सहा दिवस आहेत; तर त्यांत येऊन बरे होऊन जात जा, शब्बाथ दिवशीं येऊं नका;
  
15. परंतु प्रभून­ त्याला उत्तर दिल­, अहा­ ढा­ग्यानो, तुम्हांतील प्रत्येक जण आपला बैल किंवा गाढव शब्बाथ दिवशीं ठाणावरुन सोडून पाण्यावर नेतो कीं नाहीं?
  
16. ही तर अब्राहामाची कन्या आहे; पाहा, हिला सैतानान­ अठरा वर्शे बांधून ठेविल­ होत­; हिला या बंधनापासून शब्बाथ दिवशीं सोडविण­ योग्य नव्हत­ काय?
  
17. तो ह­ बोलत असतां त्याचे सर्व विरोधी लज्जित झाले; आणि जीं गौरवयुक्त कृत्य­ त्याजकडून होत होतीं त्या सर्वांमुळ­ सर्व लोकसमुदायान­ आनंद केला.
  
18. ह्यावरुन तो म्हणाला, देवाच­ राज्य कशासारख­ आहे? मी त्याला कशाची उपमा देऊं?
  
19. त­ मोहरीच्या दाण्यासारख­ आहे; तो एका मनुश्यान­ घेऊन आपल्या मळîांत पेरिला; मग तो वाढून झाड झाला; आणि ‘आकाशांतील पाखर­ त्याच्या फांद्यांत वस्तीस राहूं लागली.’
  
20. तो पुनः म्हणाला, मी देवाच्या राज्याला कशाची उपमा देऊं? त­ खमिरासारख­ आहे;
  
21. त­ एका स्त्रीन­ घेऊन तीन माप­ पिठामध्य­ लपवून ठेविल­, तेण­करुन शेवटीं त­ सर्व फुगून गेलंे.
  
22. तो शिक्षण देत नगरोनगरीं व गांवोगांवीं फिरत फिरत यरुशलेमाकडे चालला.
  
23. तेव्हां कोणीएकान­ त्याला म्हटल­, प्रभूजी, तारणप्राप्ती होत असलेले लोक थोडे आहेत कीं काय?
  
24. तो त्यांस म्हणाला, अरुंद दरवाजान­ आंत जावयाला जोराचा यत्न करा; कारण मी तुम्हांस सांगता­, पुश्कळ लोक आंत जावयास पाहतील, परंतु त्यांच्यान­ जाववणार नाहीं.
  
25. एकदां घरधन्यान­ उठून दार बंद केल­ म्हणजे तुम्ही बाहेर उभे राहून व दार ठोकून म्हणूं लागाल, प्रभूजी आम्हांस उघडा; तेव्हां तो तुम्हांस उत्तर देईल, तुम्ही कोठले आहां, ह­ मला माहीत नाहीं;
  
26. तेव्हां तुम्ही म्हणूं लागाल, आम्हीं तुमच्यासमक्ष खाल्य­प्याल­, आणि तुम्हीं आमच्या मार्गावर शिक्षण दिल­;
  
27. परंतु तो म्हणेल, मी तुम्हांस सांगता­, तुम्ही कोठल­ आहां ह­ मला माहीत नाहीं; ‘अहो सर्व अधर्म करणा-यांना­, तुम्ही मजपासून दूर व्हा.’
  
28. तुम्ही जेव्हां अब्राहाम, इसहाक, याकोब व सर्व संदेश्टे यांस देवाच्या राज्यांत असलेले व स्वतःस बाहेर टाकण्यांत आलेले पाहाल, तेव्हां रडण­ व दांतखाण­ चालेल.
  
29. ‘पूर्वेकडून, पश्चिमेकडून,’ उत्तरेकडून व दक्षिणेकडून लोक येऊन देवाच्या राज्यंात बसतील;
  
30. आणि पाहा, जे पहिले होतील अस­ कांही शेवटले आहेत, आणि शेवटले होतील असे कांही पहिले आहेत.
  
31. त्याच घटकेस कित्येक परुशी येऊन त्याला म्हणाले, एथून निघून जा; कारण हेरोद तुम्हांला जिव­ मारावयास पाहत आहे.
  
32. त्यान­ त्यांस म्हटल­, त्या खोकडाला जाऊन सांगा, पाहा, मी आज व उद्यां भूत­ काढिता­ व रोेग बरे करिता­, आणि तिस-या दिवशींं मी परिपूर्ण होईन.
  
33. तरी मला आज, उद्यां व परवां पुढ­ चालल­ पाहिजे; कारण यरुशलेमाबाहेर संदेश्ट्याचा नाश झाला अस­ व्हावयाच­ नाहीं.
  
34. यरुशलेमा, यरुशलेमा, संदेश्ट्यांचा घात करणा-या, व तुझ्याकडे पाठविलेल्यांस दगडमार करणा-या ! जशी का­बडी आपलीं पिल­ पंखाखाली एकवट करिते तस­ तुझ्या मुलांबाळांस एकवट करावयाच­ किती तरी वेळां माझ्या मनांत आल­; पण त­ तुमच्या मनांत आल­ नाहीं !
  
35. पाहा, ‘तमच­ घर तुम्हांकरितां ओसाड अस­ पडल­ आहे;’ मी तुम्हांस सांगता­ कीं ‘प्रभूच्या नामान­ येणारा तो धन्यवादित’ अस­ म्हणाल, तोपर्यंत तुम्ही मला पाहणारच नाहीं.