Home / Marathi / Marathi New Testament / Web / Luke

 

Luke, Chapter 15

  
1. सर्व जकातदार व पापी लोक त्याच­ ऐकावयास त्याच्याजवळ येत होते.
  
2. तेव्हां परुशी व शास्त्री या उभयतांनीं अशी कुरफर केली कीं हा पापी लोकांचा स्वीकार करुन त्यांजबरोबर जेवतो.
  
3. मग त्यान­ त्यांस हा दाखला सांगितला:
  
4. तुम्हांमध्य­ असा कोण मनुश्य आहे कीं त्याच्याजवळ शंभर म­ढर­ असतां त्यांतून एक हरवल­, तर तीं नव्याण्णव रानांत सोडून देऊन हरवलेल­ सांपडेपर्यंत त्याचा शोध करीत नाहीं?
  
5. त­ सांपडल्यावर तो त­ आनंदान­ खांद्यावर घेतो;
  
6. आणि घरीं येऊन मित्रांस व शेजा-यांस बोलावून त्यांस म्हणतो, माझ­ हरवलेल­ म­ढरुं सांपडल­ आहे म्हणून माझ्याबरोबर आनंद करा.
  
7. त्याप्रमाण­ ज्यांस पश्चातापाची गरज नाहीं अशा नव्याण्णव धार्मिकांबद्दल होणा-या आनंदापेक्षां पश्चाताप करणा-या एका पापी मनुश्याबद्दल स्वर्गात अधिक आनंद होईल, ह­ मी तुम्हांस सांगता­.
  
8. तस­च, अशी स्त्री कोण आहे कीं तिच्याजवळ दहा पावल्या असतां त्यांतून एक पावली हरवली तर दिवा लावून व घर झाडून ती सांपडेपर्यंत मन लावून शोध करीत राहत नाहीं?
  
9. ती सांपडल्यावर ती मैत्रिणींस व शेजा-यांस बोलावून म्हणते, माझी हरवलेली पावली मला सांपडली, म्हणून माझ्याबरोबर आनंद करा.
  
10. त्याप्रमाण­, पश्चाताप करणा-या एका पापी मनुश्याबद्दल देवाच्या दूतांसमोर आनंद होतो, ह­ मी तुम्हांस सांगता­.
  
11. आणखी तो म्हणाला, कोणाएका मनुश्याला देान मुलगे होते;
  
12. त्यांतील धाकटा बापाला म्हणाला, बाबा, मालमत्तेचा माझा वांटा मला द्या. तेव्हां त्यान­ त्यांस आपली संपत्ति वांटून दिली.
  
13. मग फार दिवस झाले नाहींत तो धाकटा मुलगा सर्व जमा करुन दूर देशी निघून गेला; आणि तेथ­ त्यान­ चैनबाजी करुन आपली संपत्ति उडविली.
  
14. त्यान­ आपल­ सर्व खर्चून टाकिल्यावर त्या देशांत मोठा दुश्काळ पडला; तेव्हां त्याला अडचण पडूं लागली.
  
15. मग तो त्या देशांतील एका रहिवाश्याजवळ जाऊन त्याला चिकटून राहिला; त्यान­ त्याला आपल्या शेतांत डुकर­ चारावयास पाठविल­.
  
16. तेव्हां ज्या श­गा डुकर­ खात असत त्यांतल्या तरी खाऊन पोट भराव­ अस­ त्याला वाटल­; त्याला कोणी कांहीं दिल­ नाहीं.
  
17. नंतर तो शुद्धीवर येऊन म्हणाला, माझ्या बापाच्या किती मोलक-यांस भाकरीची रेलचेल आहे ! आणि मी एथ­ भुकेन­ मरता­.
  
18. मी उठून आपल्या बापाकडे जाईन व त्याला म्हणेन, बाबा, मीं स्वर्गाविरुद्ध व तुमच्या दृश्टीन­ पाप केल­ आहे;
  
19. आतां तुमचा पुत्र म्हणावयास मी योग्य नाहीं; आपल्या एका मोलक-यांप्रमाण­ मला ठेवा.
  
20. मग तो उठून आपल्या बापाकडे गेला. तो दूर आहे इतक्यांत त्याच्या बापान­ त्याला पाहिल­ आणि कळवळा येऊन तो धावत गेला; त्यान­ त्याच्या गळîांत मिठी घातली व त्याचे पुश्कळ मुके घेतले.
  
21. मुलगा त्याला म्हणाला, बाबा, मीं स्वर्गाविरुद्ध व तुमच्या दृश्टीन­ पाप केल­ आहे; आणि आतां तुमचा पुत्र म्हणावयास मी योग्य नाहीं;
  
22. पण बापान­ आपल्या दासांस सांगितल­, लवकर उत्तम झगा आणून याला घाला; आणि याच्या हातात अंगठी व पायांत जोडा घाला;
  
23. पोसलेल­ वासरुं आणून कापा; आपण खाऊं आणि उत्साह करुं;
  
24. कारण हा माझा मुलगा मेला होता तो पुनः जीवंत झाला आहे; हरवला होता तो सांपडला आहे; मग ते उत्साह करुं लागले.
  
25. त्याचा वडील मुलगा शेतांत होता; तो घराजवळ आला तेव्हां त्यान­ वाद्य­ व नृत्य ऐकल­.
  
26. तेव्हां त्यान­ एका चाकराला बोलावून विचारिल­, ह­ काय चालल­ आहे?
  
27. त्यान­ त्याला सांगितल­, आपला भाऊ आला आहे; आणि तो आपल्या वडिलांना सुखरुप मिळाला म्हणून त्यांनीं पोसलेल­ वासरुं कापिल­ आहे.
  
28. तेव्हां तो रागावून आंत जाईना, म्हणून त्याचा बाप बाहेर येऊन त्याची समजूत घालूं लागला;
  
29. परंतु त्यान­ बापाला उत्तर दिल­, पाहा, मी इतकी वर्शे तुमची सेवाचाकरी करीत आह­, आणि तुमची एकहि आज्ञा मीं कधीं मोडिली नाहीं; तरी मीं आपल्या मित्रांबरोबर उत्साह करावा, म्हणून तुम्ही मला कधीं करडूंहि दिल­ नाहीं;
  
30. पण ज्यान­ तुमची संपत्ति कसबिणींबरोबर खाऊन टाकिली तो हा तुमचा मुलगा आला तेव्हां तुम्हीं त्याच्यासाठीं पोसलेल­ वासरुं कापिल­.
  
31. त्यान­ त्याला म्हटल­, बाळा, तूं माझ्याबरोबर नेहमींच आहेस, आणि ज­ कांही माझ­ आहे त­ सर्व तुझ­च आहे;
  
32. तरी उत्साह व आनंद करण­ ह­ योग्य आहे; कारण हा तुझा भाऊ मेला होता, तो जिवंत झाला आहे; हरवला होता तो सांपडला आहे.