Home / Marathi / Marathi New Testament / Web / Luke

 

Luke, Chapter 16

  
1. त्यान­ शिश्यांसहि म्हटल­, कोणीएक श्रीमंत मनुश्य होता व त्याचा एक कारभारी होता; त्याजवर, हा तुमच­ द्रव्य उडवितो, असा आरोप त्याकडे करण्यांत आला.
  
2. तेव्हां त्यान­ त्याला बोलावून म्हटल­, तुजविशयीं मी ह­ काय ऐकता­? तूं आपल्या कारभाराचा हिशोब दे; कारण यापुढ­ तुला कारभार पाहावयाचा नाहीं.
  
3. मग कारभा-यान­ आपल्या मनांत म्हटल­, माझा धनी मजपासून कारभार काढून घेणार आहे, तर मी काय करुं? खणावयास मला शक्ति नाहीं; भीक मागावयास लाज वाटते.
  
4. तर कारभारावरुन काढिल्यावर लोकांनीं मला आपल्या घरांत घ्याव­ म्हणून मीं काय कराव­ ह­ आतां मला सुचल­.
  
5. मग त्यान­ आपल्या धनाच्या प्रत्येक देणेक-यास बोलाविल­ आणि पहिल्याला म्हटल­, माझ्या धन्याच­ तुला किती देणे आहे?
  
6. तो म्हणाला, शंभर मण तेल, त्यान­ त्याला म्हटल­, हा तुझा लेख घे आणि लवकर बसून यावर पन्नास मांड.
  
7. नंतर दुस-याला म्हटल­, तुला किती देण­ आहे? तो म्हणाला, शंभर खंडया गहूं, तो त्याला म्हणाला, हा तुझा लेख घे व ए­शीं मांड.
  
8. अन्यायी कारभा-यान­ शहाणपण केल­ यावरुन धन्यान­ त्याची वाहवा केली; या युगाचे पुत्र स्वजातीविशयीं प्रकाशाच्या पुत्रांपेक्षां शहाणे असतात.
  
9. आणखी मी तुम्हांस सांगता­, अन्यायाच्या धनान­ तुम्ही आपणांसाठीं मित्र जोडा; यासाठीं कीं त­ नाहींस­ होईल तेव्हां त्यांनीं तुम्हांस चिरकाल टिकणा-या वस्तींत घ्याव­.
  
10. जो अगदीं अल्प गोश्टीविशयीं विश्वासू तो पुश्कळाविशयींहि विश्वासू आहे, आणि जो अगदीं अल्प गोश्टीविशयीं अन्यायी तो पुश्कळाविशयींहि अन्यायी आहे.
  
11. यास्तव तुम्ही अन्यायाच्या धनाविशयीं विश्वासू न झालां तर ज­ खर­ धन त­ तुम्हांला कोण सोपून देईल?
  
12. आणि ज­ दुस-याच­ त्याविशयीं तुम्ही विश्वासू न झालां तर ज­ तुमच­ स्वतःच­ त­ तुम्हांस कोण देईल?
  
13. कोणत्याहि चाकराला दोन धन्यांची चाकरी करितां येत नाहीं; कारण तो एकाचा द्वेश करील व दुस-यावर प्रीति करील; अथवा एकाला धरुन राहील व दुस-याला तुच्छ मानील. तुम्हांला देवाची आणि धनाची सेवा करितां येत नाहीं.
  
14. ह­ सर्व ऐकून धनलोभी परुश्यांनी त्याचा उपहास केला.
  
15. त्यान­ त्यांस म्हटल­, तुम्ही आपणांस मनुश्यांसमक्ष धार्मिक ठरवून घेणारे आहां, परंतु देव तुमचीं अंतःकरण­ ओळखून घेतो; मनुश्यांस ज­ उच्च अस­ वाटत­ त­ देवाच्या दृश्टीन­ आ­गळ आहे.
  
16. योहानापर्यंत नियमशास्त्र व संदेश्टे होते; तेव्हांपासून देवाच्या राज्याची सुवार्ता गाजविली जात आहे, आणि प्रत्येक मनुश्य त्यांत नेटान­ प्रवेश करितो.
  
17. 1नियमशास्त्राचा एक फाटा रद्द होण्यापेक्षां आकाश व पृथ्वी नाहींशी होण­ ह­ सोपे आह­ आहे.
  
18. जो कोणी आपली बायको टाकून दुसरीबरोबर लग्न करितो तो व्यभिचार करितो; आणि नव-यान­ टाकिलेल्या बायकोबरोबर जो लग्न करितो तो व्यभिचार करितो.
  
19. कोणीएक श्रीमंत मनुश्य होता, तो जांभळीं व फार बारीक सुताचीं वस्त्र­ घालीत असे, आणि प्रतिदिवशी थाटामाटान­ ख्यालाखुशाली करीत असे;
  
20. त्याच्या दरवाजाजवळ लाजार नांवाचा फोडांनीं भरलेला एक दरिद्री टाकण्यांत आला होता;
  
21. त्या श्रीमंताच्या मेजावरुन खालीं पडेल त्यावर आपल­ पोट भराव­ अशी त्याची इच्छा होती; आणि कुत्री येऊन त्याचे फोड चाटीत असत.
  
22. पुढ­ अस­ झाल­ कीं तो दरिद्री मेला, आणि देवदूतांनीं त्याला अब्राहामाच्या उराजवळ नेऊन ठेविल­; श्रीमंतहि मेला व त्याला पुरल­.
  
23. मग तो अधोलोकांत यातना भोगीत असतां त्यान­ आपली दृश्टि वर करुन अब्राहाम व त्याच्या उराजवळ बसलेला लाजार यांस दुरुन पाहिल­.
  
24. तेव्हां त्यान­ हाक मारुन म्हटल­, हे बापा अब्राहामा, मजवर दया करुन लाजाराला पाठीव, यासाठीं कीं त्यान­ आपल्या बोटाच­ टोक पाण्यांत बुचकळून माझी जीभ थंड करावी; कारण या जाळांत मी क्लेश भोगीत आह­.
  
25. अब्राहाम म्हणाला, मुला, तुला आपल्या आयुश्यांत आपल­ सुख भरुन मिळाल­, तस­ लाजाराला दुःख भरुन मिळाल­, याची आठवण कर, आतां ह्याला एथ­ समाधान मिळत आहे व तूं क्लेश भोगीत आहेस;
  
26. याशिवाय जे एथून तुम्हांकडे पार जाऊं पाहतात त्यांस जातां येऊ नये व तिकडून कोणी आम्हांकडे येऊं नये म्हणून आमच्या व तुमच्यामध्य­ मोठा दरा स्थापिलेला आहे.
  
27. मग तो म्हणाला, तर बापा, मी विंनंति करिता­, त्याला माझ्या बापाच्या घरीं पाठीव;
  
28. कारण मला पांच बंधु आहेत; त्यांनी तरी या यातनेच्या स्थळीं येऊं नये म्हणून त्यान­ त्यांस साक्ष द्यावी.
  
29. अब्राहामानंे त्याला म्हटल­, त्यांच्याजवळ मोशे व संदेश्टे आहेत त्यांचे त्यांनी ऐकाव­.
  
30. तो म्हणाला, हे बापा अब्राहामा, अस­ नाहीं; मेलेल्यांमधून कोणी त्यांजकडे गेला तर ते पश्चाताप करितील.
  
31. तेव्हां त्यान­ त्याला म्हटल­, जर ते मोशाच­ व संदेश्ट्यांच­ ऐकत नाहींत तर मेलेल्यांमधूनहि कोणी उठला तरी त्यांची खातरी होणार नाहीं.