Home / Marathi / Marathi New Testament / Web / Luke

 

Luke, Chapter 22

  
1. बेखमीर भाकरींंचा सण, ज्याला वल्हांडण म्हणतात तो जवळ आला होता;
  
2. तेव्हां मुख्य याजक व शास्त्री हे त्याचा घात कसा करावा ह्या विचारांत पडले होते; कारण त्यांना लोकांची भीति वाटत होती.
  
3. तेव्हां बारांतील एक जण इस्कर्योत म्हटलेला यहूदा यांत सैतान शिरला;
  
4. आणि तो निघून जाऊन मुख्य याजक व सरदार यांच्या हातीं त्याला कस­ धरुन द्याव­ याविशयीं त्यांजबरोबर बोलला.
  
5. तेव्हां त्यांस आनंद झाला व त्यांनीं त्याला पैका देण्याचा करार केला.
  
6. त्याला तो मान्य झाला, आणि गर्दी नसेल तेव्हां त्यांच्या हातीं त्याला धरुन देण्यांस संधि पाहूं लागला.
  
7. नंतर ज्या दिवशीं वल्हांडणाचा यज्ञपशु मारावयाचा, तो बेखमीर भाकरींचा दिवस आला.
  
8. तेव्हां त्यान­ पेत्र व योहान यांस अस­ सांगून पाठविल­ कीं आपण वल्हांडण सणाच­ भोजन कराव­ म्हणून तुम्ही जाऊन आपल्यासाठीं तयारी करा.
  
9. ते त्याला म्हणाले, आम्हीं कोठ­ तयारी करावी म्हणून आपली इच्छा आहे?
  
10. त्यान­ त्यांस सांगितल­, पाहा, तुम्हीं नगरांत प्रवेश केल्यावर पाण्याची घागर घेऊन जाणारा एक मुनश्य तुम्हांस आढळेल; तो ज्या घरांत जाईल त्यांत त्याच्यामागून जा;
  
11. आणि त्या घराच्या धन्याला सांगा: गुरु तुला म्हणतो, मला आपल्या शिश्यांसह वल्हांडणाच­ भोजन करितां येईल अशी भोजनाची जागा कोठ­ आहे? मग तो तुम्हांस सजविलेली मोठी माडी दाखवील;
  
12. तेथ­ तयारी करा.
  
13. तेव्हां ते गेले व त्यांस त्यान­ सांगितल्याप्रमाण­ आढळल­; आणि त्यांनीं वल्हांडणची तयारी केली.
  
14. नंतर वेळ झाली तेव्हां तो जेवावयास बसला व त्याजबरोबर प्रेशितहि बसले.
  
15. तेव्हां तो त्यांस म्हणाला, मीं दुःख भोगण्यापूर्वी ह­ वल्हांडणाच­ भोजन तुम्हांबरोबर करावयाची माझी फार उत्कट इच्छा होती;
  
16. कारण मी तुम्हांस सांगता­ कीं देवाच्या राज्यांत ह­ पूर्ण होईपर्यंत मी ह­ भोजन पुनः करणार नाहीं.
  
17. मग प्याला स्वीकारुन व ईशोपकारस्मरण करुन तो म्हणाला, हा घ्या, आणि आपणांत ह्याची वांटणी करा;
  
18. मी तुम्हांस सांगता­ कीं देवाच­ राज्य येईपर्यंंत द्राक्षवेलाचा उपज यापुढ­ मी पिणार नाहीं.
  
19. मग त्यान­ भाकरी घेऊन व ईशोपकारस्मरण करुन ती मोडिली, आणि त्यांस देऊन म्हटल­, तुम्हांसाठीं दिल­ जात आहे अस­ ह­ माझ­ शरीर आहे, माझ्या स्मरणार्थ ह­ करा.
  
20. त्याप्रमाण­ भोजन झाल्यावर त्यान­ प्याला घेऊन म्हटल­, हा प्याला तुम्हांसाठीं ओतिल­ जात आहे अस­ ज­ माझ­ ‘रक्त त्यांत नवा करार’ आहे;
  
21. पण पाहा, मला धरुन देणा-याचा हात मजबरोबर मेजावर आहे.
  
22. मनुश्याचा पुत्र ठरविल्याप्रमाण­ जातो खरा, परंतु ज्याच्या हातून तो धरुन दिला जातो त्या मनुश्याला धिक्कार असो !
  
23. तेव्हां ह­ करणारा कोण असावा, ह्याचा ते आपणांत विचार करुं लागले.
  
24. आणखी, आपणांमध्य­ कोण मोठा मानला जात आहे, याविशयींहि त्यांमध्य­ वाद झाला;
  
25. तेव्हां त्यान­ त्यांस म्हटल­, विदेश्यांचे राजे त्यांजवर प्रभुत्व चालवितात, आणि जे त्यांजवर अधिकार करितात त्यांस परोपकारी अस­ नांव देतात;
  
26. परंतु तुम्ही तस­ नसाव­; तर तुम्हांमध्य­ जो मोठा तो धाकट्यासारिखा व जो अधिकारी तो सेवा करणा-यासारिखा होवो.
  
27. मोठा कोण? भोजनास बसणारा किंवा सेवा करणारा? भोजनास बसणारा कीं नाहीं? मी तर तुम्हांमध्य­ सेवा करणा-यासारिखा आह­;
  
28. आणि माझ्या परीक्षांमध्य­ माझ्याबरोबर टिकून राहिलेले तुम्हीच आहां.
  
29. जस­ माझ्या बापान­ मला राज्य नेमून दिल­ तस­ मीहि तुम्हांस नेमून देता­,
  
30. यासाठीं कीं तुम्हीं माझ्या राज्यांत माझ्या मेजावर खावें व प्यावें; आणि तुम्हीं राजासनावर बसून इस्त्राएलाच्या बारा वंशाचा न्याय करावा.
  
31. शिमोना, शिमोना, पाहा, तुम्हांस गव्हासारिख­ चाळाव­ म्हणून सैतानान­ तुम्हांस मागितल­;
  
32. परंतु तुझा विश्वास नाहींसा होऊं नये म्हणून त्ुझ्यासाठीं मीं विनंति केली आहे; आणि तूं वळलास, म्हणजे आपल्या भावांस स्थिर कर.
  
33. तो त्याला म्हणाला, प्रभुजी, मी आपणाबरोबर बंदिशाळ­त व मरावयालाहि जाण्यास तयार आह­.
  
34. तो म्हणाला, पेत्रा, मी तुला सांगता­, तूं मला ओळखतोस ह­ तीन वेळा नाकारशील तोपर्यंत आज का­बडा आरवणार नाहीं.
  
35. आणखी त्यान­ त्यांस म्हटले, मी तुम्हांस पिशवी, झोळी व वहाणा यांवांचून पाठविल­ तेव्हां तुम्हांस कांहीं उण­ पडल­ काय? ते म्हणाले, कांही नाहीं.
  
36. त्यान­ त्यांस म्हटल­, आतां तर ज्याच्याजवळ पिशवी आहे त्यान­ ती घ्यावी; त्याप्रमाण­ झोळीही घ्यावी आणि ज्याच्याजवळ तरवार नाहीं त्यान­ आपल­ वस्त्र विकून ती विकत घ्यावी.
  
37. मी तुम्हांस सांगता­, ‘तो अपराध्यांत गणलेला होता,’ अस­ ज­ लिहिल­ आहे त­ माझ्या ठायीं पूर्ण झाल­ पाहिजे, कारण मजविशयींच्या गोश्टींचा शेवट आला आहे.
  
38. ते म्हणाले, प्रभुजी, पाहा. ह्या देान तरवारी आहेत. तो त्यांस म्हणाला, पुरे.
  
39. ह्यावर तो बाहेर येऊन आपल्या परिपाठाप्रमाण­ जैतूनांच्या डा­गराकडे गेला व त्याचे शिश्यहि त्याच्या माग­माग­ गेले.
  
40. त्या ठिकाणीं आल्यावर त्यान­ त्यांस म्हटल­, तुम्हीं परीक्ष­त पडूं नये म्हणून प्रार्थना करा.
  
41. मग त्यांजपासून सुमार­ धा­ड्याच्या टप्प्याइतका तो दूर झाला; आणि त्यान­ गुडघे टेकून अशी प्रार्थना केली:
  
42. हे बापा, तुझी इच्छा असली तर हा प्याला मजपासून दूर कर, तरी माझ्या इच्छेप्रमाण­ नको, तुझ्या इच्छेप्रमाण­ होऊं दे;
  
43. तेव्हां स्वगाहून एक देवदूत येऊन आपणाला बळ देतांना त्याच्या दृश्टीस पडला.
  
44. मग अत्यंत विव्हळ होऊन त्यान­ अधिक आग्रहान­ प्रार्थना केली, तेव्हां त्याचा घाम रक्ताचे मोठमोठे थ­ब भूमीवर पडावे असा पडत होता.
  
45. प्रार्थना करुन उठल्यावर तो शिश्यांजवळ आला ता­ ते खेदामुळ­ झोपीं गेले आहेत अस­ त्यास आढळल­.
  
46. तो त्यांस म्हणाला, झोप कां घेतां? तुम्हीं परीक्ष­त पडूं नये म्हणून उठून प्रार्थना करा.
  
47. तो बोलत आहे इतक्यांत पाहा, लोकसमुदाय आला, व यहूदा नांवाचा बारांतला एक जण त्यांच्यापुढ­ चालत होता; तो येशूच­ चुंबन घ्यावयास त्याच्याजवळ आला.
  
48. येशू त्याला म्हणाला, यहूद्या, चुंबन घेऊन मनुश्याच्या पुत्राला धरुन देतोस काय?
  
49. त्याच्यासभोवतीं जे होते ते आतां काय होणार ह­ ओळखून त्याला म्हणाले, प्रभूजी, आम्हीं तरवार चालवावी काय?
  
50. त्यांतील एकान­ प्रमुख याजकाच्या दासावर हात टाकून त्याचा उजवा कान कापून काढिला.
  
51. तेव्हां येशून­ म्हटल­, त्यांच एवढ­ होऊं द्या, आणि त्यान­ त्याच्या कानाला स्पर्श करुन त्याला बर­ केल­.
  
52. जे मुख्य याजक, मंदिराचे सरदार व वडील त्याच्यावर आले होते त्यांस येशू म्हणाला, जस­ लुटारुवर जाव­ तस­ तुम्ही तरवारी व सोटे घेऊन निघालां काय?
  
53. मी प्रतिदिवशीं मंदिरांत तुमच्याबरोबर असतांना तुम्ही मजवर हात टाकिला नाहीं, पण ही तुमची घटका आणि अंधाराची सत्ता आहे.
  
54. मग त्यांनी त्याला पकडून प्रमुख याजकाच्या घरीं नेल­; तेव्हां पेत्र दुरुन माग­माग­ चालूं लागला.
  
55. ते राजांगणाच्या मध्यभागीं विस्तव पेटवून एकत्र बसले होते, त्यांजमध्य­ पेत्र जाऊन बसला.
  
56. तेव्हां कोणाएका दासीन­ त्याला विस्तवाच्या अजेडांत बसलेल­ पाहून त्याजकडे टक लावून म्हटल­, हाहि त्याजबरोबर होता; पण तो नाकारुन बोलला,
  
57. बाई, मी त्याला ओळखत नाहीं.
  
58. कांहीं वेळान­ दुस-या एकान­ त्याला पाहून म्हटल­, तुहि त्यांतला आहेस; पेत्र म्हणाला, गृहस्था, मी तो नाहीं.
  
59. सुमार­ एक तास झाल्यावर आणखी एक जण खातरीन­ म्हणाला, खरोखर हाहि त्याजबरोबर होता; हा गालीलीच आहे.
  
60. पेत्र म्हणाला, गृहस्था, तूं काय बोलतोस त­ मला समजत नाहीं. अस­ तो बोलत आहे इतक्यांत का­बडा आरवला.
  
61. तेव्हां प्रभून­ वळून पेत्राकडे दृश्टि लाविली; आणि आज का­बडा आरवण्याअगोदर तूं तीन वेळा मला नाकारिशील, अस­ ज­ प्रभूनंे सांगितल­ होत­ त­ पेत्राला आठवल­.
  
62. मग तो बाहेर जाऊन फार रडला.
  
63. ज्या मनुश्यांनीं येशूला धरिल­ होत­ त्यांनीं त्याची थट्टा करुन त्याला मार दिला.
  
64. त्यांनीं त्याच­ डोळे बांधून त्याला विचारिल­, अंतर्ज्ञानान­ बोल; तुला कोणी मारिल­ ह­ सांग.
  
65. त्यांनी त्याची निंदा करुन त्याच्याविरुद्ध इतर पुश्कळ गोश्टी उच्चारिल्या.
  
66. मग दिवस उगवल्यावर लोकांच­ वडीलमंडळ, मुख्य याजक व शास्त्री एकत्र जमले; आणि ते त्याला आपल्या न्यायसभ­त नेऊन म्हणाले,
  
67. तूं खिस्त असलास तर आम्हांस सांग. त्यान­ त्यांस म्हटल­, मीं तुम्हांस सांगितल­ तरी तुम्ही विश्वास धरणार नाहीं;
  
68. आणि मीं विचारिल­ तरी तुम्ही उत्तर देणार नाहीं;
  
69. तरी एथून पुढ­ मनुश्याचा पुत्र सर्वसमर्थ देवाच्या उजवीकडे बसेल?
  
70. तेव्हां ते सर्व म्हणाले, तर तूं देवाचा पुत्र आहेस काय? तो म्हणाला, मी आह­ म्हणून तुम्ही म्हणतां.
  
71. तेव्हां ते म्हणाले, आपल्याला साक्षीची आणखी काय गरज? आपण स्वतः याच्याच ता­डच­ ऐकल­ आहे.