1. नंतर त्या सर्व मंडळीन उठून त्याला पिलाताकडे नेल;
2. आणि ते त्याजवर असा दोश ठेवूं लागले कीं हा आमच्या राश्ट्राला फितवितांना, कैसराला पट्टी देण मना करितांना, आणि मी स्वतः खिस्त राजा आह अस म्हणतांना आम्हांस आढळला.
3. तेव्हां पिलातान त्याला विचारिल कींं तूं यहूद्यांचा राजा आहेस काय? त्यान त्याला उत्तर दिल, तूं म्हणतोस.
4. तेव्हां मुख्य याजकांस व लोकसमुदायांस पिलातान म्हटल, मला या मनुश्याच्या ठायीं कांही दोश आढळत नाहीं.
5. तरी ते अधिकच आग्रह धरुन म्हणाले, हा गालीलापासून आरंभ करुन एथपर्यंत अवघ्या यहूदीयांत शिक्षण देऊन लोकांस चिथवितो.
6. तेव्हां पिलातान ह ऐकून हा मनुश्य गालीली आहे काय, अस विचारिल;
7. आणि तो हेरोदोच्या अमलांतला आहे अस समजल्यावर त्यान त्याला हेरोदाकडे पाठविल. तोहि त्या दिवसांत यरुशलेमांत होता.
8. येशूला पाहून हेरोदाला फार संतोश झाला; कारण त्याजविशयीं ऐकल्यावरुन त्याला भेटाव अशी ब-याच दिवसांपासून त्याची इच्छा होती, आणि त्याच्या हातून झालेल एकाद अöुत कृत्य दृश्टीस पडेल अशी त्याला अशी होती. त्यान त्याला बरेच प्रष्न केले;
9. परंतु त्यान त्याला कांही उत्तर दिल नाहीं.
10. तेव्हां मुख्य याजक व शास्त्री यांनी उभे राहून आवेशान त्याजवर दोश ठेविले;
11. आणि हेरोदान व त्याच्या शिपायांनीं त्याचा धिक्कार व उपहास करुन आणि त्याला झळझळीत वस्त्र लेववून पिलाताकडे परत पाठविल.
12. त्याच दिवशीं पिलात व हेरोद हे परस्पर मित्र झाले; त्यापूर्वी त्यांचे आपसांत वैर होत.
13. मग पिलातान मुख्य याजक, अधिकारी व लोक यांस एकत्र बोलावून म्हटल,
14. हा मनुश्य लोकांस फितविणारा म्हणून ह्याला तुम्हीं मजकडे आणिल. आणि पाहा, मी तुमच्यादेखतां याची चौकशी केल्यावर ज्या गोश्टींचा आरोप तुम्ही याजवर आणितां त्यांसंबंधीं या मनुश्याकडे कांही दोश मला आढळला नाहीं;
15. हेरोदालाहि नाहीं; कारण त्यान त्याला आपल्याकडे परत पाठविल; आणि पाहा, यान मरणदंडास योग्य अस कांही केल नाहीं.
16. यास्तव मी ह्याला फटके मारुन सोडून देता;
17. (आणखी त्या सणांत त्याला त्यांकरितां एका जणाला सोडाव लागत असे.)
18. परंतु सर्वानीं एकच आरोळी करुन म्हटल, याची वाट लावा, आणि आम्हांसाठी बरब्बाला सोडून द्या.
19. तो इसम नगरांत झालेला दंगा व खून यांमुळ बंदिंत टाकिलेला होता.
20. येशूला सोडाव ह्या इच्छेन पिलातान पुनः त्यांजबरोबर भाशण केल;
21. तरी त्यांनीं, याला वधस्तंभावर खिळा, वधस्तंभावर खिळा, अशी ओरड केली.
22. तो त्यांस तिस-यान म्हणाला, कां? त्यान काय वाईट केल आहे? त्याजकडे मरणास योग्य असा कांही दोश मला आढळला नाहीं; यास्तव मी याला फटके मारुन सोडून देता;
23. पण याला वधस्तंभाशीं खिळाव असा त्यांनीं मोठ्यान ओरडून आग्रह केला; आणि त्यांच्या ओरडण्याला यष आलें.
24. तेव्हां पिलातान त्यांच्या मागण्याप्रमाण व्हाव असा ठराव केला.
25. नंतर दंगा व खून यांमुळ बंदींत टाकिलेल्या ज्या एकाला त्यांनीं मागितल त्याला त्यानें सोडून दिल; आणि येशूला त्यांच्या मर्जीवर सोपून दिल.
26. पुढ ते त्याला घेऊन जात असतां शिमोन कुरेनेकर हा इसम रानांतून येत होता, त्याला त्यांनीं धरुन त्याजवर वधस्तंभ ठेविला आणि तो त्याला येशूच्या माग वाहण्यास लाविल.
27. तेव्हां त्याच्यामाग लोकांचा व त्याच्यासाठीं ऊर बडवून घेऊन शोक करीत असलेल्या अशा स्त्रियांचाहि मोठा समुदाय चालला होता;
28. येशू त्यांजकडे वळून म्हणाला, अहो यरुशलेमकर कन्यांनो, मजसाठीं रडूं नका, तर आपणांसाठीं व आपल्या मुलाबाळांसाठीं रडा.
29. कारण पाहा, असे दिवस येतील कीं ज्यांत वांझ, न प्रसवलेलीं उदर, व न पाजिलेले स्तन हीं धन्य आहेत अस म्हण्तील.
30. त्या समयीं ते ‘पर्वतांस म्हणूं लागतील, आम्हांवर पडा; व टेकड्यांस म्हणतील, आम्हांस झाका.’
31. ओल्या झाडाला अस करितात तर वाळलेल्याच काय होईल?
32. त्याच्याबरोबर दुस-या दोघां जणांस अपराधी म्हणून वध करण्यासाठीं नेल.
33. नंतर ते कंवटी म्हटलेल्या जागीं आले, तेव्हां तेथ त्यांनीं त्याला व त्या अपराध्यांस, एकाला त्याच्या उजवीकडे व एकाला डावीकडे, अस वधस्तंभावर खिळिल.
34. तेव्हां येशू म्हणाला, हे बापा, ह्यांना क्षमा कर; कारण हे काय करितात ह ह्यांस समजत नाहीं. ‘नंतर त्यांनीं चिठ्या टाकून त्याचीं वस्त्र वांटून घेतलीं.’
35. लोक ‘पाहत’ उभे होते; अधिकारीहि ‘उपहास करीत म्हणाले,’ त्यान दुस-यांस तारिल, जर तो देवाचा खिस्त, त्याचा निवडलेला असला तर त्यान स्वतःचा बचाव करावा.
36. शिपायांनींहि जवळ येऊन, त्याला आंब देऊन, त्याची अशी थट्टा केली कीं
37. तूं यहूद्यांचा राजा असलास तर स्वतःचा बचाव कर.
38. हा यहूद्यांचा राजा आहे, असा एक लेखहि त्याच्यावरतीं होता.
39. वधस्तंभावर खिळिलेल्या त्या अपराध्यांतील एकान त्याची निंदा करुन म्हटल, तूं खिस्त आहेस ना? तर स्वतःचा व आमचा बचाव कर;
40. परंतु दुस-यान त्याला धमकावून म्हटल, तुलाहि तोच दंड असतां तूं देवाला भीत नाहींंस काय?
41. आपला दंड तर यथान्याय आहे; कारण आपण आपल्या कर्मांच योग्य फळ भोगीत आहा; परंतु यान कांहीं अयोग्य केल नाहीं.
42. मग तो म्हणाला, हे येशू, तूं आपल्या राजाधिकारान येशील तेव्हां माझी आठवण कर.
43. तो त्याला म्हणाला, मी तुला खचीत सांगता, तूं आज मजबरोबर सुखलोकांत असशील.
44. इतक्यांत सुमार दोन प्रहर झाले, आणि सूर्यप्रकाश नाहींसा होऊन तिस-या प्रहारापर्यंत सर्व देशावर अंधार पडला;
45. आणि पवित्रस्थानांतील पडदा मधोमध फाटला.
46. तेव्हां येशू उच्च स्वरान ओरडून म्हणाला, हे बापा, ‘मी आपला आत्मा तुझ्या हातीं सोपून देता;’ अस बोलून त्यान प्राण सोडला;
47. तेव्हां झालेल पाहून जमादारान देवाच गौरव करुन म्हटल, खरोखर हा मनुश्य धार्मिक होता.
48. हा प्रकार पाहण्याकरितां जमलेले सर्व लोकसमुदाय झालेल्या गोश्टी पाहून ऊर बडवीत माघारे गेलें.
49. तेव्हां त्याच्या ‘ओळखीच’ सर्व जण व ज्या बायका त्याच्यामाग गालीलाहून आल्या होत्या त्या ह पाहत ‘दूर उभ्या राहिल्या होत्या.’
50. तेव्हां पाहा, यहूद्यांच्या अरिमथाई नगरांतला योसेफ नामक एक मनुश्य होता, तो मंत्री असून सज्जन व धार्मिक असा होता;
51. त्यान त्यांच्या विचाराला व कामाला संमति दिली नव्हती, व तो देवाच्या राज्याची वाट पाहत होता.
52. त्यान पिलाताकडे जाऊन येशूच शरीर मागितल;
53. त त्यान खालीं काढून तागाच्या वस्त्रान गंुडाळल व जिच्यांत तापर्यंत कोणाला ठेविल नव्हत अशा खडकांत खोदलेल्या कबरत त ठेविल.
54. तो तयारी करण्याचा दिवस असून शब्बाथ सुरु होणार होता.
55. ज्या बायका गालीलाहून त्याच्याबरोबर आल्या होत्या, त्यांनंी त्यांच्यामाग येऊन ती कबर पाहिली, व त्याच शरीर कस ठेविल हहि पाहिल.
56. मग त्यांनीं परत जाऊन सुगंधी द्रव्य व सुगंधी तेल तयार केलीं.