Home / Marathi / Marathi New Testament / Web / Mark

 

Mark, Chapter 15

  
1. मग पहाट होतांच वडील व शास्त्री यांजबरेाबर मुख्य याजक व सर्व न्यायसभा यांनीं मसलत करुन येशूला बांधून नेऊन पिलाताच्या स्वाधीन केल­.
  
2. तेव्हां पिलातान­ त्याला विचारिल­, तूं यहूद्यांचा राजा आहेस काय? त्यान­ त्याला उत्तर दिल­, तूं म्हणतोस तस­च.
  
3. मुख्य याजकांनीं त्याजवर पुश्कळ गोश्टींचा आरोप ठेविला.
  
4. पिलातान­ त्याला पुनः विचारिल­, तूं कांही उत्तर देत नाहींस काय? पाहा, ते किती गोश्टींचा आरेाप तुजवर ठेवितात.
  
5. तरी येशून­ आणखी कांहीं उत्तर दिल­ नाहीं; यावरुन पिलाताला आश्चर्य वाटल­.
  
6. सणाच्या दिवसांत ज्या एकाद्या बंदिवानांबद्दल लोक त्याजकडे मागणी करीत त्यास तो त्यांजकरितां सोडून देत असे.
  
7. तेव्हां बंडातील कित्येक खुनी बंडखोरांबरोबर बांधून ठेवलेला असा बरब्बा नांवाचा कोणीएक माणूस होता.
  
8. लोकसमुदाय पुढ­ येऊन, आम्हांकरितां आपण आपल्या रिवाजाप्रमाण­ कराव­, अस­ त्याजजवळ मागूं लागले.
  
9. पिलातान­ त्यांस उत्तर दिल­, मीं तुम्हांकरितां यहूद्यांच्या राजाला सोडाव­ अशी तुमची इच्छा आहे काय?
  
10. कारण मुख्य याजकांनीं त्याला हेव्यान­ धरुन दिल­ होत­ ह­ त्याला समजल­ होत­;
  
11. परंतु त्यापेक्षां आम्हांकरितां बरब्बाला सोडाव­ अस­ मागावयास मुख्य याजकांनीं लोकसमुदायास चेतवल­.
  
12. तेव्हां पिलातान­ त्यांस पुनः म्हटल­, तर मग ज्याला तुम्ही यहूद्यांचा राजा म्हणतां त्याच­ मीं काय कराव­?
  
13. त्याला वधस्तंभावर खिळा, अशी त्यांनीं पुनः आरोळी केली.
  
14. पिलातान­ त्यांस म्हटल­ कीं, त्यान­ काय वाईट केल­ आहे? तरी ते फार आरडाओरड करुन म्हणाले, त्याला वधस्तंभावर खिळा.
  
15. तेव्हां लोकसमुदायाला खुश कराव­ या हेतून­ पिलातान­ बरब्बाला त्यांजकरितां सोडिल­, आणि येशूला फटके मारुन वधस्तंभावर खिळण्याकरितां त्यांच्या स्वाधीन केल­.
  
16. मग शिपायांनीं त्याला प्रयतोर्यमांत म्हणजे कचेरींत नेल­ व त्यांनीं सगळ­ पलटण एकत्र बोलाविल­.
  
17. नंतर त्यांनी त्याच्या अंगावर जांबळ­ वस्त्र चढविल­, कांट्यांचा मुकूट गुंफून त्याला घातला;
  
18. आणि ते मुजरा करुन त्याला म्हणूं लागले, हे यहूद्यांच्या राजा, तुझा जयजयकार असो;
  
19. त्यांनीं त्याच्या मस्तकावर वेतान­ मारिल­; ते त्याजवर थुंकल­ आणि गुडघे टेकून त्यांनी त्याला नमन केल­.
  
20. अशी त्याची थट्टा केल्यावर त्यांनीं जांबळ­ वस्त्र त्याच्या अंगावरुन काढून त्याची वस्त्र­ त्याला घातली; आणि वधस्तंभावर खिळण्याकरितां ते त्याला बाहेर घेऊन गेले.
  
21. तेव्हां शिमोन नांवाचा कोणीएक कुरेनेकर रानांतून येऊन जवळून जात असतां त्याला त्यांनीं त्याचा वधस्तंभ वाहण्याकरितां वेठीस धरिल­; तो अलेक्षांद्र व रुफ यांचा बाप होता.
  
22. मग त्यांनीं त्याला गुलगुथा म्हणजे कवटीची जागा येथ­ आणिल­,
  
23. आणि त्याला बोळ मिसळलेला द्राक्षारस प्यावयास दिला, परंतु त्यान­ तो घेतला नाहीं.
  
24. तेव्हां त्यांनीं त्याला वधस्तंभावर खिळिल­, आणि कोणीं कोणत­ घ्याव­ म्हणून ‘त्याच्या वस्त्रांवर चिठ्या टाकून तीं वांटून घेतलीं’
  
25. त्यांनीं त्याला वधस्तंभावर खिळिल­ तेव्हां पहिल्या प्रहाराचा शेवट होता.
  
26. त्याच्या दोशारोपाचा लेख यहूद्यांचा राजा असा वर लाविला होता.
  
27. त्यांनी त्याच्याबरोबर दोन लुटारु, एक उजवीकडे व एक डावीकडे असे वधस्तंभावर खिळिले;
  
28. आणि अपराध्यांत तो गणलेला होता, हा शास्त्रलेख पूर्ण झाला.
  
29. मग जवळून जाणा-यांनीं ‘डोकीं डोलवीत’ त्याची अशी निंदा केली कीं अरे, मंदिर मोडून तीन दिवसांत बांधणा-या,
  
30. आपला बचाव कर, वधस्तंभावरुन खाली य­.
  
31. तस­च मुख्य याजकहि शास्न्न्यांसह आपसांत थट्टा करीत बोलले, त्यान­ दुस-यांच­ तारण केल­, त्याला स्वतःचा बचाव करतां येत नाहीं;
  
32. इस्त्राएलाचा राजा खिस्त यान­ आतां वधस्तंभावरुन खालीं याव­ म्हणजे ते­ पाहून आम्हीं विश्वास धरुं. त्याच्याबरोबर वधस्तंभावर खिळिलेल्या लोकांनींहि त्याची निंदा केली.
  
33. दोन प्रहरापासून तिस-या प्रहरापर्यंत सर्व देशावर अंधार पडला.
  
34. तिस-या प्रहराच्या शेवटीं येशू मोठ्यान­ आरोळी मारुन बोलला, ‘एलोई, एलोई, लमा सबक्तनी?’ म्हणजे ‘माझ्या देवा, माझ्या देवा, तूं माझा त्याग कां केला?’
  
35. तेव्हां जवळ उभे राहणा-यांपैकीं कित्येकांनीं ह­ ऐकून म्हटल­, पाहा, तो एलीयाला बोलावितो;
  
36. आणि एकान­ धावत जाऊन स्पंज ‘आंबेन­’ भरिला आणि तो वेतावर ठेवून त्याला ‘प्यावयास देऊन’ म्हटल­, असूं द्या; एलीया याला खाली उतरावयास येतो किंवा नाहीं ह­ पाहूं.
  
37. मग येशून­ मोठी आरोळी मारुन प्राण सोडिला.
  
38. तेव्हां पवित्रस्थानांतील पडदा वरपासून खालपर्यंत फाटून दुभागला.
  
39. मग त्यान­ अशा प्रकार­ प्राण सोडिला ह­, त्याच्यासमोर जवळच उभे राहिलेल्या जमादारान­ पाहून म्हटल­, खरोखर हा पुरुश देवाचा पुत्र होता.
  
40. कांही स्त्रियाहि दुरुन पाहत होत्या, त्यांत मग्दालिया मरीया, धाकटा याकोब व योसे यांची आई मरीया, व सलोमे ह्या होत्या;
  
41. तो गालीलांत असतांना त्याच्यामाग­ चालून त्याची सेवा ह्या करीत असत; शिवाय त्याच्याबरोबर यरुशलेमास आलेल्या दुस-या पुश्कळ स्त्रिया होत्या.
  
42. ह्या सुमारास संध्याकाळ झाली, आणि हा तयारीचा दिवस म्हणजे शब्बाथाच्या पूर्वीचा दिवस होता;
  
43. म्हणून अरिमथाईकर योसेफान­ धैर्य करुन पिलाताकडे आंत जाऊन येशूच­ शरीर मागितल­; हा एक प्र्रतिश्ठित मंत्री असून स्वतः देवाच्या राज्याची प्रतीक्षा करीत होता.
  
44. तेव्हां तो इतक्यांत कसा मेला ह्याच­ पिलाताला नवल वाटल­; आणि त्यानें जमादाराला बोलावून त्याला विचारिल­, याला मरुन कांहीं वेळ झाला काय?
  
45. जमादाराकडून त­ कळल्यावर त्यान­ योसेफाला प्रेत दिल­.
  
46. त्यान­ तागाच­ वस्त्र विकत आणिल­ व त्याला खालीं काढून त्या तागाच्या वस्त्रान­ गंुडाळिल­; मग त्याला खडकांत खेदिलेल्या कबर­त ठेविल­, व कबरेच्या ता­डावर धा­ड लोटून लाविली.
  
47. त्याला कोठ­ ठेविल­ होत­ ह­ मग्दालीया मरीया व योसेची आई मरीया यांनीं पाहिल­.