Home / Marathi / Marathi New Testament / Web / Mark

 

Mark, Chapter 2

  
1. कांही दिवसांनीं तो पुनः कफर्णहूमांत आला आणि तो घरीं आहे अस­ लोकांच्या ऐकण्यांत आल­.
  
2. तेव्हां इतके लोक जमले कीं दाराच्या आजूबाजूला देखील त्यांस जागा होईना; मग त्यान­ त्यांस संदेश दिला.
  
3. मग त्याजकडे एका पक्षघाती मनुश्याला लोेक घेऊन आले, त्यास चौघांनीं उचलून आणिल­.
  
4. त्यांना दाटीमुळ­ त्याच्याजवळ जाववेना, म्हणून त्यांनीं तो जेथ­ होता तेथल­ छप्पर उस्तरुन काढिल­ आणि वाट करुन तींतून ज्या बाजेवर पक्षघाती निजला होता ती त्यांनीं खाली सोडिली.
  
5. येशून­ त्यांचा विश्वास पाहून पक्षघाती मनुश्याला म्हटल­, मुला, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे.
  
6. तेव्हां कित्येक शास्त्री तेथ­ बसले होते ते आपल्या मनांत असा विचार करीत होते कींं
  
7. हा या प्रकार­ कां बोलतो? हा दुर्भाशण करितो; एकावांचून म्हणजे देवावांचून, कोणाच्यान­ पापांची क्षमा करवते?
  
8. ते आपणांत असा विचार करीत आहेत ह­ येशून­ आपल्या आत्म्यांत तत्काळ ओळखून त्यांस म्हटल­, तुम्ही आपल्या मनांत हे विचार कां करितां?
  
9. तुझ्या पापांचीं क्षमा झाली आहे, अस­ पक्षघाती मनुश्याला म्हणण­, किंवा आपली बाज उचलून चाल, अस­ म्हणण­, यांतून कोणत­ सोप­?
  
10. मनुश्याच्या पुत्राला पृथ्वीवर पापांची क्षमा करावयास अधिकार आहे ह­ तुम्हांस समजाव­ (म्हणून-तो पक्षघाती मनुश्याला म्हणतो)
  
11. मी तुला सांगता­, ऊठ, आपली बाज उचलून घेऊन घरीं जा.
  
12. मग तो उठला व लागलाच आपली बाज उचलून सर्वांच्या देखतां निघाला; यावरुन सर्व थक्क झाले व देवाच­ गौरव करीत म्हणाले, आम्ही अस­ कधीं पाहिल­ नव्हत­.
  
13. पुनः तो निघून समद्रतीरीं गेला, आणि सर्व लोकसमुदाय त्याच्याजवळ आला तेव्हां त्यान­ त्यांस शिक्षण दिल­.
  
14. नंतर जात असतांना त्यान­ अल्फीचा पुत्र लेवी याला जकातीच्या नाक्यावर बसलेल­ पाहिल­, व त्याला म्हटल­, माझ्यामाग­ ये; तेव्हां तो उठून त्याच्यामाग­ गेला.
  
15. नंतर अस­ झाल­ कीं तो त्याच्या घरीं जेवावयास बसला, आणि बहुत जकातदार व पापी लोक हे येशू व त्याचे शिश्य यांच्या पंक्तीस जेवावयास बसले; कारण तेथ­ ते पुश्कळ असून त्याचे अनुयायी होते.
  
16. तेव्हां परुश्यांतील शास्त्री यांनीं त्याला जकातदार व पापी लोक यांच्याबरोबर जेवितांना पाहून त्याच्या शिश्यांस म्हटल­, हा जकातदार व पापी लोक यांच्या बरोबर कां जेवितो?
  
17. हे ऐकून येशू म्हणाला, निरोग्यांस वैद्याची गरज नाहीं, रोग्यांस आहे; मी धार्मिक जनांस नाहीं, तर पापी जनांस बोलावयास आला­ आह­.
  
18. तेव्हां योहानाच­ शिश्य व परुशी उपास करीत होते; ते येऊन त्यास म्हणाले, योहानाचंे शिश्य व परुश्यांचे शिश्य उपास करितात आणि आपले शिश्य उपास कां करीत नाहींत?
  
19. येशून­ त्यांस म्हटल­, व-हाड्यांबरोबर वर आहे ता­पर्यंत त्यांना उपास करितां येईल काय? जा­पर्यंत वर त्यांच्याबरोबर आहे ता­पर्यंत त्यांना उपास करितां येत नाहीं.
  
20. तरी असे दिवस येतील कीं वर त्यांजपासून घेतला जाईल, तेव्हां ते त्या दिवशीं उपास करितील.
  
21. कोणी को-या कापडाचा तुकडा जुन्या वस्त्राला लावीत नाहीं; लाविला तर धड करण्याकरितां लावलेला तुकडा त्याला म्हणजे जुन्याला फाडितो, आणि भोक मोठ­ होत­.
  
22. कोणी नवा द्राक्षारस जुन्या बुधल्यांत घालीत नाहीं; घातला तर नव्या द्राक्षारसान­ बुधले फुटतात, द्राक्षारस सांडतो, व बुधलेहि नासतात; म्हणून नवा द्राक्षारस नव्या बुधल्यांत घालतात.
  
23. मग अस­ झाल­ कीं तो शब्बाथ दिवशीं शेतांमधून जात असतां त्याचे शिश्य वाटेन­ चालतांना कणस­ मोडूं लागले.
  
24. तेव्हां परुशी त्याला म्हणाले, पाहा, शब्बाथ दिवशीं ज­ करुं नये त­ ह­ कां करितात?
  
25. त्यान­ त्यांस म्हटल­, दाविदाला गरज पडली, म्हणजे त्याला व त्याच्याबरोबर जे होते त्यांस भूक लागली, तेव्हां त्यान­ काय केल­;
  
26. अब्याथार प्रमुख याजक असतां तो देवाच्या मंदिरांत कसा गेला व ज्या ‘समर्पित भाकरी’ याजकांशिवाय कोणींहि खाऊं नयेत त्या त्यान­ कशा खाल्ल्या, व त्याजबरेाबर जे होते त्यांस खावयास कशा दिल्या; ह­ तुमच्या वाचण्यांत कधीं आल­ नाहीं काय?
  
27. आणखी तो त्यांस म्हणाला, शब्बाथ मनुश्यासाठीं झाला, मनुश्य शब्बाथासाठीं झाला नाहीं;
  
28. यास्तव मनुश्याचा पुत्र शब्बाथाचाहि धनी आहे.