Home / Marathi / Marathi New Testament / Web / Mark

 

Mark, Chapter 3

  
1. पुनः तो सभास्थानांत गेला; तेथ­ लुल्या हाताचा एक मनुश्य होता;
  
2. आणि त्याजवर दोश ठेवावा म्हणून शब्बाथ दिवशीं तो त्याला बर­ करील कीं काय, ह­ पाहावयास ते टपून राहिले.
  
3. त्यान­ लुल्या हाताच्या मनुश्यास सांगितल­ कीं मध्ये उभा राहा.
  
4. मग त्यान­ त्यांस म्हटल­, शब्बाथ दिवशीं बर­ करण­ किंवा वाईट करण­, जीव वांचविण­ किंवा मारण­, यांतून कोणत­ उचित आहे? पण ते उगेच राहिले.
  
5. मग त्यान­ त्यांच्या मनाच्या कठीणपणामुळ­ खिन्न होऊन त्या सर्वांकडे रागान­ पाहिल­ व त्या मनुश्याला सांगितल­, आपला हात लांब कर; त्यान­ हात लांब केला आणि तो बरा झाला.
  
6. मग परुश्यांनीं बाहेर जाऊन त्याचा घात कसा करावा याविशयीं हेरोदीयांबरोबर त्याजविरुद्ध ताबडतोब मसलत केली.
  
7. येशू आपल्या शिश्यांसह निघून समुद्राकडे गेला; तेव्हां गालीलांतून मोठा मेळा माग­ चालला;
  
8. आणि यहूदीया, यरुशलेम, इद्रोन व यार्देनेच्या पलीकडचा प्रांत, आणि सोर व सिदोन यांच्या आसमंतांतला प्रदेश, यांतून मोठा मेळा तो जीं जीं मोठीं कृत्य­ करीत होता त्यांविशयीं ऐकून त्याजकडे आला.
  
9. तेव्हां दाटीमुळ­ च­गरु नये म्हणून त्यान­ आपल्या शिश्यांस एक होडी तयार ठेवण्यास सांगितल­;
  
10. कारण त्यान­ बहुत जणांस बर­ केल­, म्हणून जे सर्व पीडलेले होते ते त्याला स्पर्श करावयास त्याच्या अंगावर पडूं लागले.
  
11. जेव्हां जेव्हां अशुद्ध आत्मे त्याला पाहत तेव्हां तेव्हां ते त्याच्या पायां पडून ओरडून बोलत कीं तूं देवाचा पुत्र आहेस.
  
12. तेव्हां मला प्रगट करुं नका अस­ त्यान­ त्यांस पुश्कळ निक्षून सांगितल­.
  
13. मग डा­गरावर चढल्यावर त्याच्या मनाला वाटले त्यांस त्यान­ बोलाविल­; व ते त्याजकडे आले.
  
14. तेव्हां त्यान­ बारा जणांस नेमिल­; अशासाठीं कीं त्यांनीं आपणाबरोबर असाव­; आपण त्यांस उपदेश करावयास पाठवाव­;
  
15. आणि रोग बरे करण्याचा व भूत­ काढण्याचा अधिकार त्यांस असावा.
  
16. त्यान­ शिमोन याला पेत्र ह­ उपनांव दिल­;
  
17. जब्दीचा पुत्र याकोब व याकोबाचा भाऊ योहान यांस बेनेरेगेश म्हणजे गर्जनेचे पुत्र ह­ उपनांव दिल­;
  
18. अंद्रिया, फिलिप्प, बर्थलमय, मत्तय, थोमा, अल्फीचा पुत्र याकोब, तद्दय, शिमोन कनानी,
  
19. व त्याला (येशूला) धरुन देणारा यहूदा इस्कर्योत अशीं त्यांची नांव­ होतीं. नंतर तो एका घरांत आलां.
  
20. तेव्हां पुनः लोक इतके जमले कीं त्यांस भाकर खावयासहि सवड मिळेना.
  
21. त्याचे आप्त ह­ ऐकून त्याला धरावयास निघाले; कारण तो शुद्धीवर नाही अस­ ते म्हणत होते.
  
22. तस­च यरुशलेमाहून जे शास्त्री खालीं आले होते ते म्हणत होते कीं त्याला बालजबूल लागला आहे व तो भूतांच्या अधिका-याच्या साहाय् यान­ भूत­ काढितो.
  
23. तेव्हां तो त्यांस आपणाजवळ बोलावून दाखले देऊन बोलूं लागला कीं सैतान सैतानाला कसा काढील?
  
24. आपसांत फूट पडलेल­ राज्य टिकत नाहीं.
  
25. तस­च आपसांत फूट पडलेल­ घर टिकत नाहीं.
  
26. सैतान स्वतःवरच उठतो व त्यामध्य­ फूट पडते तर तो टिकत नाहीं, त्याचा शेवट होतो.
  
27. बळवान् मनुश्याला बांधल्याशिवाय त्याच्या घरांत शिरुन त्याच­ जिन्नस कोणाच्यान­ लुटवत नाहींत; बांधल्यावर तो त्याच­ घर लुटील.
  
28. मी तुम्हांस खचीत सांगता­ कीं मनुश्यांच्या पुत्रांना सर्व पाप­ व जीं जीं दुर्भाशण­ ते करतील, त्या सर्वांची क्षमा होईल;
  
29. परंतु जो काणी पवित्र आत्म्याविरुद्ध दुर्भाशण करील त्याला क्षमा कधींहि होत नाहीं, तर तो सर्वकाल राहणा-या पापाचा दोशी आहे.
  
30. त्याला अशुद्ध आत्मा लागला आहे, अस­ ते म्हणत होते म्हणून तो अस­ बोलला.
  
31. तेव्हां त्याची आई व त्याचे भाऊ आले, अािण त्यांनीं बाहेर उभ­ राहून निरोप पाठवून त्याला बोलाविल­
  
32. त्याच्यासभोवतीं पुश्कळ लोक बसले होते; त्यांनीं त्याला म्हटल­, पाहा, आपली आई व आपले भाऊ बाहेर आपला शोध करीत आहेत.
  
33. त्यान­ त्यांस उत्तर दिल­, माझीं आई कोण व माझ­ भाऊ कोण?
  
34. मग जे त्याच्याभोवती बसले होते त्यांजकडे तो पाहून म्हणाला, माझी आई व माझे भाऊ पाहा!
  
35. जो काणी देवाच्या इच्छेप्रमाण­ वर्ततो तोच माझा भाऊ, बहीण व आई.