Home / Marathi / Marathi New Testament / Web / Mark

 

Mark, Chapter 5

  
1. मग ते सरोवराच्या पलीकडे गरसेकरांच्या देशांत आले;
  
2. आणि तो मचव्यांतून उतरतांच अशुद्ध आत्मा लागलेला असा एक मनुश्य कबरांतून निघून त्याला भेटला.
  
3. तो कबरांत राहत असे व त्याला सांखळîांनीं देखील आतां कोणाच्यान­ बांधून आवरवेना.
  
4. कारण त्याला पुश्कळ वेळां बेड्यांनीं व साखळîांनीं बांधिल­ असतांहि त्यान­ सांखळîा तोडून टाकिल्या, व बेड्यांचा चुराडा केला, म्हणून कोणाच्यान­ त्याला वश करवेना.
  
5. तो नेहमीं, रात्रंदिवस, कबरांमध्य­ व डा­गरामध्य­ राहून ओरडत असे व धा­ड्यांनीं आपल­ अंग ठेचून घेत अस­.
  
6. तो येशूला दुरुन पाहून धावून आला व त्याच्या पायां पडला;
  
7. आणि मोठ्यान­ ओरडून बोलला, हे येशू, परात्पर देवाच्या पुत्रा, तुझा माझा काय संबंध? मला पीडिशील तर तुला देवाची शपथ.
  
8. कारण त्यान­ त्याला म्हटल­ होत­, अरे अशुद्ध आत्म्या, या मनुश्यांतून नीघ.
  
9. त्यान­ त्याला विचारिल­, तुझ­ नांव काय? त्यान­ उत्तर दिल­, माझ­ नांव सैन्य; कारण आम्ही पुश्कळ आहा­;
  
10. आणि आम्हांस या देशांतून घालवूं नको, अशी त्यान­ त्याला फार विनवणी केली.
  
11. तेथ­ डा­गराकड­ डुकरांचा मोठा कळप चरत होता.
  
12. तेव्हां भूतांनी त्याला विनंति केली कीं आम्ही त्या डुकरांमध्य­ शिराव­ म्हणून त्यांजकडे आम्हांस लावून दे.
  
13. मग त्यान­ त्यांस परवानगी दिली; मग ते अशुद्ध आत्मे निघून त्या डुकरांत शिरले, आणि तो कळप धडक धावत जाऊन कड्यावरुन सरोवरांत पडला व तीं सरोवरांत गुदमरुन मेलीं; तीं सुमार­ दोन हजार होती.
  
14. मग डुकर­ चारणा-यांनीं पळत जाऊन नगरांत व शेतांमळîांत ह­ वर्तमान सांगितल­, तेव्हां काय झाल­ त­ पाहावयास लोक आले.
  
15. ते येशूजवळ आल्यावर त्यांनीं भूतग्रस्ताला, म्हणजे ज्यांत सैन्य होत­ त्याला, वस्त्र पांघरलेल­ व शुद्धीवर आलेल­ असे पाहिल­; आणि त्यांस भीति वाटली.
  
16. ह­ ज्यांनी पाहिल­ होत­ त्यांनीं भूतग्रस्ताविशयींची व डुकरांविशयींची हकीकत त्यांस सांगितली.
  
17. तेव्हां तुम्ही आमच्या प्रांतांतून निघून जा अशी ते त्याची विनवणी करुं लागले.
  
18. मग तो तारवांत बसतांच, जो अगोदर भूतग्रस्त होता त्यान­ मला आपल्याजवळ राहूं द्याव­ अशी त्याला विनंति केली;
  
19. परंतु त्यान­ त्याला येऊं दिल­ नाहीं, तर त्याला म्हटल­, तूं आपल्या घरीं स्वकीयांकडे जा, व प्रभून­ तुजवर दया करुन तुजसाठीं केवढीं मोठी कार्ये केलीं ह­ त्यांस सांग.
  
20. तेव्हां तो निघाला, आणि जीं मोठीं कार्ये येशून­ त्याजसाठीं केलीं होतीं ती दकापलीस येथ­ प्रसिद्ध करुं लागला; तेव्हां सर्वांस आश्चर्य वाटल­.
  
21. मग येशू मचव्यांत बसून पलीकडे परत गेल्यावर त्याजवळ लोकांचा मोठा समुदाय जमला; तेव्हां तो सरोवराजवळ होता.
  
22. मग याईर नाम­ एक सभास्थानाचा अधिकारी आला व त्याला पाहून त्याच्या पायां पडला.
  
23. त्यान­ त्याला फार विनवणी केली कीं माझी लहान कन्या मरावयास टेकली आहे; ती बरी होऊन वांचावी म्हणून येऊन तिजवर हात ठेवावे.
  
24. मग तो त्याच्याबरोबर गेला; तेव्हां लोकांचा मोठा समुदाय त्याच्यामागून चालला व त्यांनीं त्याच्याभोवती गर्दी केली.
  
25. तेव्हां बारा वर्शे रक्तस्त्राव होत असलेली एक स्त्री होती;
  
26. तिन­ बहुत वैद्यांच्या हातून पुश्कळ दुःख सोसून आपल्याजवळ होत­ नव्हत­ त­ सर्व खर्चिल­ होत­; तरी बरी न होतां तिचा रोग अधिक झाला होता;
  
27. ती येशूविशयींच्या गोश्टी ऐकून त्या गर्दीत शिरली, आणि त्याच्यामाग­ येऊन त्याच्या वस्त्राला शिवली.
  
28. तिन­ म्हटल­, मी केवळ त्याच्या वस्त्राला शिवल­ तरी बरी होईन.
  
29. तेव्हां लागलाच तिचा रक्ताचा झरा सुकून गेला व आपण त्या पीडेपासून बर­ झाला­ आहा­ असा तिला शरीरांत अनुभव आला;
  
30. येशून­ आपणांतील शक्ति निघालीं ह­ तत्क्षणीं आपल्या ठायीं ओळखून गर्दीमध्य­ वळून म्हटल­, माझ्या वस्त्रांस कोणीं स्पर्श केला?
  
31. त्याच­ शिश्य त्याला म्हणाले, लोकसमुदाय आपल्याभोवतीं गर्दी करीत आहे ह­ आपण पाहतां, आणि मला कोणी स्पर्श केला ह­ कस­ म्हणतां?
  
32. मग जिन­ ह­ केल­ तिला पाहावयास त्यान­ सभा­वार नजर फेकली.
  
33. तेव्हां ती स्त्री आपणांकरितां ज­ कांही करण्यांत आल­ होत­ त­ लक्षांत आणून भीत व कांपत कांपत त्याजकडे आली, व त्याच्या पायां पडून तिन­ त्याला सर्व वृत्तांत खरा खरा सांगितला.
  
34. त्यान­ तिला म्हटल­, मुली, तुझ्या विश्वासान­ तुला बर­ केल­ आहे; सुखरुप जा, आणि आपल्या पीडेपासून मुक्त ऐस.
  
35. तो ह­ बोलत आहे इतक्यांत सभास्थानाच्या अधिका-याच्या येथून कोणी येऊन त्याला सांगितल­ कीं तुमची कन्या मरण पावली, गुरुजीला आणखी श्रम कशाला देतां?
  
36. परंतु येशू, सांगितलेल्या वर्तमानाकडे लक्ष न देतां, सभास्थानाच्या अधिका-याला म्हणाला, भिऊं नको, विश्वास मात्र धर.
  
37. त्यान­ आपणाबरोबर पेत्र, याकोब व याकोबाचा भाऊ योहान यांच्याशिवाय कोणाला येऊं दिल­ नाहीं.
  
38. मग ते सभास्थानाच्या अधिका-याच्या घरीं आल्यावर अतिशय रडणारे व आकांत करणारे यांचा गलबला चाललेला त्यान­ पाहिला.
  
39. तो आंत जाऊन त्यांस म्हणाला, तुम्ही कशाला गलबला करितां व रडतां? मूल मेल­ नाहीं, झोप­त आहे.
  
40. तेव्हां त्यांनीं त्याचा उपहास केला; पण त्या सर्वांस बाहेर घालवून मुलाचा बाप व आई आणि आपल्याबरोबरचे इसम यांस घेऊन मूल होत­ तेथ­ तो आंत गेला.
  
41. नंतर बालिकेचा हात धरुन तो म्हणाला, तलीथा कूम्; याचा अर्थ, मुली, मी तुला सांगता­, ऊठ.
  
42. आणि लागलीच ती मुलगी उठून चालूं लागली. ती बारा वर्शाची होती. तेव्हां ते लागलेच अत्यंत विस्मित झाले.
  
43. ह­ कोणाला कळूं नये म्हणून जपा; अशी त्यान­ त्यांस निक्षून आज्ञा केली, अािण तिला कांहीं खावयाला द्याावयास सांगितल­.