Home / Marathi / Marathi New Testament / Web / Mark

 

Mark, Chapter 8

  
1. त्या काळीं पुनः लोकसमुदाय फार मोठा जमला होता, व त्यांच्याजवळ खावयास कांहीं नव्हत­, म्हणून त्यान­ आपल्या शिश्यांस बोलावून त्यांस म्हटल­,
  
2. मला लोकसमुदायाचा कळवळा येतो, कारण आज तीन दिवस ते माझ्याजवळ राहिले आहेत, व त्यांच्याजवळ खावयाला कांहीं नाहीं;
  
3. आणि मी त्यांस उपाशीं घरीं लावून दिल­ तर ते वाट­त कासावीस होतील; त्यांतील कित्येक तर लांबून आलेले आहेत.
  
4. त्याच्या शिश्यांनीं त्याला उत्तर दिल­ कीं येथ­ रानांत यांच्यासाठीं भाकरी कोठून आणाव्या व ह्यांना कोणी तृप्त कराव­?
  
5. त्यान­ त्यांस विचारिल­, तुम्हांजवळ किती भाकरी आहेत? ते म्हणाले, सात.
  
6. नंतर त्यान­ लोकसमुदायाला भूमीवर बसावयास सांगितल­; त्या सात भाकरी घेऊन ईशोपकारस्मरण करुन त्यान­ त्या मोडिल्या आणि त्यांस वाढण्याकरितां त्या आपल्या शिश्यांजवळ दिल्या; मग त्यांनीं लोकसमुदायाला वाढिल्या.
  
7. त्यांजवळ थोडे लहान मासे होते; त्यांस त्यान­ आशीर्वाद देऊन तेहि त्यांना वाढावयास सांगितल­.
  
8. ते जेवून तृप्त झाल्यावर जे तुकडे उरले होते त्यांच्या त्यांनीं सात पाट्या उचलून नेल्या.
  
9. तेथ­ सुमार­ चार हजार लोक होते; मग त्यान­ त्यांस निरोप दिला.
  
10. नंतर तो लागलाच आपल्या शिश्यांसुद्धा मचव्यांत बसून दल्मनुथा प्रांतांत आला.
  
11. मग परुशी येऊन त्याजबरोबर विवाद करुं लागले, आणि त्याची परीक्षा पाहण्याकरितां त्यांनी त्याच्याजवळ आकाशांतून चिन्ह मागितल­.
  
12. तेव्हां तो आपल्या आत्म्यांत फार कण्हून म्हणाला, ही पिढी चिन्ह कां मागते? मी तुम्हांस खचीत सांगता­ कीं या पिढीला चिन्ह दिल­ जाणारच नाहीं.
  
13. नंतर तो त्यांस सोडून पुनः मचव्यांत बसून पलीकडे गेला.
  
14. ते भाकरी घ्यावयास विसरले; आणि मचव्यांत त्यांच्याजवळ केवळ एकच भाकरी होती.
  
15. मग त्यान­ त्यांस निक्षून सांगितल­ कीं संभाळा, परुश्यांच­ खमीर व हेरोदाच­ खमीर यांविशयीं जपा.
  
16. तेव्हां आपल्याजवळ भाकरी नाहींत ह्याविशयीं ते आपसांत विचार करुं लागले.
  
17. ह­ ओळखून येशू त्यांस म्हणाला, तुम्हांजवळ भाकरी नाहींत ह्याविशयीं विचार कां करितां? तुम्ही अजून ओळखत नाहीं व समजतहि नाहीं काय? तुमच­ अंतःकरण कठीण झाल­ आहे काय?
  
18. ‘डोळे असून तुम्ही पाहत नाहीं काय? कान असून तुम्ही ऐकत नाहीं काय?’ तुम्हांस आठवण नाहीं काय?
  
19. मीं पांच हजांरासाठीं त्या पांच भाकरी मोडल्या, तेव्हां तुम्ही तुकड्यांच्या कितीं टोपल्या भरुन नेल्या? ते त्याला म्हणाले, बारा.
  
20. तस­च चार हजारांसाठी सात भाकरी मोडल्या तेव्हां तुम्हीं तुकडे किती पाट्या उचलून नेले? ते त्याला म्हणाले, सात.
  
21. नंतर तो त्यांस म्हणाला, तुम्ही अजून समजत नाहीं काय?
  
22. मग ते बेथ्सैदा येथ­ आले. तेव्हां लोकांनीं त्याजकडे एका अंधळîाला आणिल­, व आपण त्याला स्पर्श करावा अशी त्याच्याजवळ विनंति केली.
  
23. तेव्हां त्यान­ त्या अंधळîाचा हात धरुन त्याला गांवाबाहेर नेल­, आणि त्याच्या डोळîांत थंुकून व त्याजवर हात ठेवून त्याला विचारिल­, तुला कांहीं दिसत­ काय?
  
24. तो वर पाहून म्हणाला, मला माणस­ दिसत आहेत अस­ वाटत­, कारण तीं मला झाडासारखीं दिसत आहेत, तरी चालत आहेत.
  
25. नंतर त्यान­ त्याच्या डोळîांवर पुनः हात ठेविले; तेव्हां तो निरखून पाहूं लागला, आणि तो नीट झाला व सर्व वस्तु त्याला स्पश्ट दिसूं लागल्या.
  
26. मग त्यान­ त्याला त्याच्या घरीं पाठवितांना सांगितल­ कीं या गांवांत जाऊं देखील नको.
  
27. नंतर येशू व त्याचे शिश्य फिलिप्पाच्या कैसरियाकडल्या गांवांस गेले; तेव्हां वाट­त त्यान­ आपल्या शिश्यांस विचारिल­, लोक मला कोण म्हणून म्हणतात?
  
28. त्यांनीं उत्तर दिल­ कीं बाप्तिस्मा करणारा योहान; कित्येक एलीया; कित्येक तर संदेश्ट्यांपैकीं एक अस­ म्हणतात.
  
29. त्यान­ त्यांस विचारिल­, पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणतां? पेत्रान­ त्याला उत्तर दिल­, आपण खिस्त आहां.
  
30. तेव्हां मजविशयीं कोणाला सांगूं नका अस­ त्यान­ त्यांस निक्षून सांगितल­.
  
31. मग तो त्यांस शिकवू लागला कीं मनुश्याच्या पुत्रान­ फार दुःख भोगाव­, वडील मंडळ, मुख्य याजक व शास्त्री यांजकडून नाकारिल­ जाऊन जिव­ मारल­ जाव­, आणि त्यान­ तीन दिवसानंतर पुनः उठाव­, याच­ अगत्य आहे.
  
32. ही गोश्ट त्यान­ उघड सांगितली; त्यावरुन पेत्र त्याला जवळ घेऊन दबावूं लागला.
  
33. तेव्हां तो वळून व आपल्या शिश्यांस पाहून पेत्राला धमकावून म्हणाला, अरे सैताना, माझ्यापुढून निघून जा; कारण देवाच्या गोश्टींकडे तुझ­ लक्ष नाहीं, मनुश्यांच्या गोश्टींकडे आहे.
  
34. मग त्यान­ आपल्या शिश्यांसुद्धा लोकसमुदायाला बोलावून त्यांस म्हटल­, कोणी माझा अनुयायी होऊं पाहत असल्यास त्यान­ आत्मनिग्रह करावा व आपला वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसराव­.
  
35. जो कोणी, आपला जीव वांचवूं पाहतो तो त्याला मुकेल; आणि जो कोणी मजकरितां व सुवार्तेकरितां आपल्या जीवाला मुकेल तो याला वांचवील.
  
36. कारण मनुश्यान­ सर्व जग मिळविल­ आणि आपल्या जीवाचा नाश करुन घेतला, तर त्याला काय लाभ?
  
37. मनुश्यान­ आपल्या जीवाचा मोबदला काय द्यावा?
  
38. या व्यभिचारी व पापी पिढींमध्य­ जो कोणी माझी व माझ्या वचनांची लाज धरील, त्याची लाज मनुश्यांचा पुत्र पवित्र देवदूतांसहित आपल्या पित्याच्या गौरवान­ येईल तेव्हां तोहि धरील.