Home / Marathi / Marathi New Testament / Web / Matthew

 

Matthew, Chapter 10

  
1. तेव्हां त्यान­ आपल्या बारा शिश्यांस जवळ बोलावून त्यांनी अशुद्ध आत्म्यांस काढाव­ आणि सर्व प्रकारचे विकार व सर्व प्रकारचीं दुखणी बरीं करावीं असा अधिकार त्यांस दिला.
  
2. त्या बारा प्रेशितांची नांव­ अशी आहेतः पहिला, पेत्र म्हटलेला शिमोन, व त्याचा भाऊ अंद्रिया; जब्दीचा पुत्र याकोब व त्याचा भाऊ योहान;
  
3. फिलिप्प व बर्थलमय; थोमा व मत्तय जकातदार; अल्फीचा पुत्र याकोब व तद्दय;
  
4. शिमोन कनानी व त्याला धरुन देणारा यहूदा इस्कर्योत.
  
5. या बारा जणांस येशून­ अशी आज्ञा करुन पाठविल­ कीं, विदेश्यांकडे जाणा-या वाटेन­ जाऊं नका, व शोमरोनी यांच्या कोणत्याहि नगरांत प्रवेश करुं नका;
  
6. तर इस्त्राएलाच्या घरचीं जीं हरवलेलीं म­ढर­ त्यांजकडे जा.
  
7. जात असतां असा उपदेश करा कीं, स्वर्गाच­ राज्य जवळ आल­ आहे.
  
8. रोग्यांस बर­ करा, मेलेल्यांस उठवा, कुश्ठ्यांस शुद्ध करा, भूत­ काढा, तुम्हांस फुकट मिळाल­ आहे, फुकट द्या.
  
9. सोन­, रुप­ किंवा तांब­ आपल्या कंबरकशांत घेऊं नका;
  
10. वाटेसाठीं झोळणा, दुसरा अंगरखा, वहाणा, किंवा काठी घेऊं नका, कारण कामक-याच­ पोशण व्हाव­ ह­ योग्य आहे.
  
11. ज्या ज्या नगरांत किंवा गांवांत तुम्ही जाल, त्यांत कोण योग्य आहे ह­ शोधून पाहा; आणि तुम्ही निघून जाईपर्यंत त्याच्या येथ­ राहा;
  
12. आणि घरांत जातांना, तुला शांति असो, अस­ म्हणा;
  
13. त­ घर योग्य असल­ तर तुमची शांति त्याला प्राप्त होवो; त­ योग्य नसल­ तर तुमची शांति तुम्हांकडे परत येवो.
  
14. जो कोणी तुमच­ स्वागत करणार नाहीं, व तुमचीं वचन­ ऐकणार नाहीं, त्याच्या घरांतून किंवा नगरांतून निघतांना आपल्या पायांची धूळ झाडून टाका.
  
15. मी तुम्हांस खचीत सांगता­, न्यायाच्या दिवशीं त्या नगरापेक्षां सदोम व गमोरा यांच्या प्रदेशाला सोप­ जाईल.
  
16. पाहा, लांडग्यामध्य­ म­ढरांस तस­ मी तुम्हांस पाठवितो; यास्तव तुम्ही सापांसारिख­ चतुर व कबुतरांसारिखे साळसूद व्हा.
  
17. मनुश्यांविशयीं जपा; कारण ते तुम्हांस न्यायसभांच्या स्वाधीन करतील, आपल्या सभास्थानांत तुम्हांस फटके मारतील,
  
18. आणि देशाधिकारी व राजे यांस विदेश्यांस साक्ष पटावी म्हणून तुम्हांस स्वाधीन करितील तेव्हां कस­ काय बोलाव­ याविशयीं काळजीं करुं नका, कारण तुम्ही काय बोलाव­ याची त्याच घटकेस तुम्हांस प्रेरणा होईल.
  
19. दवज ंअंपसंइसम
  
20. बोलणारे तुम्ही नाहीं, तर तुमच्या बापाचा आत्मा हाच तुम्हांमध्य­ बोलणारा आहे.
  
21. भाऊ भावाला व बाप मुलाला जिव­ मारण्यास धरुन देईल; आणि ‘मुल­ आईबापांवर उठून’ त्यांस जिव­ मारितील;
  
22. माझ्या नामामुळ­ सर्व लोक तुमचा द्वेश करितील; जो शेवटपर्यंत टिकेल तोच तरेल.
  
23. जेव्हां एका नगरांत तुमचा छळ करितील तेव्हां दुस-यांत पळून जा; मी तुम्हांस खचीत सांगता­, मनुश्याचा पुत्र येईपर्यंत इस्त्राएलाचीं नगर­ तुम्हांस आटोपणार नाहींत.
  
24. गुरुपेक्षां शिश्य थोर नाहीं, आणि धन्यापेक्षां दास थोर नाहीं.
  
25. शिश्यान­ गुरुसारिख­ व दासान­ धन्यासारिख­ व्हाव­, इतके त्यास पुरे. घरधन्यास बालजबूल म्हटल­ तर घरच्या माणसांस किती विशेश­करुन म्हणतील?
  
26. यास्तव त्यांस भिऊं नका; कारण उघड­ होणार नाहीं अस­ कांहीं झांकलेल­ नाहीं, आणि कळणार नाहीं अस­ कांहीं गुप्त नाहीं.
  
27. ज­ मी तुम्हांशीं अंधारांत बोलता­ त­ उजेडांत सांगा, आणि तुमच्या कानांत सांगितलेल­ ज­ तुम्ही ऐकतां त­ धाब्यांवरुन गाजवा;
  
28. जे शरीराला वधितात, पण आत्म्याला वधावयास समर्थ नाहींत त्यांस भिऊं नका, तर आत्मा व शरीर या दोहा­चा नरकांत नाश करावयास जो समर्थ आहे त्याला भ्या.
  
29. दोन चिमण्या दमडीला विकतात कीं नाहींत? तथापि तुमच्या बापाच्या सत्तेशिवाय त्यांतून एकहि भूमीवर पडत नाहीं.
  
30. तुमच्या डोक्यावरले सर्व केस देखील मोजलेले आहेत.
  
31. यास्तव भिऊं नका; बहुत चिमण्यांहून तुमच­ मोल अधिक आहे.
  
32. जो कोणी मनुश्यांसमोर मला स्वीकारील त्याला मीहि आपल्या स्वर्गातील पित्यासमोर स्वीकारीन;
  
33. पण जो कोणी मनुश्यांसमोर मला नाकारील त्याला मीहि आपल्या स्वर्गातील पित्यासमोर नाकारीन.
  
34. मी पृथ्वीवर शांतता चालवावयास आला­ अस­ समजूं नका; मीं शांतता चालवावयास नव्हे; तर तरवार चालवावयास आला­.
  
35. कारण ‘मुलगा व बाप, मुलगी व आई, सून व सासू, यांत विरोध’ पाडण्यास मी आला­;
  
36. आणि ‘मनुश्याच्या घरचेच लोक त्याचे वैरी होतील.’
  
37. जो माझ्यापेक्षां बापावर किंवा आईवर अधिक प्रीति करितो तो मला योग्य नाहीं; जो माझ्यापेक्षां मुलग्यावर किंवा मुलीवर अधिक प्रीति करितो तो मला योग्य नाहीं;
  
38. आणि जो आपला वधस्तंभ उचलून घेऊन माझ्यामाग­ येत नाहीं तो मला योग्य नाहीं.
  
39. ज्यान­ आपला जीव राखिला तो त्याला गमावील, आणि ज्यान­े माझ्याकरितां आपला जीव गमाविला तो त्याला राखील.
  
40. जो तुम्हांस स्वीकारितो तो मला स्वीकारितो, तो ज्यान­े मला पाठविल­ त्याला स्वीकारितो.
  
41. संदेश्ट्याला संदेश्टा म्हणून जो स्वीकारितो त्याला संदेश्ट्याच­ प्रतिफळ मिळेल; आणि धार्मिकाला धार्मिक म्हणून जो स्वीकारितो त्याला धार्मिकाच­ प्रतिफळ मिळेल;
  
42. आणि ह्या लहानांतील एकाला शिश्य म्हणून जो कोणी केवळ गार पाण्याचा एक प्याला पाजितो तो आपल्या प्रतिफळाला मुकणारच नाहीं, अस­ मी तुम्हांस खचीत सांगता­.