Home / Marathi / Marathi New Testament / Web / Matthew

 

Matthew, Chapter 16

  
1. तेव्हां परुशी व सदूकी यांनीं येऊन येशूची परीक्षा पाहण्याकरितां, आम्हांस आकाशांतून कांहीं चिन्ह दाखवाव­, अशी त्याजकडे मागणी केली.
  
2. त्यान­ त्यांस उत्तर दिल­, तुम्ही संध्याकाळीं म्हणतां, उघाड होईल; कारण आभाळ तांबूस आहे;
  
3. आणि तुम्ही सकाळीं म्हणतां, आज झड लागेल; कारण आभाळ तांबूस व गडद आहे. तुम्हांला आभाळाच­ स्वरुप ओळखण्याच­ समजत­, पण काळांची लक्षण­ तुम्हांस ओळखतां येत नाहींत.
  
4. दुश्ट व व्यभिचारी अशी पिढी चिन्ह मागते, परंतु तिला योनाच्या चिन्हावांचून दूसर­ चिन्ह मिळणार नाहीं. मग तो त्यांस सोडून गेला.
  
5. नंतर शिश्य पलीकडे गेले, पण भाकरी घ्यावयास विसरले.
  
6. तेव्हां येशू त्यांस म्हणाला, परुशी व सदूकी यांच्या खमिराविशयीं जपा व सावध राहा.
  
7. तेव्हां ते आपसांत विचार करुन म्हणाले, आम्हीं भाकरी घेतल्या नाहींत म्हणून हा अस­ बोलतो;
  
8. परंतु येशू ह­ ओळखून म्हणाला, अहो अल्पविश्वासी, आपल्याजवळ भाकरीं नाहींत म्हणून हा अस­ बोलतो, असा विचार तुम्ही मनांत कां करितां?
  
9. तुम्ही अजून समजत नाहीं काय? पांच हजारांला पांच भाकरी दिल्यावर तुम्ही किती टोपल्या उचलिल्या;
  
10. तस­च चार हजारांला सात भाकरी दिल्यावर किती पाट्या उचलिल्या; याची तुम्हांला आठवण नाहीं काय?
  
11. मीं भाकरीविशयीं बोलला­ नाहीं ह­ तुम्ही कां समजत नाहीं? परुशी व सदूकी यांच्या खमिराविशयी सावध राहा.
  
12. तेव्हां ते समजले कीं त्यान­ भाकरीच्या खमिराविशयीं नाहीं, तर परुशी व सदूकी यांच्या शिक्षणाविशयीं सावध राहण्यास सांगितल­.
  
13. नंतर फिलिप्पाच्या कैसरीयाकडल्या प्रांतांत गेल्यावर येशून­ आपल्या शिश्यांस विचारिल­, मनुश्याच्या पुत्राला लोक कोण म्हणून म्हणतात?
  
14. ते बोलले, कित्येक बाप्तिस्मा करणारा योहान, कित्येक एलीया, कित्येक यिर्मया किंवा संदेश्ट्यांतील कोणीएक, अस­ म्हणतात.
  
15. तो त्यांस म्हणाला, पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणतां?
  
16. शिमोन पेत्रान­ उत्तर दिल­, आपण खिस्त, जीवंत देवाचे पुत्र, आहां.
  
17. येशून­ त्याला म्हटल­, शिमोन बार्योना, धन्य तुझी; कारण मांस व रक्त यांनीं नाहीं, तर माझ्या स्वर्गातील पित्यान­ ह­ तुला प्रगट केल­ आहे.
  
18. आणखी मी तुला सांगता­ कीं तूं पेत्र आहेस; आणि या खडकावर मी आपली मंडळी रचीन, व तिच्यापुढ­ अधोलोकाच्या द्वाराच­ चालणार नाहीं.
  
19. मी तुला स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या देईन, आणि पृथ्वीवर ज­ कांहीं तूं बंद करषील त­ं स्वर्गात बंद केल­ जाईल, आणि पृथ्वीवर ज­ कांहीं तूं मोकळ­ करशील त­ स्वर्गात मोकळ­ केल­ जाईल.
  
20. तेव्हां त्यान­ शिश्यांस निक्षून सांगितल­, मी खिस्त आहे ह­ कोणाला सांगूं नका.
  
21. तेव्हांपासून येशू आपल्या शिश्यांस दर्शवूं लागला कीं मी यरुशलेमास जाऊन वडील, मुख्य याजक व शास्त्री यांच्या हातून बहुत दुःख­ सोसावीं, जिव­ मारिल­ जाव­ व तिस-या दिवशीं उठाव­, याच­ अगत्य आहे.
  
22. तेव्हां पेत्र त्याला जवळ घेऊन त्याचा निशेध करुन म्हणाला, प्रभुजी, आपणावर दया असो, अस­ आपणाला होणारच नाहीं;
  
23. परंतु तो वळून पेत्राला म्हणाला, अरे सैताना, माझ्यापुढून निघून जा; तूं मला अडखळा आहेस; कारण देवाच्या गोश्टींकडे तुझ­ लक्ष नाहीं, माणसांच्या गोश्टींकडे आहे.
  
24. मग येशून­ आपल्या शिश्यांस म्हटल­, माझ्यामाग­ येण्याच­ कोणाच्या मनांत असेल तर त्यान­ आत्मनिग्रह करावा व आपला वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसराव­.
  
25. कारण जो कोणी आपला जीव वांचविण्यास पाहील तो त्याला मुकेल; आणि जो कोणीं मजकरितां आपल्या जिवाला मुकेल त्याला तो मिळेल.
  
26. मनुश्य सर्व जग मिळवील आणि आपला जीव गमावील तर त्याला काय लाभ होईल? अथवा मनुश्य आपल्या जिवाचा मोबदला काय देईल?
  
27. मनुश्याचा पुत्र आपल्या पित्याच्या गौरवान­ आपल्या दिव्यदूतांसहित येईल, त्या समयीं ‘तो प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कामाप्रमाण­ फळ देईल.’
  
28. मी तुम्हांस खचीत सांगता­ कीं येथ­ उभ­ राहणा-यांत कोणी असे आहेत कीं ते मनुश्याच्या पुत्राला त्याच्या राज्यांत येतांना पाहत तोपर्यंत त्यांस मरणाचा अनुभव येणारच नाहीं;