Home / Marathi / Marathi New Testament / Web / Matthew

 

Matthew, Chapter 25

  
1. तेव्हां स्वर्गाचें राज्य दहा कुमारींसारख­ होईल; त्या आपले दिवे घेऊन वराला सामो-या जाण्यास निघाल्या.
  
2. त्यांत पाच मूर्ख होत्या व पांच शहाण्या होत्या.
  
3. मूर्ख कुमारींनीं आपल­ दिवे घेतले पण आपणांबरोबर तेल घेतल­ नाहीं;
  
4. शहाण्यांनीं आपले दिवे घेतले व भांड्यांत तेलहि घेतल­.
  
5. मग वराला विलंब लागल्यामुळ­ सर्वांस डुलक्îा आल्या व झोप लागलीं.
  
6. तेव्हां मध्यरात्रीं अशी हाक झालीं कीं पाहा, वर आला आहे, त्याला सामो-या चला.
  
7. मग त्या सर्व कुमारी उठून आपले दिवे नीट करुं लागल्या;
  
8. तेव्हां मूर्खांनी शहाण्यांस म्हटल­, तुम्ही आम्हांस आपल्या तेलांतून कांहीं द्या, कारण आमचे दिवे जाऊं लागले आहेत;
  
9. पण शहाण्यांनीं उत्तर दिल­ कीं कदाचित् आम्हांस व तुम्हांस पुरणार नाहीं; तुम्हीं विकणा-यांच्या येथ­ जाऊन विकत घ्याव­, ह­ बर­.
  
10. त्या विकत घ्यावयास गेल्या इतक्यांत वर आला; तेव्हां ज्या सिद्ध होत्या त्या त्याच्याबरोबर लग्नास आंत गेल्या, आणि दार बंद झाले­.
  
11. नंतर त्या दुस-याहि कुमारी येऊन म्हणाल्या, प्रभुजी, प्रभुजी, आम्हांला दार उघडा.
  
12. त्यान­ उत्तर दिल­, मी तुम्हांस खचीत सांगता­, मी तुम्हांस ओळखीत नाहीं.
  
13. यास्तव तुम्ही जागृत राहा, कारण तुम्हांस तो दिवस किंवा ती घटका ठाऊक नाहीं.
  
14. 1कारण ज्याप्रमाण­ परदेशीं जाणा-या एका मनुश्यान­ आपल्या दासांस बोलावून त्यांस आपली मालमत्ता सोपून दिली, त्याप्रमाण­ ह­ आहे.
  
15. एकाला त्यान­ पांच हजार रुपये, एकाला दोन हजार असे ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाण­ दिले; आणि तो प्रवासास गेला.
  
16. ज्याला पांच हजार मिळाले होते त्यान­ लागल­च जाऊन त्यांवर व्यापार केला व आणखी पांच हजार मिळविले.
  
17. तस­च ज्याला दोन हजार मिळाले होते त्यान­हि आणखी हजार मिळविले;
  
18. परंतु ज्याला एक हजार मिळाले होते त्यान­ जाऊन भूमि खणिली, व तींत आपल्या धन्याचा पैका लपविला.
  
19. मग बहुत काळानंतर त्या दासांचा धनी आला, व त्यांचा हिशेब घेऊं लागला.
  
20. तेव्हां ज्याला पांच हजार मिळाले होते तो आणखी पांच हजार रुपये आणून म्हणाला, महाराज, आपण मला पांच हजार रुपये सोपून दिले होते, पाहा, त्यांवर मीं आणखी पांच हजार मिळविले आहेते.
  
21. त्याला त्याच्या धन्यान­ म्हटल­ः शाबास, भल्या व विश्वासू दासा, तूं थोडक्याविशयीं विश्वासू झालास, मी तुझी पुश्कळांवर नेमणून करीन; आपल्या धन्याच­ सुख भोगावयास ये.
  
22. नंतर ज्याला दोन हजार मिळाले होते तोहि येऊन म्हणाला, महाराज, आपण मला दोन हजार रुपये सोपून दिले होते; पाहा, त्यांवर मीं आणखीं दोन हजार मिळविले आहेत.
  
23. त्याला त्याच्या धन्यान­ म्हटल­, शाबास, भल्या व विश्वासू दासा, तूं थोडक्याविशयीं विश्वासू झालास; मी तुझी पुश्कळावर नेमणूक करीन; आपल्या धन्याच­ सुख भोगावयास ये.
  
24. मग ज्याला एक हजार मिळाले होते तोहि येऊन म्हणाला, महाराज, आपण कठोर मनुश्य आहां; जेथ­ आपण पेरिल­ नाहीं तेथ­ कापणी करितां; व जेथ­ पसरिल­ नाहीं तेथून जमा करितां, अस­ मला आपणाविशयीं कळल­;
  
25. म्हणून मीं भिऊन आपले हजार रुपये भूमींत लपवून ठेविले होते; पाहा, ते तुमचे तुम्हांस मिळाले आहेत.
  
26. तेव्हां त्याच्या धन्यान­ त्याला उत्तर दिल­, अरे दुश्ट व आळशी दासा, जेथ­ मीं पेरिल­े नाहीं तेथ­ कापिता­, व पसरिल­ नाहीं तेथून गोळा करिता­, हे तुला ठाऊक होत­;
  
27. तर माझ­ द्रव्य सावकारांकडे ठेवायच­ असत­, म्हणजे मी आल्यावर माझ­ मला सव्याज मिळाल­ असत­.
  
28. यास्तव हे हजार रुपये याजपासून घ्या, आणि ज्याच्याजवळ दहा हजार आहेत त्याला द्या.
  
29. कारण ज्याच्याजवळ आहे त्याला दिल­ जाईल व त्याला विपुल होईल; आणि ज्याच्याजवळ नाहीं त्याच्याजवळ ज­ असेल त­ देखील त्याजपासून घेतल­ जाईल;
  
30. आणि ह्या निरुपयोगी दासाला बाहेरील अंधारांत टाका, तेथ­ रडण­ व दांतखाण­ चालेल.
  
31. जेव्हां मनुश्याचा पुत्र आपल्या वैभवान­ ‘येईल, व त्याजबरोबर सर्व देवदूत’ येतील, तेव्हां तो आपल्या वैभवी राजासनावर बसेल;
  
32. त्यांजपुढ­ सर्व राश्टेªं जमवलीं जातींल; आणि जस­ म­ढपाळ शेरडांपासून म­ढर­ वेगळीं करितो तस­ तो त्यांस एकमेकांपासून वेगळ­ करील.
  
33. म­ढरांस तो आपल्या उजवीकडे ठेवील व शेरडांस डावीकडे ठेवील.
  
34. तेव्हां राजा आपल्या उजवीकडल्यांस म्हणेल, अहो माझ्या पित्याचे आशीर्वादितहो या; ज­ राज्य जगाच्या स्थापनेपासून तुम्हांकरितां सिद्ध केल­ त­ वतन करुन घ्या.
  
35. कारण मीं भुकेला होता­ तेव्हां तुम्हीं मला खावयास दिल­; तान्हेला होता­ तेव्हां मला प्यावयास दिल­; परका होता­ तेव्हां मला घरांत घेतल­;
  
36. उघडा होता­ तेव्हां मला वस्त्र दिल­; आजारी होता­ तेव्हां माझा समाचार घेतला; बंदिशाळ­त होता­ तेव्हां तुम्ही मजकडे आलां.
  
37. त्या वेळेस धार्मिक लोक त्याला उत्तर देतील कीं, प्रभुजी, आम्हीं आपणाला केव्हा भुकेल­ पाहून खावयाास दिल­? केव्हां तान्हेले पाहून प्यावयास दिल­?
  
38. आपणाला परक­ पाहून केव्हां घरांत घेतल­? उघड­ पाहून केव्हां वस्त्र दिल­?
  
39. आणि आपणाला आजारी अथवा बंदिशाळ­त पाहून केव्हां आपणाकडे आम्ही आला­?
  
40. तेव्हां राजा त्यांस उत्तर देईल, मी तुम्हांस खचीत सांगता­ कीं ज्या अर्थी तुम्हीं या माझ्या अति कनिश्ठ बंधुतील एकाला केल­ त्या अर्थी त­ मलाच केल­ आह­.
  
41. मग डावीकडल्यांसहि तो म्हणेल, अहो शापग्रस्तहो, सैतान व त्याचे दूत यांसाठीं जो सार्वकालिक अग्नि सिद्ध केला आहे व त्यांत माझ्यापुढून जा.
  
42. कारण मीं भुकेला होता­ तेव्हां तुम्हीं मला खावयास दिल­ नाहींं; तान्हेला होता­ तेव्हां मला प्यावयास दिल­ नाहींं;
  
43. परका होता­ तेव्हां मला घरांत घेतल­ नाहींं; उघडा होता­ तेव्हां मला वस्त्र दिल­ नाहींं; आजारी व बंदिशाळ­त होता­ तेव्हां माझा समाचार घेतला नाहीं.
  
44. त्या वेळेस हेहि त्याला उत्तर देतील, प्रभुजी, आम्हीं केव्हां आपणाला भुकेल­ तान्हेल­, परक­, उघड­, आजारी किंवा बंदिशाळ­त पाहून आपली सेवा केली नाहीं?
  
45. तेव्हां तो त्यांस उत्तर देईन, मी तुम्हांस खचीत सांगता­, तुम्ही ज्या अर्थी या अति कनिश्ठांतील एकालाहि केल­ नाहीं त्या अर्थी त­ मला केल­ नाहीं.
  
46. ‘ते तर सार्वकालिक’ दंड भोगावयास जातील; आणि धार्मिक लोक ‘सार्वकालिक जीवन भोगावयास’ जातील.