Home / Marathi / Marathi New Testament / Web / Matthew

 

Matthew, Chapter 26

  
1. मग अस­ झाल­ कीं येशून­ हीं सर्व वचन­ समाप्त केल्यावर आपल्या शिश्यांस म्हटल­,
  
2. तुम्हांस ठाऊक आहे कीं दोन दिवसांनीं वल्हांडण सण आहे, आणि मनुश्याच्या पुत्राला वधस्तंभावर खिळविण्याकरितां धरुन देतील.
  
3. तेव्हां कयफा नामक प्रमुख याजकाच्या वाड्यांत मुख्य याजक व लोकांचे वडील जन जमले;
  
4. आणि येशूला कपटान­ धरुन जिव­ माराव­ अशी त्यांनीं मसलत केली;
  
5. परंतु लोकांमध्य­ गडबड होऊं नये म्हणून ह­ सणांत नको अस­ त्यांनी म्हटल­.
  
6. तेव्हां येशू बेथानींत कुश्ठरोगी शिमोन याच्या घरीं असतां,
  
7. कोणीएक स्त्री बहुमोल सुगंधी तेलाची अलाबास्त्र कुपी घेऊन त्याजकडे आली, आणि तो भोजनास बसला असतां तिन­ त्याच्या मस्तकावर ती ओतिली.
  
8. ह­ पाहून त्याचे शिश्य रागावून म्हणाले, हा नाश कशाला केला?
  
9. ह­ सुगंधी तेल विकून पुश्कळ पैसे आले असते व ते गरिबांस देतां आल­ असते.
  
10. येशून­ ह­ पाहून त्यांस म्हटल­, या स्त्रीला कां त्रास देतां? ईन­ तर माझ्यासाठीं चांगल­ कृत्य केल­.
  
11. गरीब नेहमीं तुम्हांजवळ आहेत, परंतु मी तुम्हांजवळ नेहमीं आह­ अस­ नाहीं.
  
12. इन­ सुगंधी तेल माझ्या शरीरावर ओतिल­ ह­ माझ्या उत्तरकार्यासाठीं केल­.
  
13. मी तुम्हांस खचीत सांगता­, सर्व जगांत जेथ­ जेथ­ ही सुवार्ता गाजवितील तेथ­ इन­ ज­ केल­ आहे त­हि इच्या स्मरणार्थ सांगतील.
  
14. तेव्हां यहूदा इस्कर्योत नांवाच्या बारांतील एकान­ मुख्य याजकांकडे जाऊन म्हटल­,
  
15. मीं त्याला धरुन तुमच्या स्वाधीन केल­ तर मला काय द्याल? ‘त्यांनीं त्याला तीस रुपये तोलून दिले.’
  
16. तेव्हांपासून तो त्याला धरुन देण्याची संधि पाहूं लागला.
  
17. नंतर बेखमीर भाकरीच्या सणाच्या पहिल्या दिवशीं येशूकडे शिश्य येऊन म्हणाले, आपणाकरितां वल्हांडणाच्या भोजनाची तयारी आम्हीं कोठ­ करावी म्हणून आपली इच्छा आहे?
  
18. त्यान­ म्हटल­, नगरांत अमुक एका इसमाकडे जाऊन त्याला सांगा कीं गुरु म्हणतो, माझी वेळ जवळ आली आहे, मी आपल्या शिश्यांसहित तुझ्या येथ­ वल्हांडण सण करिता­.
  
19. मग येशून­ सांगितल्याप्रमाण­ शिश्यांनीं जाऊन वल्हांडणाची तयारी केली.
  
20. संध्याकाळ झाल्यावर तो बारा शिश्यांसहित भोजनास बसला;
  
21. आणि ते भोजन करीत असतां त्यान­ म्हटल­, मी तुम्हांस खचीत सांगता­, तुम्हांतील एक जण मला धरुन देईल.
  
22. तेव्हां ते फार खिन्न झाले आणि प्रत्येक जण त्याला विचारुं लागला, प्रभुजी, मी आह­ काय तो?
  
23. त्यान­ उत्तर दिल­ कीं ज्यान­ मजबरोबर ताटांत हात घातला तोच मला धरुन देईल.
  
24. मनुश्याच्या पुत्राविशयींं जस­ लिहिल­ आहे तसा तो जातो खरा; परंतु जो मनुश्याच्या पुत्राला धरुन देतो त्या मनुश्याला धिक्कार असो! तो मनुश्य जन्मला नसता तर त­ त्याला बर­ होत­.
  
25. तेव्हां त्याला धरुन देणारा यहूदा यान­ विचारिल­, गुरुजी, मी आह­ काय तो? तो त्याला म्हणाला, तूं म्हटल­च तस­च.
  
26. मग ते भोजन करीत असतां येशून­ भाकर घेऊन व आशीर्वाद देऊन ती मोडिली; आणि शिश्यांस म्हटल­, घ्या, खा, ह­ माझ­ शरीर आहे;
  
27. आणि त्यान­ प्याला घेतला व ईशोपकारस्मरण करुन तो त्यांस दिला, व म्हटल­, तुम्ही सर्व यांतील प्या.
  
28. ह­ माझ­ (नव्या) ‘कराराच­ रक्त आहे; ह­ पापांची क्षमा होण्यासाठीं बहुतांकरितां ओतिल­ जात आहे.
  
29. मी तुम्हांस सांगता­ कीं मी आपल्या पित्याच्या राज्यांत तुम्हांबरोबर नवा पिईपर्यंत एथून पुढ­ द्राक्षीचा हा उपज पिणारच नाहीं.
  
30. नंतर गीत गाऊन ते जैतूनांच्या डा­गरावर निघून गेले.
  
31. तेव्हां येशू त्यास म्हणाला, तुम्ही सर्व याच रात्री मजविशयीं अडखळाल; कारण अस­ लिहिल­ आहे कीं ‘मी म­ढपाळाला मारीन, आणि कळपांतल्या म­ढराचीं दाणादाण होईल;’
  
32. परंतु उठल्यावर मी तुमच्यापूर्वी गालीलांत जाईन.
  
33. पेत्रान­ त्यास उत्तर दिल­ कीं तुजविशयीं सर्व अडखळले तरी मी कधीहि अडखळणार नाहीं.
  
34. येशून­ त्याला म्हटल­, मी तुला खचीत सांगता­ कीं याच रात्री का­बडा आरवण्यापूर्वी तूं तीन वेळां मला नाकारशील.
  
35. पेत्र त्याला म्हणाला, तुजबरोबर मला मराव­ लागल­ तरी मी तुला नाकारणार नाहींच; सर्व शिश्यांनींहि तस­च म्हटल­.
  
36. नंतर येशू त्यांजबरोबर गेथशेमान­ या नांवाच्या ठिकाणीं आला; आणि शिश्यांस म्हणाला, मी थोडा पुढ­ जाऊन प्रार्थना करीपर्यंत येथ­ बसा.
  
37. मग त्यान­ पेत्र व जब्दीचे दोघे पुत्र यांस बरोबर घेतल­; आणि तो खिन्न व अति कश्टी होऊं लागला.
  
38. तेव्हां त्यान­ त्यांस म्हटल­, ‘माझा जीव’ मरणप्राय, ‘अति खिन्न झाला आहे;’ तुम्ही येथ्रे राहा व माझ्याबरोबर जागृत असा.
  
39. मग तो कांहीस­ पुढ­ जाऊन पालथा पडला, आणि त्यानं­ अशी प्रार्थना केलीः हे माझ्या बापा, होईल तर हा प्याला मजवरुन टळून जावो; तथापि माझ्या इच्छेप्रमाण­ नको तर तुझ्या इच्छेप्रमाण­ होवो.
  
40. मग तो शिश्यांकडे आला, आणि त­ झोपी गेले आहेत अस­ पाहून पेत्राला म्हणाला, काय! घटकाभरहि माझ्याबरोबर तुमच्यान­ जागवत नाहीं?
  
41. तुम्हीं परीक्ष­त पडूं नये म्हणून जागृत राहा व प्रार्थना करा; आत्मा उत्सुक आहे खरा, तरी देह अशक्त आहे.
  
42. आणखी त्यान­ दुस-यांदा जाऊन अशी प्रार्थना केलीः हे माझ्या बापा, ह­ प्याल्यावांचून टळून जात नसल­ तर तुझ्या इच्छेप्रमाणे­ होवो.
  
43. मग त्यान­ पुनः येऊन ते झोपी गेले आहेत अस­ पाहिल­; कारण त्यांचे डोळे जड झाले होते.
  
44. नंतर त्यांस सोडून पुनः जाऊन त्यान­ तिस-यांदा तेच शब्द म्हणून प्रार्थना केली;
  
45. आणि तो आपल्या शिश्यांकडे येऊन त्यांस म्हणाला, आता झोप व विसावा घ्या; पाहा, घटका जवळ आली आहे, आणि मनुश्याचा पुत्र पापी लोकांच्या हातीं धरुन दिला जात आहे.
  
46. उठा, आपण जाऊं; पाहा, मला धरुन देणारा जवळ आला आहे.
  
47. तो बोलत आहे इतक्यांत, पाहा, बारांतील एक जो यहूदा तो आला आणि त्याबरोबर मुख्य याजक व लोकांचे वडील यांजकडला मोठा समुदाय तरवारी व सोटे घेऊन आला.
  
48. त्याला धरुन देणारा यान­ त्यांस अशी खूण सांगून ठेविली होती कीं मीं ज्याच­ चुंबन घेईन तोच तो आहे, त्याला धरा.
  
49. मग त्यान­ लागल­च येशूजवळ येऊन, गुरुजी, सलाम, अस­ म्हणून त्याची पुश्कळ चुंबन­ घेतलीं.
  
50. येशून­ त्याला म्हटल­, गड्या, ज्याकरितां आलास त­ कर. तेव्हां त्यांनी जवळ येऊन येशूवर हात टाकून त्याला धरिल­.
  
51. मग पाहा, येशूबरोबर जे होते त्यांतून एकान­ हात लांब करुन आपली तरवार उपसली व प्रमुख याजकाच्या दासावर प्रहार करुन त्याचा कान कापून टाकिला.
  
52. तेव्हां येशू म्हणाला, तूं आपली तरवार परत जागच्या जागी घाल, कारण तरवार धरणारे सर्व जण तरवारीन­ नाश पावतील.
  
53. मला आपल्या पित्याजवळ मागतां येत नाहीं, आणि आतां तो मला देवदूतांच्या बारा सैन्यांपेक्षां अधिक पाठवून देणार नाहीं, अस­ तुला वाटत­ काय?
  
54. एरवीं, अस­ झाल­ पाहिजे, ह­ म्हणणारे शास्त्रलेख कसे पूर्ण व्हावे?
  
55. त्या समयीं येशू लोकसमुदायांस म्हणाला, जस­ लुटारुवर तरवारी व सोटे घेऊन जाव­ तस­ तुम्ही मला धरावयास बाहेर आलां काय? मी प्रतिदिवशीं मंदिरांत बसून शिक्षण देत अस­, तरीं तुम्ही मला धरिल­ नाहीं;
  
56. पण संदेश्ट्यांचे लेख पूर्ण व्हावे म्हणून ह­ सर्व झाल­. इतक्यांत सर्व शिश्य त्याला सोडून पळाले.
  
57. मग येशूला धरणा-यांनीं त्याला प्रमुख याजक कयफा याच्या घरीं शास्त्री व वडील जमले होते तेथ­ नेल­.
  
58. पेत्र तर प्रमुख याजकाच्या वाड्यापर्यंत दुरुन त्याच्या माग­माग­ चालत गेला, व आंत जाऊन त्याचा शेवट काय होतो ह­ पाहावयास कामदारांमध्य­ बसला.
  
59. मुख्य याजक व संपूर्ण न्यायसभा यांनीं येशूला जिव­ माराव­ ह्या हेतून­ त्याजविरुद्ध खोटी साक्ष मिळावी म्हणून शोध केला;
  
60. आणि बहुत खोटे साक्षी आले असतांहि ती त्यांस मिळाली नाहीं. तरी शेवटीं दोघे जण येऊन म्हणाले कींं
  
61. देवाचे मंदिर मोडावयास व तीन दिवसांत त­ बांधावयास मी समर्थ आह­, अस­ ह्यान­ म्हटल­.
  
62. तेव्हां प्रमुख याजक उठून त्याला म्हणाला, तूं कांहींच उत्तर देत नाहींस काय? हे तुझ्याविरुद्ध कशी साक्ष देतात?
  
63. तथापि येशू उगाच राहिला. यावरुन प्रमुख याजकान­ त्याला म्हटल­, मी तुला जीवंत देवाची शपथ घालून विचारिता­ कीं, देवाचा पुत्र खिस्त तो तूं आहेस कीं नाहींस ह­ आम्हांस सांग.
  
64. येशू त्याला म्हणाला, तूं म्हटल­स तस­च. आणखी मीं तुम्हांस सांगता­, यापुढ­ तुम्ही ‘मनुश्याच्या पुत्राला सर्वसमर्थाच्या उजवीकडे बसलेल­ व आकाशाच्या मेघांवर आरुढ होऊन येतांना पाहाल.’
  
65. तेव्हां प्रमुख याजकान­ आपलीं वस्त्र­ फाडून म्हटल­, यान­ दुर्भाशण केल­ आहे; आम्हांस आणखी साक्षीदार कशास पाहिजेत? पाहा, आतां तुम्ही ह­ दुर्भाशण ऐकल­ आहे,
  
66. तुम्हांस कस­ वाटत­? त्यांनीं उत्तर दिल­ कीं हा मरणदंडास पात्र आहे.
  
67. तेव्हां ते त्याच्या ता­डावर थंुकले, व त्यांनीं त्याला बुक्क्या मारिल्या; आणि कोणी त्याला चपडाका मारुन म्हटल­,
  
68. अरे खिस्ता, आम्हांबरोबर अंतर्ज्ञानान­ बोल; तुला कोणीं मारिल­?
  
69. इकडे पेत्र वाड्यांत बाहेर बसला होता; तेव्हां एक दासी त्याजकडे येऊन म्हणाली, तूंहि गालीलकर येशूबरोबर होतास.
  
70. तो सर्वांच्यासमोर नाकारुन बोलला, तूं ज­ म्हणत्येस त­ मला ठाऊक नाहीं.
  
71. मग तो बाहेर देवडीवर गेल्यावर दुसरीन­ त्याला पाहून तेथल्या लोकांस म्हटल­, हाहि नासोरी येशूबरोबर होता.
  
72. पुनः तो शपथ वाहून नाकारुन बोललां कीं मी त्या मनुश्याला ओळखीत नाहीं.
  
73. नंतर कांहीं वेळान­ तेथ­ उभे राहणारे लेाक जवळ येऊन पेत्राला म्हणाले, खरोखर तूंहि त्यांतला आहेस, कारण तुझ्या बोलण्यावरुन तूं कोण आहेस ह­ दिसून येत­.
  
74. तेव्हां तो शापोच्चारण करुन व शपथा वाहून म्हणूं लागला कीं मी त्या मनुश्याला ओळखीत नाहीं. इतक्यांत का­बडा आरवला.
  
75. तेव्हां का­बडा आरवण्यापूर्वी तीन वेळां तूं मला नाकारशील अस­ ज­ येशून­ पेत्राला सांगितल­ होत­ त­ त्याला आठवल­, आणि तो बाहेर जाऊन मोठ्या दुःखान­ रडला.